शिक्षक आम्हां विद्यार्थाना विचारायचे मोठे होवुन तुम्ही काय होणार कुनी म्हणे Doctor, कुनी Engineer, तर कुनी Lawyer, पण आज बघीतल तर या सगळ्यांपेक्षा जास्त कमाई, ईज्जत आणि Publicity या आतंकवाद्याना मिळत आहे, बघांना या लादेननी येवढ मोठ काम केल तरी तो आजुन मोकळा व येवठंच नाही तर त्यांच्या जिवनावर पुस्तके लिहली जातात, लादेनला सोडा, तो तर फार दुरचा माणुस आहे, आपल्या जावायाचचं बघा ना किती आरामात आहे तो सासुरवाडित. आपला जावाई म्हणजे कासाब बरं का! जावाई याच्या साठी म्हणतोय कारण आपल केंद्र सरकार बायको सारखं त्याच्याखाली लोळतांना, आणि भाऊजींचे लाड पुरवण्यासाठी मेहुणीने तडफडावं तशी न्याय व्यवस्था आपल्याला त्यांची लाड पुरवतांना दिसतॆ आहे. म्हणुन कसाब ला जावाई म्हतोयं. त्यातही त्याला मिळालेली प्रसिद्घि ति केवढी, तो सकाळी किती वाजता ऊठला, त्यानी काय नास्टा केला, तो काय जेवला, त्याने दिवसंभर काय केलं, कधी झोपला, येवठंच नव्हे तर त्याला शिखं आली तरी चार चार Doctor हजर, ईथे सामान्य माणुस आपली न्यायालयात खटला लढायला चागंला वकिल करता येत नाही म्हणुन खटला हरतो, पंरतु या कसाबला गरज नसतांनाही वकिल देण्यासाठी जिवाचं राणं केलंय, काही दळभद्री पुढाकार घेतांतही, कसाब सारख्यांच्याच बाबतीत बरा आठवतो यांना मानवाधीकार. म्हणुन म्हणतोय मला कसाब व्हायचंय,