Wednesday, August 10, 2011

सोन्याच अंड देणारी कोंबडी विकून टाकली

महानगरांमध्ये जिथे खास करून झपाट्याने विकास होत चाललाय अश्या ठिकाणी रिकाम्या जमिनींना, शेताला सोन्यापेक्षा हि जास्त किंम्मत मिळु लागली आहे. एकराने विकल्या जाणार्या जमिनी आज गुंठ्यांनी विकल्या जात आहेत. हीच बाब आज पुणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात बघायला मिळती आहे. विद्देच माहेर घर असलेल  पुण आता IT क्षेत्रालाही भुरळ घालू लागल आहे.
बघता बघता हिंजेवाडी, मगरपट्टा, तळेगाव, औंध ह्या काही गावां मध्ये IT पार्क उभे राहिले आहेत. शिक्षणाच्या बाबतीत तर पुण्याच आकर्षण पहिले पासून आहेच, रोज गल्ली बोळां मध्ये एक नवी शिक्षण संस्था जन्मास येते. त्यामुळे इथे शिक्षणासाठी आणि रोजगारासाठी दररोज येणारांच्या संखेत लक्षणीय वाढ झाली आहे. म्हणून प्रत्येक IT पार्क आणि शिक्षण संस्थाच्या आजु बाजु च्या परिसरासरांच्या किंम्मती उच्चांक गाठतात. लोखंडाच परिसाच्या स्पर्शाने सोन व्हावं तस ह्या IT पार्क आणि शिक्षण संस्था सारखे पारीस जमीनीच सोन करत आहेत.
ह्यामुळे शेतकरी शेतीला कंटाळले कि पैशाला हपापले हे कळत नाही, पश्चिम  महाराष्ट्रातला
शेतकरी हा प्रगत शेतकरी म्हणुन ओळखला जातो. इथली शेती हि सुपीक आणि निसर्गाच देण लाभलेली. परंतु ह्याच सुपीक शेत जमिनी शेतकरी विकून मोकळा झालेला दिसतोय डोंगारांना Crusher लागले आहेत. विकासाच्या नावावर जमिनीचा नाश आणि झाडांची कत्तल होत आहे.
पण ह्या विकासाचा खरच किती  शेतकऱ्यांना, जमीन धारकांना कितपत फायदा होत आहे. चांगला भाव मिळतोय म्हणुन सुपीक जमिनी "सेझ" च्या नावाखाली मोठ्या कंपन्याच्या घश्यात व बिल्डर लोकांच्या खिश्यात जात आहेत. आणि जमीन धारक शेतकरी काही रक्कम घेऊन खुश झाल्याच चित्र दिसतंय, आणि ह्याच गुंठ्याने विकलेल्या जमिनीच्या व्यवहारातून मिळालेल्या पैशात हे लोक चैनीच्या वस्तु घेण्यास पहिली पसंती दर्शवितात. आणि एखाद्या मंत्र्यालाही लाजवेल असा लवाजमा तयार करतात म्हणून ह्यांना गुंठामंत्री हि पदवी  पुणेरी भाषेनी प्रदान केली आहे. ह्याचं वर्णन करायचं झाल तर पांढरी शर्ट-प्यांट, पायात कोल्हापुरी चप्पल, डोळ्यावर Ray-Ban चा Golden Frame असलेला चष्मा, आणि अंगावर एखाद्या पाटलीन बाईलाही लाजवेल येवढ सोन, व फिरायला एक Scorpio गाडी. असे हे गुंठामंत्री पुण्यात बरेच बघायला मिळतील. खर म्हणजे ह्यांच्या जमिनी ह्या सोन्याच अंड देणारी कोंबडी होती... ह्यांनी त्या कोंबडीला कापलं नाही तर चक्क विकून टाकलंय, आता ह्यांच्याच कोंबडीची अंडी बाहेरून आलेल्यांच्या खिश्यात.
             मग आता प्रश्न उरतोय तो ह्यांच्या कडे नेमक काम काय? तर बरीच लोक अजून हि उरलेली शेती करत आहेत, काहींनी  Bear-Bar, धाबा, मांसाहारी खानावळी, हॉटेल, कॅब Transport असे उद्दोग चालवले आहेत आणि उरलेला वेळ मग राजकारणात आणि गावभर पोस्टर बाजी करण्यात खर्च होतोय.
पण सगळ्यात जास्त चीड तेव्हा येते जेव्हा कोण्या काळी शिवबाचे शूरवीर शिपाई असलेले हे मावळे आज त्यांच्याच नावाने Bear-Bar,आणि धाबा उघडतात बिनधास्त शिवबांच्या  फोटो समोर बसून  ह्यांच्या खानावळीत  तळीरामांच्या पंगती उठवतात. तिथेच बसून गल्ली पासून दिल्ली पर्यंतच्या राजकारणावर फक्त गप्पा मारतात. खरच हे सगळ बघून शिवारायाच्याही काळजात धस्स होत असेल कि हाच का तो माझा मावळा ज्याचा साठी स्वराज्याचा हट्ट केला होता. ज्याच्या साठी मोगली साम्राज्याशी दोन हात केले होते, आणि  हि धरणी माय ह्यांच्या स्वाधीन केली होती.
          आज हि वेळ गेलेली नाही आहे, सुपीक जमिनी विकून कुठला विकास आपण करू पाहतोय, आपण आज डोंगर दर्या सपाट करून, जंगलांचा नाश करून विकासाच्या दिशेने जातोय कि विनाशाच्या. खरच ह्याला विकास म्हणता येईल काय? 

No comments: