Ressesion ची टांगती तलवार, महागाई चा भुकंप, आणि भ्रष्टाचाराचा आ वासून उभा असलेला भस्मासुर.
ह्या सगळ्या विळख्यात अडकलेला आपल्या सारखा अनेक जबाबदार्यांचं वेताळ भूत मानगुटीवर घेऊन फीरणारा एक सामान्य माणूस. अश्या वेळी नवीन घर घेण्याची वेळ त्यावर आली कि त्याच्या पायाखालची जमीन नक्कीच सरकणार. कारण एक जुनी म्हण आहे कि "लग्न पाहावं करून आणि घर पाहावं बांधून" आज तशी घर बांधायची जवाबदारी बिल्डर लोबीने उचलली आहे आपल फक्त काम उरलय ते विकत घेऊन EMI भरायचं.....