Friday, August 12, 2016

आधुनिकता मनोरंजनाची

दिवसागणिक आधुनिकतेच्या जोडीने सतत नावीन्यपूर्ण पद्धतीने वाढत असलेलं क्षेत्र म्हणजे करमणूक आणि मनोरंजनाचे क्षेत्र. कुण्याकाळी राजदरबारांमध्ये राजाश्रयाने मनोरंजनाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढीस आले, नवनवीन प्रयोग घडत गेले, त्या काळातील कलेची जाण असणाऱ्या राजा माहाराजांनी कलाकारांना मोठं केलं. संगीत, नाट्य, नृत्य, खेळ अश्या अनेक कला-गुणांना वाव मिळाला.   
त्यांनतर हेच मनोरंजनाचे क्षेत्र राजदरबारातून बाहेर येत जनसामान्यात मिसळलं वगनाट्य, पथनाट्या द्व्यारे मनोरंजना सोबतच समाज प्रबोधन आणि क्रांतिकारी चळवळी च माध्यम बनलं. 
ब्रिटिश काळापासून ह्या क्षेत्राला तंत्राद्यानाची जोड मिळाली, रेकॉर्ड-प्ल्येयर, रेडिओ, ट्रान्सिस्टर, वरून मनोरंजन हे घराघरात पोहचलं. त्याच काळात तंम्बुत पडद्यावर दाखवला जाणारा सिनेमा इंग्रजांनी भारतात आनला, त्यावर दादासाहेब फाळके नावाच्या अवलियाची नजर पडली आणि भारतीय चित्रपट श्रुष्टिचा जन्म झाला. 
त्यांनी "राजा हरिशचंद्र" हा भारतातील पहिला मूकपट बनवला आणि भारतीय मनोरंजन क्षेत्राची व्याप्ती अजून विस्तृत केली. 
कालांतराने त्यात आवाज आला मग रंग आलेत आणि 70mm पडद्यावर इस्टमन कलर सहित अनेक कलाकार हे स्टार आणि सुपरस्टार झालेत.
1965 नंतर दृश्य स्वरूपातील मनोरंजन घराघरात पोहचवण्यासाठी Television म्हणजेच दूरदर्शन ने मोलाचा वाटा उचलला. त्यावर येणाऱ्या बातमीपत्र, मालिका सहित जाहिरातींनी सुद्धा जनमाणसाच्या मनावरती छाप उमटवली.
कालांतराने त्यात आवाज आला मग रंग आलेत आणि 70mm पडद्यावर इस्टमन कलर सहित अनेक कलाकार हे स्टार आणि सुपरस्टार झालेत.
1965 मध्ये सुरु झालेला आणि 1980 नंतर दृश्य स्वरूपातील मनोरंजन घराघरात पोहचवण्यासाठी Television म्हणजेच दूरदर्शन ने मोलाचा वाटा उचलला. त्यावर येणाऱ्या बातमीपत्र, मालिका सहित जाहिरातींनी सुद्धा जनमाणसाच्या मनावरती छाप उमटवली. दूरदर्शन वरील काही मालिका ह्या जगातील Television इतिहासातील सर्वाधिक बघितल्या गेलेल्या मालिका आहेत ज्यामध्ये महाभारत, रामायण, कृष्णा सारख्या पौराणिक मालिकांचा समावेश आहे. त्याव्यतिरीक्त प्रेक्षकांच्या मनावर आरूढ होणाऱ्या मालिका म्हणजे अलिफ-लैला, विक्रम वेताळ, ब्योमकेश बक्षी, फौजी, सर्कस, मालगुडी डेस, देख भाई देख आणि सर्वांचं लाडका शक्तिमान अश्या अनेक मालिका त्या काळात प्रसिद्धीचे रेकॉर्ड ब्रेक करत होत्या. आज 800 हुन अधिक TV_Channels उपलब्ध आहेत ज्यात अनेक भाषणांमध्ये 
मनोरंजनाचे कार्यक्रम लोकांपर्यंत पोहचवले जातात. 

मनोरंजनाच्या व्याप्तीच कारण ठरलं ते म्हणजे तंत्राद्याना मधला बदल. आणि त्याबदलाला आत्मसात करत मनोरंजन क्षेत्र अजून व्यापक होत गेलं. सुरवातीला फक्त पडद्यावर बघायला मिळणाऱ्या मनोरंजनाच्या गोष्टी घराघरात TV बघायला मिळू लागल्यात आणि आता तर त्या तुमच्या आमच्या खिश्यात म्हणजेच आपल्या मोबाईल फोन च्या स्क्रिन वर सुद्धा उपलब्ध झालेत.. आज Google च्या Youtube वर अनेक Channels उपलब्ध आहेत जे तुमच्या आमच्यातल्याच कलाकाराने स्वतः बनवून सगळ्याच्या मनोरंजना साठी सादर केले आहेत.. 
ज्याच्या मध्ये कलाकार दडलेला आहे परंतु संधी मिळत नाही अश्याना जगासमोर कला सादर करण्यासाठी  Youtube हे उत्तम प्लॅटफॉर्म आहे. मात्र आज Youtube नवीन कलाकारांसोबतच जुने जाणते कलाकार हि मनोरंजनाचा धुमाकूळ घालताना आपण बघतोय.. सध्या च्या घडीला भारतातील Youtube वर भरपूर प्रसिध्द्वअसलेले Channels म्हणेजच  TVF (the viral fever), AIB , Pretentious movie review , 
हा fever सध्या मराठीत हि चढलेला दिसतोय त्यात सगळ्यात फेमस होतोय तो म्हणजे BaDiPa channel चा Casting Couch with अमेय and निपुण  हा शो. त्यांनतर पसंतीस पडतोय तो संतोष आणि कुशल चा struggler_saala अशे इतरही शो प्रेक्षांसाठी त्यांच्या मनोरंजना साठी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत.   
भारतात Vines हा प्रकार सुद्धा BB ki vines ने खूप प्रसिद्ध केला.. मराठीतही हा प्रयोग काही अंशी झालेला दिसतोय.
अश्याच प्रकारे जसजसा नवनवीन गोष्टी समोर येतील तासतशे मनोरंजन क्षेत्र ते आत्मसात करत अप्लाय व्याप्ती वाढवत राहील.

Thursday, August 4, 2016

मुख्यमंत्री महोदय "ऑडिट" चेही ऑडिट करा...

"कोकणात पूल कोसळून दुर्घटना झाल्यानंतर राज्यातील सर्वच पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय जाहीर झाला असताना, मुंबई महापालिकेनेही मुंबईतील ३१४ पुलांची तपासणी करण्याची कार्यवाही सुरू केली आहे."-- एक बातमी 

गेल्या काही वर्षात प्रत्येक वृतु मध्ये काही ना काही तरी  घडताना आपण बघतो आहोत.
हिवाळ्यात थंडीने बळी जातात तर उन्हाळ्यात उष्मघाताने. 
उन्हाळ्यात दुष्काळ पडतो, पिण्याच्या पाण्यासाठी वन-वन भटकावं लागत.
त्यात राजकीय वातावरण तापत, मग रेल्वेनी पाणी पाठवलं जात, आणि पुन्हा घोषणा आणि आश्वासन दिली जातात कि पाट-बंधार्याचं काम नीट झालं नसल्याने हि वेळ आली. आता जिथे नीट कामे झाली नाहीत त्या सगळ्यांचं "ऑडिट" करण्यात येईल. मग पावसाळा येतो आणि उन्हाळ्यातील पाट-बंधार्याचं आणि इतर "ऑडिट" ची चर्चा हि पुढील उन्हाळ्या साठी स्थगित होते.
आता पावसाळ्यात सगळं नीटच होणार असं चित्र दिसत, त्यात मुंबई-महाराष्ट्राच्या रस्त्यांवरील खड्ड्यांचे  छोटे मोठे वाद, आरोप-प्रत्यारोप चालू होतात आणि त्यावर हि तोडगा निघतो ते म्हणेज चॊकशी आणि "ऑडिट". हि चर्चा अजून चिघळणार त्यात इतर घडना घडून जातात त्या म्हणजे महामार्गावर कोसळणाऱ्या दरडी असोत वा रेल्वे चे सरकणारे रूळ मग त्याची परत सुरु होते ती म्हणजे चॊकशी आणि "ऑडिट". ह्या चॊकशी आणि "ऑडिट" मध्ये अधिकारी आणि प्रशाषण व्यस्त असत तेवढ्यात माळीण गावालाच पाहाडाने गिळणंकृत केल्याची माहिती मिळते. मग मागणी होते कि अजून असे किती गाव पायथ्याशी वसले आहेत जे धोकादायक स्थिती मध्ये आहेत त्याची चौकशी झाली पाहिजे आणि त्यांच्यासाठी सुरक्षेच्या योजना राबवल्या पाहिजेत. मग वरून एक आदेश येतो कि ह्या सगळ्या गावाची चौकशी आणि "ऑडिट" करा.. आणि सुरु होते पुन्हा चौकशी आणि नवीन "ऑडिट".
आता ह्या भरीत भर म्हणेज महाड मध्ये झालेली ह्या वर्षीची घटना... 
ह्या घाटाने नंतर जीर्ण झालेल्या पुलांच्या "ऑडिट" चे आदेश सरकारने दिले नसते तर नवल. 
लगेचच चौकशी करून पुलांच्या "ऑडिट" करण्याचे निर्णय सरकार ने घेतला, मग ह्या आधी मार्च महिन्यात जे  ऑडिट महाड च्या आणि इतर पुलांचे ऑडिट केले होते ते काय होते?
हे ऑडिट झाल्यांनंतर हि जर पूल वाहून जातात तर मग आता त्या झालेल्या "ऑडिट" चे हि ऑडिट करण्याचे आदेश सरकार देणार का?
 जीर्ण झालेले वाडे, जुन्या इमारती, ब्रिटिशकालीन पुल, महामार्गावर कोसळणाऱ्या दरडी , वाहून जाणारे रस्ते, रेल्वेचे रूळ, नदीपात्रांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढणारे अतिक्रमण, बेकायदेशीर वृक्ष तोड, प्रदूषण  इतर बरच काही आपल्या समोर वाढून ठेवलं आहे, ज्याचे वेळेवर जसे ऑडिट होणे गरजेचे आहे तसेच त्यावर कठोर कारवाई करणे अत्यंत महत्तवाचे आहे.