Wednesday, November 24, 2010

विदर्भ वेगळाच पडला शेवटी...

                                                                         
विदर्भ वेगळा मागणार्या विदर्भ वाद्यानीच विदर्भाला वेगळ पाडलेल दिसतंय. एक सांगा विदर्भ वेगळा झाल्यावर खरच विदर्भाचा विकास होणार काय? शेवटी विषय उरतो काय तर, कसा हि होवो पण विकास झाला पाहिजे. बर विदर्भ वेगळा झाल्या वरच त्याचा विकास होणार आहे का? तसच असेल तर मग खुशाल होऊन जाऊ द्या, पण याची शास्वती जो घेणार असेल त्याणेच पुढे यावे.
काय तर म्हणे वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनात नक्षलवाद्यांना आणणार, त्याची मदत घेतली जाइल नवीन राज्य आणि प्रशाषण स्थापण्यासाठी. आहो ज्याना भारतीय प्रशाषनच मान्य नाही, ज्या गोष्टी विरुद्ध त्याचा लढा आहे त्याच्याच स्थापणे साठी त्याची मदत घेणार, मग खरच विचार करा ते प्रशाषण कस असेल आणि किती दिवस टिकेल? सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे खरच विदर्भाच्या विकासा साठी विदर्भातील नेते कार्यशील आहेत का?
नुकताच दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये गावी "आर्णी (यवतमाळ)" गेलो होतो. आमच्या मतदार संघातील नवीनच असलेले पण राजकारणात जुने असलेले मात्तबर असे नेते आमदार म्हणून मिळाले आहेत जे आता सध्या मंत्रिमंडळात मंत्री पद भुषवतायेत मा. शिवाजीराव मोघे, हे आमच्या मतदार संघाला मिळालेलं आत्तापर्यंतच एकमेव मंत्रिपद, पण तेही सध्या डगमगत्या स्थितीत आहे. आजच "सकाळ" मधे बातमी वाचली की "पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वात जुन्या मंत्रिमंडळातील कॉंग्रेसच्या किमान दहा चेहऱ्यांना अर्धचंद्र मिळण्याची शक्‍यता आहे. अकार्यक्षमतेमुळे सुभाष झनक, शिवाजीराव मोघे अशा काही नावांचा समावेश मंत्रिमंडळात होणार नसल्याचा अंदाज आहे."
आसाच अकार्यक्षम कार्यभार साधाल्या जात असेल तर कसा होणार विकास.  जर इच्छा आणि दूरदृष्टि