Tuesday, December 28, 2010

James Lane जिंकला का?

                कोणाला शिव्या येतात का हो शिव्या, इथे लिहिता येत नाही म्हणून, तुम्हाला येत असतील तर लगेच देऊन टाका, पुण्यातल्या भ्याड राज्यकर्त्याना हव्या आहेत.
जागे व्हा...जागे व्हा, आपल अक्कलशून्य आणि स्वार्थी सरकार आपल्याला अंधारी गुफेत घेउन चालले आहे...
आपली भ्रष्टाचाराची कारस्थान लपवण्यासाठी नव नवीन उद्योग सुरु आहेत.
कधी राम, कधी कृष्ण, तर कधी शिवाजी.. अहो तुम्हाला Problem काय आहे ह्यांच्या पासून.
मागे हे सरकार अमेरिकेच्या सांगण्यावरुण हिंद महासगाराताला राम सेतु तोडायला निघाले होते. अमेरिकेने सांगितले की आमच्या बोटी श्रीलंकेला वळसा मारून जातात हजारो लिटर इंधन जळत तुम्ही तो सेतु तोडून टाका आम्हाला Short Cut होइल. आणि "Pizza वाली बाई" (सोनिया गाँधी) तयार झाली, अनेक हिंदुत्ववाद्यानी विरोध केला तर हे म्हणाले "राम म्हणून कोणी नव्हताच ते एक काल्पनिक पात्र आहे" माजी राष्ट्रपति A.P.J.Abdul KAlam ह्यांचा ही सेतु तोडायला विरोध होता. ते म्हणाले या सेतु मधे लाखो टन थोरियम आहे ज्या पासून भारत स्वावलंबी होऊ शकतो. तरी बाई काही येकेना. नशीब बर्याच विरोध आणि अंदोलना नंतर "राम सेतु" वाचला.
         पण आमच्या लाडक्या शिवबा च काय? त्याचा तर अख्खा इतिहासच बदलायला निघाले आहेत, त्याचेच मावले.
कोण्यातरी शोध लावला की म्हणे शिवबा चे गुरु हे "दादोजी कोंडदेव" नव्हते तर ते "संत श्रेष्ठ तुकाराम महाराज" होते. हो आपण हे मान्य ही करू की "संत श्रेष्ठ तुकाराम" हे शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक गुरु होते. पण ते दादोजी सारखे शिवबा ला तलवार, दांडपटटा, कसे शिकवू शकणार? काही तरी logic तर लावा जरा. उगाच दादोजी ब्राम्हण होते म्हणून त्याचा द्वेष...
बर जे करतायेत त्याना करू देत. पर्वा नाही, ज्याची त्याची इच्छा आणि समज, शेवटी काय "लोकशाही" आहे. परंतु आमच्या राज्यकर्त्याची अक्कल कुठे शेण खायला गेली होती. काल रात्रि लाल महालातिल "दादोजी कोंडदेव" चा पुताळा रातोरात कापून त्याच्याच घरातून हलवला. ह्या करास्थानाने राजगडावर शिवबा दू:खी झाले असतीलच, पण तिकडे तो James Lane मात्र सुखावला असेल की त्याने
लिहिलेल्या कल्पणिक, खोटारडया गोष्टीला आमच्याच लोकानी खर करुन दाखवल. त्यांनी पुस्तक लिहून महाराजाना बदनाम केल होत ह्यांनी (राज्यकर्त्यानी) कृति करुन शिवबा आणि जिजाऊ दोघांच्याही चारित्रवर घाला घातला. अरे लाजा कश्या वाटत नाही स्वतः ला शिवभक्त म्हणून घेताना.       
          काय तो शिवबा काय त्यांच चरित्र आज ३०० वर्षा नंतरही जेव्हा "छत्रपति शिवाजी महाराज की जय" म्हटल्यावर कसा अंगावर रोमांच उभा राहतो. स्वामी समर्थ रामदासानी  शिवरायांच कस सुंदर वर्णन केलय, ते म्हणतात. 

"निश्चयाचा महामेरु, अखंड स्थितीचा निर्धारु, बहुत जनासी आधारु, श्रीमंत योगी.
शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चलाणे, शिवरायांचे तसदी देणे, कैसी असे.
शिवरायाचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप.....  "
अस हे सुर्याहून ही प्रखर व्यक्तिमत्व, जे आपल्या कारकिर्दीत बहुत जनांचा आधार झालेत, मग ते ब्राम्हण असोत वा बहुजन एवढच नाही तर त्यांनी मुसलमानाना सुद्धा हिन् दर्जा कधीही दिला नाही.  ("कल्याण ची सुन्दरी" आठवत असेलच आपल्याला) पण आज महाराजांच्याच नावावर खालच्या दर्ज्याच  जतिपातिच राजकारण चलावल आहे.
काल रात्रि पुण्यात घडलेला प्रकार म्हणजे james lane नी बदनामी करक  लिहिलेल्या वाक्याना खर करण्याच कारस्थान असून दुसर काही नाही...
म्हणून अस वाटत की औरंगजेबाच तख़्त हालवणार माझा  शिवबा मात्र आज या सत्ते साठी भुकेल्या राज्यकर्त्यांच्या हातून हरला आणि तो परकीय james lane जिंकला... खरच james lane जिंकला का?  
     नाही अजिबात नाही, सुर्याचा तेज कधीही लापत नाही की त्याला कोणी  झाकू शकत नाही, हे कुणीही विसरु नए.
महाराजाना बदनाम करण्याचे आणि इतिहासात बदल करण्याची कामे करू नये. हिम्मत असेल वर्तमानत पराक्रम दाखवा अफजल खानाचा धडा पुस्तकात आणा, अफजल गुरु आणि कसब ला फाशी द्या.... आणि भविष्यासाठी इतिहास घडावा.... ना की घडलेला इतिहास तुमच्या मनाप्रमाने बदला....
जिंकु देऊ नका james lane च्या बदनामी करक वक्त्व्याला,  धिक्कार करा लाल महालातिल पुणे महानगर पालिकेच्या कारवाईचा,
"धिक्कार धिक्कार धिक्कार लाल महालातिल पुणे महानगर पालिकेच्या कारवाईचा धिक्कार"


1 comment: