Thursday, August 4, 2016

मुख्यमंत्री महोदय "ऑडिट" चेही ऑडिट करा...

"कोकणात पूल कोसळून दुर्घटना झाल्यानंतर राज्यातील सर्वच पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय जाहीर झाला असताना, मुंबई महापालिकेनेही मुंबईतील ३१४ पुलांची तपासणी करण्याची कार्यवाही सुरू केली आहे."-- एक बातमी 

गेल्या काही वर्षात प्रत्येक वृतु मध्ये काही ना काही तरी  घडताना आपण बघतो आहोत.
हिवाळ्यात थंडीने बळी जातात तर उन्हाळ्यात उष्मघाताने
उन्हाळ्यात दुष्काळ पडतो, पिण्याच्या पाण्यासाठी वन-वन भटकावं लागत.
त्यात राजकीय वातावरण तापत, मग रेल्वेनी पाणी पाठवलं जात, आणि पुन्हा घोषणा आणि आश्वासन दिली जातात कि पाट-बंधार्याचं काम नीट झालं नसल्याने हि वेळ आली. आता जिथे नीट कामे झाली नाहीत त्या सगळ्यांचं "ऑडिट" करण्यात येईल. मग पावसाळा येतो आणि उन्हाळ्यातील पाट-बंधार्याचं आणि इतर "ऑडिट" ची चर्चा हि पुढील उन्हाळ्या साठी स्थगित होते.
आता पावसाळ्यात सगळं नीटच होणार असं चित्र दिसत, त्यात मुंबई-महाराष्ट्राच्या रस्त्यांवरील खड्ड्यांचे  छोटे मोठे वाद, आरोप-प्रत्यारोप चालू होतात आणि त्यावर हि तोडगा निघतो ते म्हणेज चॊकशी आणि "ऑडिट". हि चर्चा अजून चिघळणार त्यात इतर घडना घडून जातात त्या म्हणजे महामार्गावर कोसळणाऱ्या दरडी असोत वा रेल्वे चे सरकणारे रूळ मग त्याची परत सुरु होते ती म्हणजे चॊकशी आणि "ऑडिट". ह्या चॊकशी आणि "ऑडिट" मध्ये अधिकारी आणि प्रशाषण व्यस्त असत तेवढ्यात माळीण गावालाच पाहाडाने गिळणंकृत केल्याची माहिती मिळतेमग मागणी होते कि अजून असे किती गाव पायथ्याशी वसले आहेत जे धोकादायक स्थिती मध्ये आहेत त्याची चौकशी झाली पाहिजे आणि त्यांच्यासाठी सुरक्षेच्या योजना राबवल्या पाहिजेत. मग वरून एक आदेश येतो कि ह्या सगळ्या गावाची चौकशी आणि "ऑडिट" करा.. आणि सुरु होते पुन्हा चौकशी आणि नवीन "ऑडिट".
आता ह्या भरीत भर म्हणेज महाड मध्ये झालेली ह्या वर्षीची घटना... 
ह्या घाटाने नंतर जीर्ण झालेल्या पुलांच्या "ऑडिट" चे आदेश सरकारने दिले नसते तर नवल
लगेचच चौकशी करून पुलांच्या "ऑडिट" करण्याचे निर्णय सरकार ने घेतला, मग ह्या आधी मार्च महिन्यात जे  ऑडिट महाड च्या आणि इतर पुलांचे ऑडिट केले होते ते काय होते?
हे ऑडिट झाल्यांनंतर हि जर पूल वाहून जातात तर मग आता त्या झालेल्या "ऑडिट" चे हि ऑडिट करण्याचे आदेश सरकार देणार का?
 जीर्ण झालेले वाडे, जुन्या इमारती, ब्रिटिशकालीन पुल, महामार्गावर कोसळणाऱ्या दरडी , वाहून जाणारे रस्ते, रेल्वेचे रूळ, नदीपात्रांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढणारे अतिक्रमण, बेकायदेशीर वृक्ष तोड, प्रदूषण  इतर बरच काही आपल्या समोर वाढून ठेवलं आहे, ज्याचे वेळेवर जसे ऑडिट होणे गरजेचे आहे तसेच त्यावर कठोर कारवाई करणे अत्यंत महत्तवाचे आहे.


असे हे महात्मा बसवेश्वर...

आचाराने आणि विचाराने एक असणार्‍या ,हृदयावर शिवलिंग धारण करून कपाळी भस्म लावणार्‍या शिव-शंकराला कुलदैवत मानणार्‍या, वीरशैव लिंगायत समाजाचे संस्थापक महात्मा बसवेश्वर...
महात्मा बसवेश्वरांच्या जीवनाचा आणि लिंगायत समाजाचा सखोल अभ्यास नसतानाही ह्या विषयावर बोलण जरा कठीणच.
कारण महात्मा बसवेश्वर हे नाव  आणि त्यांच्या विचारातून निर्माण झालेला  लिंगायत समाज हे काही आज जन्माला आलेलं नाही हा बाराशे व्या शतकां पासून चालत आलेला इतिहास आहे.
लिंगायत हा एक जात नसुन तो एक धर्म आहे . जन्मामुळे मानवांना उच्च नीच असा विभाग करते ती जात. जनमल्यापासून सर्व समान आहोत अशी घोषणा करून कोणतीही जात, वर्ग, वर्णभेद मानता जातीरहित धर्माचा आसक्ती असणात्या सर्वाना दीक्षा संस्कार मिळविता येतो असे सांगणारा तो धर्म. या धार्मिक संस्कारामुळे व्यक्तिने मिळविलेली योग्यता, पात्रता, यामुळे तो श्रेष्ट अगर कनिष्ट मानला जातो असे सांगतो तो धर्म. लिंगायत धर्मात जन्मामुळे कोणीही उच्च, नीच असे मानताविटाळाविण पिंडास आश्रयअसे सांगून,  असा बोध दिला आहे कि...
गोत्रनाम पुसता गप्प का बसता?
शिर खाजवित भूमी का गिरवता?
गोत्र मादार चेन्नय्या, गोत्र डोहार कक्कय्या,
ऐसे सांगा ना हो, कूडलसंगय्या


हे विचार मांडणारे महात्मा बसवेश्वर यांचा जन्म सन ११०५ या साली इंगलेश्वर जे आज कर्नाटकातील बिजापुर येथे आहे तेथील शैव ब्राम्हिण कुटंबात झाला.
महात्मा बसवेश्वर हे कर्नाटकातील संत समाजसुधारक होते. त्यांनी हिंदू धर्मातील जातिव्यवस्थेविरुद्ध अन्य हानिकारक प्रथांविरुद्ध संघर्ष केला. त्यांनी निर्गुण, निराकार एकेश्वरवादी श्रद्धेचा पुरस्कार केला .
"काय कवे कैलास" म्हणजेच "कर्म हेच कैलास" आणि  “माणूस हा त्याच्या जन्माने नव्हे तर समाजात केलेल्या कर्माने मोठा होत असतो”. अशी शिकवण त्यांनी समजाला दिली
 महात्मा बसवेश्वरांना परिवर्तन हे व्यक्तीच्या अंत:करणांतून घडवून आणायचे होते. त्यासाठी एक नवी जीवन पद्धती त्यांनी दिली. जेथे शोषण नाही, गरीब-श्रीमंत, उच्च-नीच, श्रेष्ठ- कनिष्ठ असा कुठलाही भेदाभेद नाही, कुठल्याही प्रकारची विषमता नाही, जाती-जमाती भेद नाही, कर्मकांड नाही, अशा प्रकारची जीवन पद्धत महात्मा बसवेश्वरांनी आपल्या अलौकिक विचारधारेतून   अस्तित्वात आणून दाखवली. 

महात्मा बसवेश्वरांच्या क्रान्तिकारक, द्रष्टय़ा, सामाजिक न्याय देणार्या, बुरसटलेल्या सनातनी/कर्मठ/ अन्यायमूलक/स्वार्थपरायण मानसिकतेला प्रखर विरोध करणार्या निर्भय विचारसरणीचा प्रभाव समाजमनावर पडला. 
बाराव्या शतकात भारताचे समाजजीवन हे अंध:कारमय झाले होते.अनेक रूढी,अंधश्रद्धा यांनी त्रस्त झालेले होते.
बहुदेवता उपासना, कर्मकांड, अंधश्रद्धाo, पुरोहित वर्गाची मतांधता, पाप-पुण्याची दहशत, उच्च-नीच, श्रेष्ठ- कनिष्ठ, विषमता, कामकरी-कष्टकरी वर्गाची पिळवणूक, स्त्री दास्यत्व इत्यादींनी भारतीय समाज बेजार झाले होते. अशा परिस्थितीत भारतीय समाजाला उभे करण्याचे धाडस महात्मा बसवेश्वरांनी करून दाखवले. त्यासाठी त्यांना तत्कालीन समाजसत्तेशी, राजसत्तेशी प्रचंड संघर्ष करावा लागला.