भ्रष्टाचाराची कीड हि सध्या संपूर्ण जगावर पसरली आहे. ह्या रोगाची लागण भारताला कधी झाली हे सांगण जरा कठीणच पण आज ती इतकी खोलवर रुजली आहे कि संपूर्ण समाज व्यवस्था ह्या रोगाने पोखरून टाकली आहे.ह्या भ्रष्टाचार-नावाच्या रोगा साठी बरेच कायदे करून लसीकरण करण्याचा प्रयत्न केला गेला पण काहीही उपयोग झालेला दिसला नाही. आता हा साधा रोग राहिला नसून त्याने महाकाय रूप धारण केल आहे. काल पर्यंत लहान सहान ठिकाणी छोट्या प्रमाणावर भ्रष्टाचार सगळी कडे होता. पण आज घोटाळ्यांचे आकडे बघितले तर आकडी येईल. रोज नवी बातमी, ४०० कोटी चा घोटाळा, 7०० कोटी, १००० कोटी, १लाख कोटी या वरूनच कळत की हि साधी कीड भस्मासुर बनली आहे. हा भ्रष्टाचाराचा भस्मासुर आज आ-वासून उभा आहे, आणि आपल्या हक्काची आणि कष्टाची कमाई गिळंकृत करण्यासाठी तत्पर उभा आहे.
भ्रष्टाचार हि समस्या आपल्याला काही नवीन नाही, आपल्या देशात मुल आईच्या पोटात असताना पासून त्याच्या वर ह्याचे संस्कार होत असतात. दवाखान्यात भारती करण्यापासून तर जन्माचा दाखला बनवण्या पर्यंत सगळी कडे पैसा लागतोच. त्यानंतर त्याच्या शाळेची Admission असो किंवा महाविद्यालयाची, फीस बरोबर Donesion हा प्रकार येणारच. शिक्षण झाल्यावर नोकरी मिळवण्यासाठी सुद्धा पैसा. लहानपणा पासून होत असलेल्या ह्या भ्रष्टाचाराच्या संस्कारामुळे हा भ्रष्टाचार आता आपल्या रक्तात भिनला आहे. येवढा खर्च करून मिळालेल्या नौकरीतूनच अधिक भ्रष्टाचार करून त्याची भरपाई केली जाते.
लहानपणी एक म्हण ऐकली असेलच "एक बोट एखाद्या कडे दाखवताना तीन बोटं आपल्या कडे असतात" सांगण्याच तात्पर्य हेच की एखाद्याला भ्रष्टाचारी म्हणत असतांना हा विचार पहिला असवा की आपण त्यात मोडत नाही ना? आणि जर उत्तर हो मिळाल तर गप्प बसू नये, उगाच अस मन बनवून घेऊ नये की आपणही भ्रष्टाचार केला आहे मग आपल्याला इतरांवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही म्हणून. अश्या वेळेस सारासार विचार करण्याची गरज आहे. झालेल्या चुकीच प्रयाचीत्त करा परत हि चूक भविष्यात चुकूनही होणार नाही याची शपथ घ्या आणि त्यावर ठाम राहा आणि समोर दिसणाऱ्या प्रत्येक लहान मोठ्या भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवा. जर "वाल्या" चा "वाल्मिकी" होऊ शकतो तर आपले गुन्हे हे क्षम्य आहे. परंतु ह्या चुका परत होणार नाही याची काळजी घेण हि गरजेच आहे.
जर अश्या प्रकारे प्रत्येकाने स्वतः पासून सुरुवात केली तर भ्रष्टाचाराचा मुळ पायाच नष्ट होईल. एकदा हे खाच्चीकरण झाल तरच ह्या भस्मासुराचा अंत होण्यास हातभार मिळेल. आज ह्या भस्मासुराला कुठला हि अनुअस्त्र नष्ट करू शकत नव्हत परंतु "अण्णाअस्त्र" मात्र ह्या वर भारी पडताना दिसतंय. जो भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर होतोय खास करून राजकारणात त्या वर हे अण्णाअस्त्र नक्कीच अंकुश ठेऊ शकेल अशी आशा आहे. अण्णा हजारे हे नाव महाराष्ट्राला काही नवीन नाही अनेक मोठे अधिकारी, सत्ताधारी राजकारणी ह्यांनी ह्या आधीच अण्णांचा धसका घेतला आहे. उदा. जळगाव चे आमदार सुरेश जैन ह्यांना तर अन्नांमुळे आपल पद आणि पक्ष दोन्हीही गमवाव लागलाय. अशी बरीच उदाहरण अण्णांनी महाराष्ट्रात उभी करून ठेवली आहे. आता हे छोट वादळ केंद्रात हल्लकल्लोळ माजवतोय.
जन लोकपाल बिल साठी चाललेला रणसंग्राम संपूर्ण जागाच लक्ष वेधून घेतोय, सरकार नि पारित केलेल्या लोकपाल विरुद्ध जनलोकपाल असा सामना रंगलाय, परंतु ह्यात सामील झालेल्या प्रत्येकाला नक्की माहिती आहे काय हे लोकपाल आणि जन-लोकपाल म्हणजे आहे काय?
त्यासाठी या दोन्हींमधील फरक स्पष्ट करणारे हे काही निवडक मुद्दे -
जनलोकपाल विधेयक -
१) सात जणांच्या लोकपाल खंडपीठाच्या परवानगीनंतर पंतप्रधानांचीही चौकशी होऊ शकते
२) न्यायव्यवस्थाही लोकपालाच्या अधिकारक्षेत्रात येईल. काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चौकशीसाठी लोकपाल खंडपीठाची परवानगी आवश्यक
३) खासदारांची चौकशी लोकपाल खंडपीठाच्या परवानगीनंतर करता येऊ शकते
४) सर्व प्रशासकीय व्यवस्था लोकपालाच्या अधिकारक्षेत्रात येईल
५) केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) लोकपालाअंतर्गत येईल
सरकारी विधेयक -
१) पंतप्रधान लोकपालाच्या अधिकारक्षेत्रात येणार नाहीत
२) न्यायव्यवस्था लोकपालाच्या अधिकारक्षेत्राबाहेर. न्यायव्यवस्थेसाठी न्यायालयीन उत्तरादायित्त्व विधेयक हे वेगळे विधेयक मांडले जाईल
३) खासदारही लोकपालाच्या अधिकारक्षेत्रात येतील, परंतु त्यांचे संसद सभागृहांतील वर्तन (उदा. मतदान) यांची चौकशी होऊ शकत नाही
४) केवळ वरिष्ठ पातळीवर प्रशासकीय अधिकाऱ्यांचा समावेश लोकपालाच्या अधिकाक्षेत्रात
५) केंद्रीय अन्वेषण विभाग लोकपालाअंतर्गत येणार नाही
ह्या बद्दल अधिक माहिती साठी इथे संपर्क साधा www.annahazare.org/ आणि http://www.indiaagainstcorruption.org/downloads.हटमल
हे मुद्दे लक्षात घ्या आणि पेटू द्या भ्रष्टाचाराच्या भस्मासुर विरुद्ध रणसंग्राम.... हल्ला बोल.....
No comments:
Post a Comment