Friday, September 16, 2011

वेडेच इतिहास घडवतात.. आणि अण्णा वेडे आहे..


खबरदार जर तुम्ही भ्रष्टाचार विरुद्ध बोलत असाल, उपोषण करत असाल, किंवा वंदे मातरम म्हणत असाल तर तुम्ही  जातीय वादी आहात तुम्हाला जातीयवादी संघटना साथ देत आहे (मग ती संघटना देशभक्त का असोना ) आणि भारतात हिंदू संघटनानाच जातीयवादी म्हटलं जात बाकी इतर  जातीयवादा च्या आधारावर उभारलेल्या  संघटना  ह्या धर्मनिरपेक्ष आहेत. ह्याच्या हि पुठे जाऊन जर  खालील प्रकारची पत्र तुम्ही सरकार ला पाठवत असाल तर मग तुम्ही वेडे आहात आणि देश द्रोही आहात हे लक्षात ठेवा.
सध्या असाच काही प्रकार आपल्या देशात सुरु आहे, महाराष्ट्रातल एक अस व्यक्तिमत्व ज्याचं नाव "कि.बा.हजारे" आहे ज्यांना लाडाने अण्णा म्हणतात, उपहासाने छोटा गांधी आणि टीकेने वाकड्या तोंडाचा गांधी म्हणून संबोधल जात ते छोट वादळ आज आपल्या केंद्र सरकार ला जाऊन भिडलंय.