Monday, September 26, 2011

पटलं तर घ्या..

Ressesion ची टांगती तलवार, महागाई चा भुकंप, आणि भ्रष्टाचाराचा आ वासून उभा असलेला भस्मासुर.
ह्या सगळ्या विळख्यात अडकलेला आपल्या सारखा अनेक जबाबदार्यांचं वेताळ भूत मानगुटीवर घेऊन फीरणारा एक सामान्य माणूस. अश्या वेळी नवीन घर घेण्याची वेळ त्यावर आली कि त्याच्या पायाखालची जमीन नक्कीच सरकणार.  कारण एक जुनी म्हण आहे कि "लग्न पाहावं करून आणि घर पाहावं बांधून"  आज तशी घर बांधायची जवाबदारी बिल्डर लोबीने उचलली आहे आपल फक्त काम उरलय ते विकत घेऊन EMI भरायचं.....

Friday, September 16, 2011

वेडेच इतिहास घडवतात.. आणि अण्णा वेडे आहे..


खबरदार जर तुम्ही भ्रष्टाचार विरुद्ध बोलत असाल, उपोषण करत असाल, किंवा वंदे मातरम म्हणत असाल तर तुम्ही  जातीय वादी आहात तुम्हाला जातीयवादी संघटना साथ देत आहे (मग ती संघटना देशभक्त का असोना ) आणि भारतात हिंदू संघटनानाच जातीयवादी म्हटलं जात बाकी इतर  जातीयवादा च्या आधारावर उभारलेल्या  संघटना  ह्या धर्मनिरपेक्ष आहेत. ह्याच्या हि पुठे जाऊन जर  खालील प्रकारची पत्र तुम्ही सरकार ला पाठवत असाल तर मग तुम्ही वेडे आहात आणि देश द्रोही आहात हे लक्षात ठेवा.
सध्या असाच काही प्रकार आपल्या देशात सुरु आहे, महाराष्ट्रातल एक अस व्यक्तिमत्व ज्याचं नाव "कि.बा.हजारे" आहे ज्यांना लाडाने अण्णा म्हणतात, उपहासाने छोटा गांधी आणि टीकेने वाकड्या तोंडाचा गांधी म्हणून संबोधल जात ते छोट वादळ आज आपल्या केंद्र सरकार ला जाऊन भिडलंय.

Friday, August 19, 2011

भ्रष्टाचाराचा भस्मासुर आणि अण्णाअस्त्र

           भ्रष्टाचाराची कीड हि सध्या संपूर्ण जगावर पसरली आहे. ह्या रोगाची लागण भारताला कधी झाली हे सांगण जरा कठीणच पण आज ती इतकी खोलवर रुजली आहे कि संपूर्ण समाज व्यवस्था ह्या रोगाने पोखरून टाकली आहे.ह्या भ्रष्टाचार-नावाच्या रोगा  साठी बरेच कायदे करून लसीकरण करण्याचा प्रयत्न केला गेला पण काहीही उपयोग झालेला दिसला नाही. आता हा साधा रोग राहिला नसून त्याने महाकाय रूप धारण केल आहे. काल पर्यंत लहान सहान ठिकाणी छोट्या प्रमाणावर भ्रष्टाचार सगळी कडे होता. पण आज घोटाळ्यांचे आकडे बघितले तर आकडी येईल. रोज नवी बातमी, ४०० कोटी चा घोटाळा, 7०० कोटी, १००० कोटी, १लाख कोटी या वरूनच कळत की हि साधी कीड भस्मासुर बनली आहे. हा भ्रष्टाचाराचा भस्मासुर आज आ-वासून उभा आहे, आणि आपल्या हक्काची आणि कष्टाची कमाई गिळंकृत करण्यासाठी तत्पर उभा आहे.

Wednesday, August 10, 2011

सोन्याच अंड देणारी कोंबडी विकून टाकली

महानगरांमध्ये जिथे खास करून झपाट्याने विकास होत चाललाय अश्या ठिकाणी रिकाम्या जमिनींना, शेताला सोन्यापेक्षा हि जास्त किंम्मत मिळु लागली आहे. एकराने विकल्या जाणार्या जमिनी आज गुंठ्यांनी विकल्या जात आहेत. हीच बाब आज पुणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात बघायला मिळती आहे. विद्देच माहेर घर असलेल  पुण आता IT क्षेत्रालाही भुरळ घालू लागल आहे.
बघता बघता हिंजेवाडी, मगरपट्टा, तळेगाव, औंध ह्या काही गावां मध्ये IT पार्क उभे राहिले आहेत. शिक्षणाच्या बाबतीत तर पुण्याच आकर्षण पहिले पासून आहेच, रोज गल्ली बोळां मध्ये एक नवी शिक्षण संस्था जन्मास येते. त्यामुळे इथे शिक्षणासाठी आणि रोजगारासाठी दररोज येणारांच्या संखेत लक्षणीय वाढ झाली आहे. म्हणून प्रत्येक IT पार्क आणि शिक्षण संस्थाच्या आजु बाजु च्या परिसरासरांच्या किंम्मती उच्चांक गाठतात. लोखंडाच परिसाच्या स्पर्शाने सोन व्हावं तस ह्या IT पार्क आणि शिक्षण संस्था सारखे पारीस जमीनीच सोन करत आहेत.
ह्यामुळे शेतकरी शेतीला कंटाळले कि पैशाला हपापले हे कळत नाही, पश्चिम  महाराष्ट्रातला

Monday, May 2, 2011

Storie of Life

मनाचे मनाशी जुळलेले नाते..
सदैव गीत प्रेमाचे गाते..
ह्या बेधुंद मनाच्या लहरी मधे भिजावं.. मना मनात प्रेमाच बीज रुजाव. कधी गोड कधी कडु आठवणीन
मधे हरवून जाव.. ह्या पेक्ष्या वेगळ आयुष्य ते काय आहे? अश्याच काही जीवनातील रसाळ आठवणींचा संग्रह "Storie of Life"
हा नवीन सादर घेऊन येतोय.. वाचा निरनिराळ्या कथा आवडल्यास दाद द्यायला विसरू नका.
सुरवात करतोय एका English Love Story ने.
Episodes of Love story...Hope u like it...Will try to send each week one episode...
Cute love story arrives!!!!… surely it will hit you!!!… enjoy it!!!!…

Tuesday, March 15, 2011

माझ्या स्वप्नातील महाराष्ट्र

कणखर देशा, दगडांच्या देशा, महाराष्ट्र देशा. गर्जा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा या पेक्षा ते आणखी काय वर्णन करणार माझ्या महाराष्ट्राच. संताच्या वाणीने आणि शिवबाच्या कर्तुत्वाने पावण झालेली ही पतित पावन महाराष्ट्र भुमी. जेव्हा महाराष्ट्रा बद्दल विचार करतो तेव्हा सगळ्यात पहिला आठवतात ते "संयुक्त महाराष्ट्र चळवळी चे दिवस". होय भारत स्वातंत्र्या नंतरही महाराष्ट्र हे स्वतंत्र राज्य नव्हत. मराठी भाषिकांचा महाराष्ट्र अनेक प्रांतात विभागलेला होता, विदर्भ हा प्रांत मध्यप्रदेश मधे तर मराठवाडा हैदराबाद च्या निजामशाही मधे तर मुंबई सह पश्चिम महाराष्ट्र गुजरात प्रंतामधे विभागलेले होते. आणि बेळगाव हे कर्नाटक (म्हैसुर प्रांत) मधे जे अजुनही तिथेच आहे. या विभागलेल्या विभक्त महाराष्ट्राला संयुक्त करण्यासाठी छत्रपतिंच्या लेकरानी कंबर कसली आणि लाखो गीरणी मजदुर, कामगार आणि दलित वर्गानी एकत्र येवून हा लढा कुठल्याही राजकीय पक्षाच्या मदती शिवाय सुरु केला, त्याचं नेतृत्व करायला कामगार नेते श्रीपाद अमृत डांगे, एस.एम.जोशी, आचार्य अत्रे, प्रबोधनकार ठाकरे(बाळासाहेब ठाकरेंचे वडील) ,शाहिर अण्णाभाऊ साठे ई. मंडळी सरसावली होती. १९५५-५६ पासुन सुरु झालेला हा रणसंग्राम तब्बल ५ वर्षे चालला आणि २१ नोव्हेंबर १९५९ रोजी १०५ हुतात्म्याच्या प्राणाची आहुती घेऊन थांबला. आणि कामगार नेते "श्रीपाद
अमृत डांगे" यांची मागणी माण्य होऊन संयुक्त महाराष्ट्राच स्वप्न १ में १९६० "जागतिक कामगार दिनी" सत्यात उतरल, तरी बेळगाव च स्वप्न मात्र भंगल, त्या वेळचा नारा होता कि बेळगाव-मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. परंतु गुजरात पासुन मुंबई आणि कर्नाटक पासुन बेळगाव मिळवणे म्हणजे फार मोठी कसरत होती, जवाहरलाल नेहरू सरकार दौभाषिक राज्यावर ठाम होत, मग अश्या वेळेस निर्णय झाला कि आधी मुंबई घेऊ बेळगाव येईलच, म्हणजे "आधी लगीन कोंढाण्याचे मग रायबाचे" परंतु लग्नाची वाट बघत रायबा(बेळगाव)म्हातारा झालाय. जरी आज बेळगाव महाराष्ट्रात नसेल तरीही महाराष्ट्र रुबाबात, मोठ्या दिमाघात उभा आहे. पण बेळगाव नसल्याची खंत अजुनही जाणवते.

स्वरराज नावाचा छावा

संगीताच्या क्षेत्रातलं एक बरचस नावाजलेल पण सध्या अनोळखी झालेलं एक नाव म्हणजे दिवंगत संगीतकार श्रीकांत ठाकरे, गीतकार मोह.रफी च्या आवाजातलं "हा रुसवा सोड सखे पुरे हा बहाणा"  हे गाण त्यांनीच संगीत बद्द केलेलं. श्रीकांत ठाकरेंची दुसरी ओळख म्हणजे "शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे" यांचे धाकटे बंधू, आणि मनसे प्रमुख "राज ठाकरे" यांचे वडील. श्रीकांत ठाकरे ह्यांना संगीता बरोबर व्यंगचीत्राचीही  बरीच जान होती हे बाळासाहेबांच्या मुलाखतीतून बर्याचदा जाणवलं.जसे श्रीकांत ठाकरेंच संगीत प्रत्येक युवकांच्या तोंडी अजूनही राज्य करत आहेत, तसाच त्यांचा मुलगा "राज ठाकरे" हा महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी युवा मनावर अधिराज्य गाजवतोय.
मागच्या वर्षी पुण्यात शनिवारवाड्या समोर स्व. श्रीकांत ठाकरे संगीत स्मृती पुर
स्कार राज ठाकरे यांच्या हस्ते संगीतकार अजय अतुल ह्यांना देण्यात आला. तेव्हा नेहमी राजकारणावर तिखट बोलणार्या राज ठाकरेंच्या मुखावाटे कलेविषयी आणि त्यांच्या वडिलांविषयी ऐकायला मिळाल, राज ठाकरे म्हणाले, "त्यांच्या वडिलांची इच्छा होती कि त्यांनी संगीत क्षेत्रात आपला ठसा उमटवावा." त्या साठी लहानपणा पासूनच त्यांना संगीताची गोडी ह्वावी म्हणून श्रीकांतजींनी तबला, पेटी, सितार ई चे धडे गिरवणे सुरु केलेत, त्याचं नावही त्यांनी "स्वर-राज ठाकरे" ठेवलेलं म्हणजे स्वरांवर राज्य करणारा, त्यांना अनेक संगीतातले राग शिकवलेत. परंतु राज ठाकरेंना मात्र संगीता व्यतिरिक्त दुसराच राग डोक्यात बसला आणि ते आपले काका "बाळासाहेब ठाकरे" यांच्या कलेशी म्हणजे व्यंगचीत्रा शी अधिक प्रेरित होऊ लागलेत, जसजसे ते मोठे होत गेलेत त्याच्या वर काकांचा प्रभाव अधिकाधिक होत गेला "राज ठाकरे" त्या भाषणात असे हि म्हणाले होते कि त्यांना अमेरिकेला जाऊन तिथे "Holliwood च्या Disney " मध्ये Cartoon Artist म्हणून काम करायची इच्छा होती.

Friday, February 4, 2011

साथी आयुष्याचा

       नुकतेच माझ्या लहान बहिणीला बघायला पाहुणे आले होते, अचानकच जुळल सगळ, अस आमच्या ध्यानी मनी ही नव्हत की कोणी तरी येइल पसंती दखावातिल आणि लगेचच होकार ही देतील म्हणुन. आता कदाचित लग्नाची बोलनीही होइल आणि माझी लाडकी मला सोडुन जाइल, या विचारानीच मनात अस धस्स होत. असं वाटत बघता बघता आपण एवढे मोठे झालोत. असं वाटत कालच तर आईनी "भांडू नका रे" म्हणत पाठीत दोन "धबुके" दिले होते. कालच तर बाबांनी दोघांसाठी खाऊ आणला होता. आणि शालेचा निकाल लागला, तेव्हा तिला जास्त आणि मला कमी मार्क म्हणुन ती बाबांची लाडकी बाबांच्या खांद्यावर जाउन बसली आणि मला चीड़उ लागली, वर बाबा मला उपदेशाचे डोस पाजू लागले की "बघ शिक जरा काही तरी हिच्या कडून." आणि माझ्या मनात मात्र एकच विचार "चोमडे तू खाली उतर तुला बघतोच". हे सगळ जस काही कालच घडल होत ना. पण विचारही करवत नव्हता की लगेचच ही चिमुरडी बाबांच्या खांद्यावरून उतरून लग्नाच्या बोहल्या वर जाउन बसेल म्हणुन. मग माझ मन मुद्दामुणच आपण ज्या Drawer मधे फोटोंचा Album ठेवला आहे त्यातच एखादा महत्वाचा कागद शोधू लगत  आणि हळूच तो Album काढुन त्यातले आपले लहानपणिचे फोटो बघत बसतो आणि कधी मन गहिवरून येत कळत ही नाही. हे अस तुमच्या बरोबर ही होत ना हो..?
       बरच आधी घर सुटल पुण्यात आलो, पहिला शिक्षण मग नौकरी. बघता बघता हातातुन वाळू सारखी वेळ सुटत गेली आणि बरीचशी मस्ती तिच्या सोबत करायची राहुनच गेली. उद्या ती तिचा आयुष्याच्या जोड़ीदार बरोबर निघून जाणार आणि आमची मस्ती करणारी, धिंगाना घालणारी आमची चिमुरडी एक जबाबदार गृहिणी होणार. नको वाटत हो हे मोठेपण अस वाटत "परत ते लहानपण देगा देवा."

Monday, January 31, 2011

होय, मुंबई आम्ही विकत घेतलीय!

मुंम्बा नगरी कोणाची हा वाद महाराष्ट्राला काही नवीन नाही जो तो येउन हिला आपलीच जहागीर दारी सांगतो, पण मुंबई ही महाराष्ट्राचिच कशी ह्यावर प्रकाश टाकणारा "प्रतिमा जोशिंचा" एक लेख नुकताच "महाराष्ट्र Times" मधे प्रकाशित झाला होता.
तो ख़ास "रणसंग्राम" च्या वाचकांसाठी इथे पुन्हा प्रकाशित करतोय.

मुंबई नगरी ही पहिल्यापासूनच बहुभाषी असली आणि तिच्या उभारणीत नि जडणघडणीत मराठ्यांसह सर्व प्रांतीयांचा वाटा असला , तरी तिचे अव्वल भौगोलिक  स्थान आणि प्राचीनत्व हे निखळ मराठी आणि मराठीच आहे. महाराष्ट्राला गुजरातशी सयामी जुळ्यासारखे जोडून द्वैभाषिक राज्य चालवण्याचा केंदाचा हेका महाराष्ट्रीयांनी मोडून काढला. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण केला. आणि गेली पन्नास वर्षे 'मुंबई कोणाची' हा प्रश्न सतत ऐरणीवर येत राहिला.
मुंबई फक्त मराठ्यांचीच नव्हे तर सगळ्यांची, इथपासून ते 'मुंबई तुमची, भांडी घासा आमची' म्हणण्यापर्यंत कटुता ताणली जात असते. मुंबई हे दक्षिण आशियाचे इकॉनॉमिक हब होण्यापर्यंतची घोडदौड ही परप्रांतीयांच्या भांडवलामुळे झाली असे उदाहरणांसकट मांडले जाते. पैसा, भांडवल हे शब्द नुसते ऐकले तरी मराठी माणसाला विनाकारण हुडहुडी भरते. किंबहुना पैसा आणि मराठी हे दोन विरुद्धाथीर् शब्द असल्यागत आपली वाटचाल चालू असते. त्यामुळे भांडवलवाल्या अमराठी माणसांसमोर मराठी माणसे कायम न्यूनगंड घेऊन वावरत असतात. रस्त्यावरच्या राड्यांमागेही हाच न्यूनगंड असतो.
पण याच महाराष्ट्राने मुंबईसह स्वतंत्र राज्य म्हणून जन्माला येण्यापोटी गुजरातला चक्क कोट्यवधी रुपये मोजले

Tuesday, January 11, 2011

खरच FACEBOOK बंद होते येत्या १५ तारखेला?

अचाणक सकाळी मेल बॉक्स मधे एक मेल येवून आदळला...
that was really a shocking News. काय तर म्हणे FACEBOOK येत्या १५ तारखेला बंद होणार. News या Website वर आली होती.(http://weeklyworldnews.com/headlines/27321/facebook-will-end-on-march-15th/ ). News वाचली आणि लोकांच्या Comment वाचल्या अणि म्हटल, खरच हे बाद होते की काय? प्रतेक मिनिटाला एक comment त्यावर update होत होती. ही News अगदी वार्या सारखी सगळी कड़े पसरली होती. पण जेव्हा लगेचच Google वर search केल  की "FACEBOOK  IS SHUTTING DOWN ?" आणि खरी गोष्ट समोर आली, की हे सगळ Fake आहे म्हणुन. हा सपूर्ण प्रकार फक्त वेबसाइट वर Hits वाढवण्यासाठी केल्या गेलेली चिप Publicity म्हणता येइल.
एकंदर काय तर काही काळजी कराची गरज नाही FACEBOOK  कधीही बंद होणे शक्य, त्या FACEBOOK  च्या जन्मदात्या "MARKs" ला जरी वाटल तरी ते शक्य नाही. आज FACEBOOK प्रतेक युवा पिढीच्या च्या रक्तात भीणलय. पहिल्या काळ!त माणवाच्या प्राथमिक गरजा म्हणुन "अन्न,वस्त्र,व निवारा" ह्या गोष्टी आठवायच्या. पण

Saturday, January 8, 2011

हिंदूह्रदय सम्राट.. (२३ जानेवारी निम्मित्त ख़ास)

  हिंदूह्रदय सम्राट म्हणजे हिंदूंच्या हृदयावर अधिपत्य गाजवणार सर्व शक्तिमान असा राजा, आणि हे पद कुठल युद्ध जिंकुन घेता येत नाही तर लोकांची मन जिंकुन मिळवल्या जात. कुठल्या ही राज्यावर राज्य करण सोप आहे पण एखाद्याच्या मनावर त्याच्या हृदयावर अधिराज्य गजवान तेवढच कठीण. आजपर्यंत च्या इतिहासात बघीतल तर हिंदुनी कुन्याही येरागैरा ला हे पद दिलेल नाही, राम आणि कृष्णाच्या ह्या हिंदू राज्यात जेव्हा परकीय शक्तीचा आतंक मजला होता तेव्हा श्री कृष्णानी गीते मधे म्हटल्या प्रमाणे
"यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मान.म सृजाम्यहम
परित्राणाय साधुनाम विनाषाय च दुष्कृताम
धर्म संस्थापनार्थाय स.म्भवामि युगे युगे"

Wednesday, January 5, 2011

Google चे अंतरंग

Google सध्या सगळयांच्या ओठांवर असलेल एक नाव, Google हे एक Seacrh Engine म्हणुन जन्माला आल, त्याची जन्मापासून ची कहानी सांगणार एक पुस्तक मार्केट मधे available आहे, Google च्या निर्मात्यानी त्याची आत्मकथा म्हणुन Google Story हे  पुस्तक वाचकांसाठी प्रकाशित केल आहे, त्या मधे Google चा जन्म कसा झाला, त्याला Google हेच नाव कस आणि का पडल हे खुपच रंजक प्रकारे मांडल आहे. कधी वेळ मिळालाच तर नक्की वाचा.
     Google चा जन्म जरी Seacrh Engine  म्हणुन जरी झाला असला तरी आज Google च क्षेत्र खुप मोठ्या प्रमाणावर पसरल आहे. आज Google चा mail Services मधे Gmail, Social Networking मधे Orkut, Blogging मधे Bloggers.com, Chaating मधे Gtalk, नवनवीन Vidios बघायचे असतील किंवा आपले Upload करायचे असतील तर Google च्या You-Tube सारख option तुम्हाला आणखी कुठे मीळणार. तसेच Vidio बरोबर Photography चा तुम्हाला शौक असेल तर मग Picasa ला तोड़ नाही. त्यानंतर Google-Maps किंवा Google-Earth वापरून तुम्ही जगातील हव्या त्या जागेची Satelite-Futage बघू शकता ते ही घर बसल्या.. अश्या अनेक Services Google नी Provide केल्या आहेत. आणि आज त्या सगळ्या Services नी अफाट प्रसिद्धी प्राप्त केली आहे.
          Google बद्दल आणखी काही जनून घेण्याची इच्छा आहे का? तर मग चला "Google के सफ़र पे". आज पर्यंत आपण फक्त Google ची पुढची screen बघत आलोत जिथे फक्त मोठ्ठ अस GOOGLE नाव लिहिलेल असत आणि खली एक Search Box असतो. पण त्या दिवशी जेव्हा मी Google च्या sign in वर क्लिक केल आणि माझा Gmail user id आणि password टाकला आणि google च अंतरंग बघू शकलो.