हिंदूह्रदय सम्राट म्हणजे हिंदूंच्या हृदयावर अधिपत्य गाजवणार सर्व शक्तिमान असा राजा, आणि हे पद कुठल युद्ध जिंकुन घेता येत नाही तर लोकांची मन जिंकुन मिळवल्या जात. कुठल्या ही राज्यावर राज्य करण सोप आहे पण एखाद्याच्या मनावर त्याच्या हृदयावर अधिराज्य गजवान तेवढच कठीण. आजपर्यंत च्या इतिहासात बघीतल तर हिंदुनी कुन्याही येरागैरा ला हे पद दिलेल नाही, राम आणि कृष्णाच्या ह्या हिंदू राज्यात जेव्हा परकीय शक्तीचा आतंक मजला होता तेव्हा श्री कृष्णानी गीते मधे म्हटल्या प्रमाणे
"यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मान.म सृजाम्यहम
परित्राणाय साधुनाम विनाषाय च दुष्कृताम
धर्म संस्थापनार्थाय स.म्भवामि युगे युगे"
म्हणजे, या धरती वर जेव्हा जेव्हा आतंक माजेल तेव्हा मी जन्म घेइल आणि ही कृष्ण वाणी खरी ठरली व जिजाऊ पोटी जन्मास आले "छत्रपति शिवाजी महाराज" ज्याना आपण "कल्कि अवतार" म्हटल तरी वावग ठरणार नाही. मरगळलेल्या हिंदुच्या मनात चेतना जागवणारा तो पहिला सम्राट, त्यानंतर हिंदू समाजाला गर्वाने मान उंचवायला लावणारे, गीतेच महत्व सातासमुद्रा पार नेणारे "स्वामी विवेकानंद", परत हिन्दुच्या ह्रदय सिंहासनावर आरूढ़ होण्याचा मान मिळाला तो म्हणजे इग्रजांशी दोन हात करत क्रांतिची लाट पसरवणाऱ्या आणि अखंड हिन्दुस्थानाच स्वप्न बघणाऱ्या "स्वतंत्रवीर सावारकराना".
आता मात्र देश स्वातंत्र झाला, आता सगळे सुखी सामाधानाने राहतील अस वाटू लागल, कुठलेही परकीय शत्रु उरले नव्हते. आता भारतीयांच राज्य आल होत. मात्र "पकिस्तान" नावाची किड भारताला सुधरू देणार नाही आणि त्याच्या जिहाद नावाच्या विकृत मनोव्रुत्तिला हिन्दुच नव्हे तर संपूर्ण माणवजातीला जामोरे जाव लागेल हे कुणाला माहिती होत. त्यातही निवडून दिलेल सरकार हे निष्क्रिय असेल त्यात भर म्हणजे मतांसाठी अल्प्संख्याकाचे नको ते लाड पुरवले जातील याची कल्पनाही कोणी केली नव्हती. आता एकटा पडला होता तो म्हणजे फक्त हिदू. यात साथ कोणाची लाभणार कारण कुणी लायक मनुष्य सापडने कठीण, त्यातच मराठी माणसासाठी त्यांच्या हक्कांसाठी लठणारी संघटना जन्माला आली, ८०% सामाजकारण आणि २०% राजकारण हा फ़ॉर्मूला डोक्यात ठेवून हे संघटन
काम करत होत, मात्र ही संघटना छत्रपति शिवाजी महाराजांच्या अदर्शावर सुरु झालेली संघटना असल्या करणाने मराठी बरोबरच देशातल्या एकट्या पडलेल्या हिंदुना साथ देणे ही सुद्धा धेय ठरल. आणि महाराष्ट्रात "मराठी" आमचा प्राण तर देशात "हिंदू" आमचा श्वास आस म्हणत शिवाजी महाराजांची ही सेना "शिवसेना" अखंड भारतात "मराठी" व "हिंदू" च्या रक्षणासाठी व उद्धारासाठी कार्यान्वित झाली. आणि या वेळी हिन्दुच्या ह्रदय सिंहासनावर आरूढ़ होण्याचा मान मिळाला तो "हिंदूह्रदय सम्राट मा. शिवसेना प्रमुख बाळा साहेब ठाकरे" यांना.
1 comment:
Super like
Post a Comment