Saturday, April 18, 2015

पुणे वाहतूक

 
पुणे तिथे काय उणे असे म्हणुन उणेकर (माफ करा पुणेकर असं लिहायचं होत),
तर "पुणेकर" स्व:ताचिच पाठ थोपटून घेतात. परंतु  पुण्या मधेही काहीतरी उणे आहेच हे पुणेकरांनी हि मान्य करायला हवं, ते म्हणजे पुण्याची बेशिस्त वाहतूक व्यवस्था आणि बेशिस्त पुणेकर.
पुण्यात सध्या दोन पुणेकरांचे गट पडतात एक म्हणजे जुने पुणेकर आणि सध्या बाहेरून येउन पुण्यात स्थाईक झालेले नवीन पुणेकर. जेव्हा कोणि पुण्याला किवां पुणेकरांना बेशिस्त पुणेकर अस म्हणतो तेव्हा दोघेही एकमेकां कडे बोट दाखवून मोकळे होतात. आज पुणे शहाराच्या वाहतुकीची जी अवस्था आहे ती पाहून पुणे शहराला ही गुदमर्लेल्या  सारखा होत असेल. जगभरामध्ये वाहतुकी साठी नवीन नवीन गोष्टींचा वापर होऊ लागला आहे, Railway, Metro, Bullet Train, Intercity Water Transport, Private Jet. ईत्यादी अनेक गोष्टींनी प्रवासी वाहतूक व्यवस्था सुरळित केलेली आहे. अनेकदा आपण वाचतो कि जापान मधे कंपनी चे CEO सायकल ने ऑफीस ला जातात, तर UK मधे Managers खाजगी वाहना ऐवाजी Metro किंवा इतर Public Transport चा  वापर करतो. परंतु हिंजेवाडी च्या रस्त्यावर बघाल तर साधा Team Leader सुद्धा कार मधुन जातान दिसेल. ह्याचा अर्थ आपण खुप प्रगत आहो किंवा आपल्या लोकांकडे खुप पैसा आहे अस काही नाही, हे फ़क्त आपल फ़सलेल Public Transport  म्हणुन हा पर्याय. PMPL च्या बसेस ची वाट बघत बसायच, ति आल्यावरही त्यात लोंबकणारे लोंढे हे पाहुनच मनात धस्स होत, त्यात बसायची हिम्मत होइलच अस नाही.
आणि पुण्यात Auto म्हणजे न बोललेला विषय, मिटर हे फ़क्त दिखाव्यासाठीच असतात. जरा लांब जायच असेल तर ५००-६००/- हा आकडा सांगुन मोकळे होतात. यायच तर या, नाही तर बसा "बस" ची वाट बघत. किंवा ६ सिटरAuto जे प्रत्येक ५मिनिटाला सवारी बसवण्यासाठी नाही तर कोंबण्या साठी थांबवत थांबवत नेतात, वर त्यांची मुजोरी ही सहन करवी लागते, म्हणुन आज पुण्यात प्रत्येक जण आपल खजगी वाहन वापरण जास्त सोईच मानतो, आणि अश्यानेच पुण्याच्या वाहतुकिचा प्रश्न दिवसेंदिवस जटील होत चालला आहे.