Sunday, August 8, 2010

आता आपलं सरकार आलंय.....

आपल्या Blog चे नियमित वाचक, माझे एक मित्र यांनी आपल्या सरकार बद्दल चा आपला आनंद कही अश्या प्रकारे व्यक्त केला आहे।











सगळं होणार, सगळं होणार,
आता आपलं सरकार आलंयसगळं होणार..... ।। धृ ।।

आता शेतमालाला बाजार मिळणार,
तुरडाळ १५० रु।, तर साखर १०० रु. किलो होणार,
दलाल मालामाल अन् शेतकरी भुकेकंगाल होणार ।। धृ १।।

आता दोन्ही ऊर्जामंत्री निवडून आलेत१० वर्षांत जे करता आले नाही
ते २ वर्षांत करणार,दिवसभर वीज जाणार,
रात्रीचीच काही तासच रहाणार ।। धृ २।।

रस्त्याला आता हातभर खड्डे पडणार,
मतदारांचे मणके ढिले होणार,ठेकेदारांचे मात्र खिसे भरणार ।। धृ ३।।

आता सर्वत्र मिरज घडणार,
गणेशमूर्ती फुटणार, शिवचरित्रावर बंधन येणार,
पोलिसांच्या गाडीवर हिरवा फडकणार ।। धृ ४।।

पोलिसांच्या परीक्षा अरबी-उर्दूतून,
इंग्रजी अंगणवाडीपासून,
आणि मायमराठी नष्ट होणार ।। धृ ५।।

तालुक्या तालुक्यात हज हाऊस होणार,
पंढरपूरच्या वारीवर बंधन येणार,
हजला अनुदान मिळणार ।। धृ ६।।