म्हणजे IT Companies च माहेर घर, बरेच दिवसा पासून इच्छा होती तीथे जाण्याची, पण तसे योगच जुळत नव्हते. कारण तिथे जायचं म्हटलं तरी कुठल्या कारणाने, गेल्या नंतर रहाच कुठे, कारण तिथे कोणी ओळखीच हि नाही,
आमच्या काकांच्या तोंडून फार स्तुती एकली होती या शहराची, इथल्या IT Envornment बद्दल Lifestyle बद्दल, म्हणून इच्छा अधिकच तीव्र होत होती. पण वेळ आणि मार्ग नव्हता. योग्य वेळेची वाट बघण्या शिवाय पर्याय हि नव्हता, पण ते म्हणतात ना "सब्र का फल मीठा होता है." आणि Office तर्फे एका Testing Project साठी म्हणून आम्हाला Banglore ला पठवण्याची घोषणा झाली, आणि तेहि १, २ दिवसासाठी नहीं तर तब्बल ३ माहिण्यासाठी.
मी खुप आनंदात होतो, कारण आता जायला कारणही मिळाल होत आणि पैसे ही खर्च होणार नव्हते (ते जास्त महत्वाच होत).
पुणे ते Bangalore प्रवास
सकाळी १० वाजता office मधून टिकिट collect करुन सरळ पुणे Station ला पोहचलो, उद्दान Express लागलेलीच होती, तिथे मात्र एक घोळ झाला, आम्ही तिघे होतो पण आमचे डब्बे मात्र वेगले आणि टिकिट एकाकडेच...