Sunday, August 15, 2010

तलवार की धार से, ना गोलीओकी बरसात से (१५ अगस्त देशाचा ६४ वा स्वतंत्र दिवस)


आज १५ अगस्त देशाचा ६४ वा स्वतंत्र दिवस, १९४७ साली लाल किल्यावर पहिल्यांदा आपल्या नेत्यांनी तिरंगा फ़डकवला आजही फ़डकवला व पुढे ही असाच फ़डकत रहाणार.
१५ औगस्ट आला कि मला माझ लहानपण आणि शाळेचे दिवस आठवतात. ते लवकर लवकर उठुन छानसा पांढरा शुभ्र uniform घालुन सकाळी सकाळी शाळेत जायच, ७ वाजता प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहन, सगळी लहान मंडळी एका रांगेत चपटासा भांग पाडुन ऊभी असलेली ध्वजाला Salute करत "जण-गण-मण" म्हणायची व N.C.C. ची परेड व्हायची.
आम्ही सगळे मांडी घालुन बसायचो नंतर पहुण्यांच भाषण व आमच्यातल्याही काही लाहाणग्याची भाषणेही होत.
ही सगळी कर्यक्रम आटोपल्यावर सगळ्याना गोळ्या, बिस्किटांचे वाटप व्हायचं, आणि लगेच सुटी मग काय धावत धावत घरी जायच, जात असतांना हातात एक छोटा तिरंगा आणि तोंडात एखाद देश्भक्तीच गाण गात घराकडे जात तिरंगामय झालेल गाव बघत जातांना अगांवर शाहारे येत, जिथे तिथे देशभक्तीपर गाण्याचे आवज येकु येत. दिवसभर उनाडक्या करुन घरी आल्या नंतर टि.व्ही. वर सुध्दा देशभक्तीपर चित्रपट सुरु असायचेत. हतात तिरंगा, गावागावात सगळी कडे तिरंगा आणि टि.व्ही. वरही नाना पाटेकरचा तिरंगा, त्यातला राज कुमार चा संवाद आठवतो "ना तलवार की धार से, ना गोलीओकी बरसात से, बंदा डरता है तोह सिर्फ़ परवर्दिगार से "