Thursday, September 24, 2009

विदर्भ म्हटलं कि ?

विदर्भ म्हटलं कि आठवत ते फक्त शेतक-यांची आत्महत्या, दुष्काळ, तपतं उन्हं,आणि कुपोषण. खरचं येवठ्यातच सामावलय का हो विदर्भ? नाही, जिच्या पोटी शिवबा जन्मला, जिच्या संस्कारामुळे त्याने महाराष्ट्र घडवला, ति जिजाऊ विदर्भाने दिली, अशिच एक विदर्भ कन्या जिने श्रिक्रुष्णाचा संसार फुलवला ती रुख्मिणिमाता, हे आणि या पेक्षाही ईथे बरचं काही आहे. महाराष्ट्राचा नव्हे तर भारताचा एक विभ्भिन्न अंग आहे. महाराष्ट्राचा पुर्व भाग व देशाच्या मध्यभागी आसलेला प्रदेश विदर्भ म्हणुन ओळखला जातो. विदर्भ हा दोन भागात विभागलेला आहे. नागपुर आणि अमरावती विभाग, नागपुर,अमरावती,अकोला ही विदर्भातील सगळ्यात मोठी महत्वाची शहरं आहेत. ही झाली विदर्भाची प्रार्थमिक माहीती, आता बघुया काय खास आहे विदर्भात?
विदर्भाचा इतिहास:
भगवान श्रीक्रुष्णाला भुरळ घालणारी त्यांची पट्टराणी माता रुख्मिणि ही विदर्भ कन्या, रुख्मिणि हरणाची ऎतिहासिक घटणा विदर्भातील उम्रावतीत(सध्याचे अमरावतीत) घडली, विदर्भातिल राजघराण्यांची वंशवाळ फार मोठि आहे. भिष्मक राजा त्याचा पुत्र दक्ष,त्यांचे वंशज बुद्धभानू हलदर,पछाकर,रिमुपमर्दन,चित्रसेन,भिम,दम्मनंद,भोज,क्रम आणि कौशिक हे भाऊ क्रम चा नातु भिष्मक व त्याचि मुलगी रुख्मिणि. त्यानंतर १८ व्या शतकातकाआधी नागपुर ही भोसल्यांची राजधानी होती. नंतर स्वातंत्रसग्रामातही विदर्भाने वेगळ स्थान बनवल. विदर्भातील सेवाग्राम गांधीवाद्यांसाठी राजधानी होती. स्वातंत्रा नंतर विदर्भ मुबंई महाराष्ट्रात विलिन झाला.
भौगोलिक:सातपुडाच्या पर्वत रांगा विदर्भा जवळ आहे पण मोठ्या प्रमाणात टेकड्या ईथे आढळत नाही. ऎथील मेळघाट जंगल व चिखलदरा हे प्रेक्षनिय स्थळे आहेत. चंद्रपुरातील ताडोबा जंगल सुद्धा पाहाण्या सारखं आहे. जगातील आश्चर्य असणारे खारं पाण्याच सरोवर बुलठाणा जिल्हात लोणार ईथे आहे. वैनगंगा हि सगळ्यात मोठि नदी आहे.

शेती:
शेती मात्र विदर्भातली तेवठी प्रगत नाही आहे, इथे संत्री व कापुस प्रमुख पिक आहे. ऎथिल संत्री जगभर प्रसिद्ध आहेत.
खनिज संम्पत्ती :
सगळ्यात जास्त कोळश्याच्या खाणि चंद्र्पुर,गडचीरोली,भंडांरा,नागपुर ईथे आढळतो. एकट्या चंद्र्पुरातुन २९% खणिज बाहेर पडत. व या पासुन ईथे विज निर्मिती केली जाते व महाराष्ट्र भर त्याचा पुरवठा होतो.
ऊद्योग:
मोठ्या प्रमाणात इथे ऊद्योग नाही, मात्र लवकरच मिहान प्रकल्प नागपुरात सुरु होणार आहे ज्याने भरपुर रोजगार निर्माण होइल. पर्यटन: चिखलदराचे पहाड, धबधबे, आणि निसर्ग रम्य परीसर, बरेचसे जंगलं ही व्याघ्र आरक्षीत असल्याने वाघही बघायला मिळतात. त्यानंतर पाहण्यासारखी ठिकाण म्हणजे शेगाव मधिल आनंद सागर, लोणार सरोवर, रामटेक मंदीर, जिजामतांच घर(सिंदखेडराजा),गाडगे माहाराज, तुकडोजि महाराज समाधी स्थळ, आमंबेडकरांची दिक्षा भुमि, अमरावति मधिल पौराणिक अंबामाता मंदिर. आणि बरचं काही.......
पर्यटन:चिखलदराचे पहाड, धबधबे, आणि निसर्ग रम्य परीसर, बरेचसे जंगलं ही व्याघ्र आरक्षीत असल्याने वाघही बघायला मिळतात. त्यानंतर पाहण्यासारखी ठिकाण म्हणजे शेगाव मधिल आनंद सागर, लोणार सरोवर, रामटेक मंदीर, जिजामतांच घर(सिंदखेडराजा),गाडगे माहाराज, तुकडोजि महाराज समाधी स्थळ, आमंबेडकरांची दिक्षा भुमि, अमरावति मधिल पौराणिक अंबामाता मंदिर. आणि बरचं काही........
पौराणिक महत्त्व:
ईथे आगस्थ आणि लोपमुद्रेचं लग्न झालं, रुख्मिणि हरण झालं, आणि नल-दमयंतिची कथा हि इथेच घडली, कलिदासाने "मेघदुत" ईथेच रचिला,रामायनातही विदर्भाचा उल्लेख आहे. ऎथिल रामटेकचे राम मंदिर पहाण्यासारखे आहेत. त्यानंतर, बरेच साधु संत ईथे होवुन गेलेत, जसे कि संत श्रेष्ठ श्रि गजानन महाराज(शेगाव), राष्ट्रसंत श्रि तुकडोजी महाराज,स्वछतेचा मंत्र सांगणारे श्रि गाडगे महाराज.
माणसं:
विदर्भातिल माणसांनि जगभर आपल्या क्षेत्रात नाव कमावलयं. उदा. जमनालाल बजाज, माहादेव सदाशिव गोलवलकर के.बी.हेडगेवार(राष्ट्रिय स्वयंम सेवक संघ),विनोबा भावे,बाबा आमटे(महान समाज सेवक),राम गणेश गडकरी(कवि,लेखक),प्रतिभा पाटील(सद्याच्या राष्ट्रध्यक्षा),विक्रम पंडित(अध्यक्ष सिटी ग्रुप),पंजावराव देशमुख, सुरेश भट(मराठीत गझल चा आविष्कार करणारे),सुब्रमानिअम रामादोराइ, सि.के.नायडु, एस.के.वानखेडे,नितिन गडकरी, ई........
हा विदर्भाचा थोडासा आढावा घेण्याचा प्रयत्न आणि याहुन आधिक विदर्भात बरचं काही आहे या पहा आणि अणुभव घ्या. या विभ्भिन्न अंगाने नटलेल्या विदर्भाचा आणि पेटु द्या रणसंग्राम ईथल्या अधिकधिक विकासासाठी................
हल्ला बोल…………..

No comments: