Thursday, December 30, 2010

राणे नी भरला "सकाळ" ला दम...

         "बालाजी (अ)प्रसन्न, म्हणून `सकाळ'चे शिंतोडे" या मथळया खाली उद्योग मंत्री नारायण राणे यांनी "सकाळ" दैनिकाचा खरापुच समाचार घेणार पत्र "प्रहार" वेबसाइट वर प्रसिद्ध केले आहे

"‘सकाळ’च्या दिनांक 21 डिसेंबर, 2010च्या अंकात ‘इंद्रायणीतील बांधकामांना राणेंचा जाता-जाता वरदहस्त’ या मथळय़ाखाली मुखपृष्ठावर बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे. दिनांक 21 व 22 डिसेंबरला मी कोकणात असल्यामुळे या बातमीसंबंधी खुलासा करू शकलो नाही.  त्यामुळे या खुल्या पत्राच्या रूपाने हा खुलासा करतो आहे." अश्या प्रकारे सुरुवात करत एक मोठ्ठ पत्र त्यांनी सकाळ च्या संपादकाना लिहल आहे.
पत्राच्या शेवटी राणे म्हणतात.....

Tuesday, December 28, 2010

James Lane जिंकला का?

                कोणाला शिव्या येतात का हो शिव्या, इथे लिहिता येत नाही म्हणून, तुम्हाला येत असतील तर लगेच देऊन टाका, पुण्यातल्या भ्याड राज्यकर्त्याना हव्या आहेत.
जागे व्हा...जागे व्हा, आपल अक्कलशून्य आणि स्वार्थी सरकार आपल्याला अंधारी गुफेत घेउन चालले आहे...
आपली भ्रष्टाचाराची कारस्थान लपवण्यासाठी नव नवीन उद्योग सुरु आहेत.
कधी राम, कधी कृष्ण, तर कधी शिवाजी.. अहो तुम्हाला Problem काय आहे ह्यांच्या पासून.
मागे हे सरकार अमेरिकेच्या सांगण्यावरुण हिंद महासगाराताला राम सेतु तोडायला निघाले होते. अमेरिकेने सांगितले की आमच्या बोटी श्रीलंकेला वळसा मारून जातात हजारो लिटर इंधन जळत तुम्ही तो सेतु तोडून टाका आम्हाला Short Cut होइल. आणि "Pizza वाली बाई" (सोनिया गाँधी) तयार झाली, अनेक हिंदुत्ववाद्यानी विरोध केला तर हे म्हणाले "राम म्हणून कोणी नव्हताच ते एक काल्पनिक पात्र आहे" माजी राष्ट्रपति A.P.J.Abdul KAlam ह्यांचा ही सेतु तोडायला विरोध होता. ते म्हणाले या सेतु मधे लाखो टन थोरियम आहे ज्या पासून भारत स्वावलंबी होऊ शकतो. तरी बाई काही येकेना. नशीब बर्याच विरोध आणि अंदोलना नंतर "राम सेतु" वाचला.
         पण आमच्या लाडक्या शिवबा च काय? त्याचा तर अख्खा इतिहासच बदलायला निघाले आहेत, त्याचेच मावले.
कोण्यातरी शोध लावला की म्हणे शिवबा चे गुरु हे "दादोजी कोंडदेव" नव्हते तर ते "संत श्रेष्ठ तुकाराम महाराज" होते. हो आपण हे मान्य ही करू की "संत श्रेष्ठ तुकाराम" हे शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक गुरु होते. पण ते दादोजी सारखे शिवबा ला तलवार, दांडपटटा, कसे शिकवू शकणार? काही तरी logic तर लावा जरा. उगाच दादोजी ब्राम्हण होते म्हणून त्याचा द्वेष...

Friday, December 24, 2010

मतांच्या राजकारणात हिंदू झाला बदनाम

कांद्याचा भाव १०० रुपये किलो, लसून ३००, पेट्रोल ६३ रु. लिट, हा भाव सागळयांसाठी सारखा आहे की, हिंदू साठी अलग आणि मुस्लिमान साठी अलग आहे का? नाही ना..! सागळयाना ही झळ सारखीच बसती आहे, "आदर्श" मधले flats हे हिंदू सैनिकाना मिळणार होते की मुस्लिम, CWG मधे हिंदू धावणार होता की मुसमान, 2G Spectrum घोटाळयाची तर आकडेमोड जरी केली तरी "आकडा" येइल.
या सगळया गोष्टीवरुन लक्षात येत की खरच अपल सरकार हे Secular म्हणजेच "धर्मनिरपेक्ष" आहे. कुठल्या ही जाती, धर्माचा विचार ना करता त्यांनी व्यवस्थित पीळवाणुक चालवलेली आहे. सकरकारच ध्येयच आहे की GDP ८% पर्यंत जरी नाही गेला तरी चालेल पण "आम आदमी" हा आमच राहिला पाहिजे. त्याची जर प्रगति झाली तर तो विचार करायला लागेल, आणि विचारी माणस त्याना कधीच मतदान करणार नाहीत.
आता स्वत: च बिंग फुटायला लागले, घरात मवाणार नाही एवढ्या पैशाचा भ्रष्टाचार करुन झालय, आणि आता तो "आम आदमी" च्या समोर उघडा पडल्यावर सावरा सावर करण्या ऐवजी, त्याच डोक कस फिरवता येइल, त्याला रिकाम्या कामत कस गुंतवता येइल याची कारस्थान आमच सरकार करतय.
अयोध्या निकाला नंतर परत दंगली तर उसळणार नाही ना, या भीतीत सगळे होते, परंतु सपूर्ण देशात हिंदू व मुस्लिमानी सलोखा राखला, आणि एक वेगळच उदाहरण या जगा समोर ठेवल. परंतु हे या
सरकार ला पचलेल दिसत नाही. प्रतेक वेळेस Bomb Blast होतात कधी मंदिर तर कधी मज्जिद
हदारते तरी सुद्धा हिंदू मुस्लिम भांडत का नाहीत? याची सल त्याना लागलेली दिसत आहे. कारण
आता पुढच्या निवडणुकित हाच मुद्दा त्याना कमी पडणार आहे, कारण विकास तर त्यांनी काही केला नाही, उगाच भ्रष्टाचाराचा डोंगर रचून ठेवला आहे.
आम्ही किती चांगले हे ते जाणतेला दाखउ शकत नाही म्हणून, बाकीचे आमच्या पेक्षा कसे वाईट आहे हे सांगण्यात त्याना जास्त रस वाटतोय.