भ्रष्टाचाराची कीड हि सध्या संपूर्ण जगावर पसरली आहे. ह्या रोगाची लागण भारताला कधी झाली हे सांगण जरा कठीणच पण आज ती इतकी खोलवर रुजली आहे कि संपूर्ण समाज व्यवस्था ह्या रोगाने पोखरून टाकली आहे.ह्या भ्रष्टाचार-नावाच्या रोगा साठी बरेच कायदे करून लसीकरण करण्याचा प्रयत्न केला गेला पण काहीही उपयोग झालेला दिसला नाही. आता हा साधा रोग राहिला नसून त्याने महाकाय रूप धारण केल आहे. काल पर्यंत लहान सहान ठिकाणी छोट्या प्रमाणावर भ्रष्टाचार सगळी कडे होता. पण आज घोटाळ्यांचे आकडे बघितले तर आकडी येईल. रोज नवी बातमी, ४०० कोटी चा घोटाळा, 7०० कोटी, १००० कोटी, १लाख कोटी या वरूनच कळत की हि साधी कीड भस्मासुर बनली आहे. हा भ्रष्टाचाराचा भस्मासुर आज आ-वासून उभा आहे, आणि आपल्या हक्काची आणि कष्टाची कमाई गिळंकृत करण्यासाठी तत्पर उभा आहे.