विवाहबाह्य संबंध असणाऱ्यानो सावधानविवाहबाह्य संबंध म्हणजे विवाहसंस्थेच्या पावित्र्यावर केलेला घाला आहे. विवाहित पुरुषाशी संबंध ठेवणाऱ्या महिलांवरही गुन्हा दाखल झाला पाहिजे..विवाहाचे पावित्र्य टिकविण्यासाठी विवाहबाह्य संबंधांना गुन्हा मानायला हवे, जर अशा संबंधांविरोधात दंडात्मक कारवाई केली नाही, तर विवाहबाह्य संबंध समाजात मोकाटपणे निर्माण होतील. या गुन्ह्या बाबत भारतीय दंड विधानात एक कलम आहे.. परंतु ह्या कलाम मध्ये पुरुषावरच कायदेशीर कारवाई होऊ शकते... स्त्री वर नाही म्हणून ह्या कलमा मध्ये सुधारणेची गरज आहे असे वाटते..
काय आहे कलम 497 ?
विवाहित असूनही विवाहबाह्य शारीरिक संबंध ठेवल्यास तो कायद्याने गुन्हा ठरतो. हा कायदा ब्रिटिशकाळापासून अस्तित्वात आहे. विशेष म्हणजे, या कायद्यानुसार विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्या पुरुषावरच कायदेशीर कारवाई होऊ शकते. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार, विवाहबाह्य संबंधांमध्ये पुरुष हा घुसखोर असून, तो परस्त्रीवर हक्क दाखवतो. भारतीय महिला अशा प्रकारच्या संबंधांमध्ये विश्वास व स्वारस्य घेत नाहीत, असे समजून त्यांना संरक्षण देण्यासाठी प्रामुख्याने या कलमाचा वापर केला जातो, असे सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण आहे. हा जामीनपात्र गुन्हा असून, पाच वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे.
भारतात सेक्सबंदी?
"' कामसूत्रा ' च्या माध्यमातून सा-या जगाला सेक्सचे धडे देणा-या भारतात आजही हा ' विषय ' खुल्या मनाने स्वीकारला जाताना दिसत नाही. म्हणूनच Yahoo आणि मायक्रोसॉफ्टसारख्या इंटरनेट कंपन्यांनी गुप्तपणे भारतातल्या युझरसाठी गुप्तपणे फिल्टर लावले आहेत.
गेल्या महिन्याभरात Yahooने आपल्या सर्च इंजिनमध्ये, याहूच्याच फ्लिकर या फोटोशेअरिंग साइटमध्ये तसेच मायक्रोसॉफ्टने आपल्या बिंग या सर्च इंजिनमध्ये केलेल्या बदलामुळे सेक्सविषयक मजकूर वगळला जाणार आहे. अश्लीलतेला आळा घालणा-या माहिती तंत्रज्ञान कायदा-२००० च्या आधारे हे बदल करण्यात आल्याचे या कंपन्यानी म्हटले आहे.
एकीकडे या मोठ्या कंपन्यांनी ही सेक्सबंदी सुरू केली असली तरी त्यातून पळवाटा निघणारच.
मायक्रोसॉफ्टच्या बिंग या सर्च इंजिनमध्ये जर तुम्ही काही तरी अश्लील शोधायला गेलात तर 'your country or region requires a strict Bing SafeSearch setting, which filters out results that might return adult content' असा निरोप दिसेल."
ही वरील बातमी MaharashtraTimes मधे वाचली आणि वाटल बाकीचे सेक्सबंदी अनातायेत म्हणुन की काय ते MaharashtraTimes वाल्यानी ती उठावण्याचा पुढाकार घेतलेला दिसतोय. विश्वास बसत नसेल तर ह्या वर्तमान पत्राची फोटो gallary उघडून बघा, काय खजिना सापडतो ते... ह्याच PhotoGallary मधे "विदेशी मॉडल" नावाच सदर उघडा तीथे हवे हवे ते फोटोस तुम्हाला नको नको त्या अवस्थेत दिसतील. या व्यतिरिक्त आणखी कही हव असेल तर Google वर 89.com किंवा mud Fight या सारखे Keyword टाकुनही तुमची हौस भागउ शकता.
No comments:
Post a Comment