शब्द सरिता

हे बंध रेशमाचे !!!!

हे बंध रेशमाचे मी तोडीले
हे धागे सुखाचे मी सोडिले.

सुखद स्पर्श जीवनात कधी ना जाणले
पाहिले जे स्वप्न सुंदर, क्षणात भंगले.

सर्व सुखांचा त्याग करुनी,
सर्व काही मी विसरुनी,

जिवनात जायचे ऎकटेच,
न बघता मागे वळुनी.

घराचे घरपण मिटले, नाते सगळे विस्कटले 
नसते कुणि कुणाचे हे मी आज जाणिले.

अंगणि बहरला असे प्रजक्त
तरी एककल्ली माझे जिणे विरक्त 

उगवता सुर्य हि होत असे अस्त,
कसे उधळू मी स्वप्निल रंग मदमस्त.

फुलणार कधी हे प्रजक्त सुखाचे,
जुळणार कधी हे बंध रेशमाचे

कवी:- स्वप्निल देमापुरे
तोवर तुला मला

याच वस्तीतून आपला सूर्य येईल
तोवर मला गातच राहिले पाहिजे
नगरवेशीत अडखळतील ऋतू
तोवर प्रिये जागत राहिले पाहिजे

तुझे कुंतलहि आताच विंचरून ठेव
अंबाडय़ाच्या पेडात फुले मी खोवीन
माझ्या डोळ्यांच्या ऐन्यात पाहून घे रूप
तुझ्या कानांच्या पाळीत तारे मी खोवीन

कालच्या सभेत गाईलेले मी गीत
ज्यात तुझ्या-माझ्या आशांचे खजिने होते
त्या ओळीहि ओठांवर घोळवून ठेव
ज्यात तुझ्या-माझ्या सुखाचे छबिने होते

आणखी एक काम करावे तू लगेच
फाटक्या कोटासहि टाके घालून ठेव
फुले हुंगीतच जाऊ दोघेहि गर्दीतून
तुझी रेशमासम बोटे दंडात ठेव

याच वस्तीतून आपले सुख येईल
तोवर तुला- मला जागलेच पाहिजे
दारावर येतील सोनेरी मनोरथ
तोवर प्रिये वाट पाहिलीच पाहिजे.

कवी:-नारायण सुर्वे.
Make of my body the beam of a lute

of my head the sounding gourd
of my nerves the strings
of my fingers the plucking rods.
Clutch me close
and play your thirty-two songs
O lord of the meeting rivers!

- Basaveshwar Maharaj

Temples for Siva.

The rich
will make temples for Siva.

What shall I, a poor man, do?

My legs are pillars,
the body the shrine,
the head a cupola of gold.

Listen, O lord of the meeting rivers,
things standing shall fall,
but the moving ever shall stay.

- Basaveshwar Maharaj
माझी आई
जेव्हा तारे विझू लागत
उंच भोंगे वाजू लागत
पोंग्याच्या दिशेने वळत
रोज दिंडय़ा जात चालत
झपाझप उचलीत पाय
मागे वळून बघीत जाय
ममतेने जाई सांगत
नका बसू कुणाशी भांडत
वर दोन पैसे मिळत.
दसऱ्याच्या आदल्या दिनी
जाई पाचांसह घेऊनी
फिरू आम्ही आरास बघत
साऱ्या खात्यांतून हुंदडत
किती मज्जा म्हणून सांगू
शब्दसाठे झालेत पंगू
भिंगऱ्या पेपेटे घेऊन
फुग्यांचे पतंग झोकून
जात असू पक्षी होऊन.
एक दिवस काय झाले
तिला गाडीतून आणले
होते तिचे उघडे डोळे
तोंडातून रक्त भळभळे
जोडीवालीण तिची साळू
जवळ घेत म्हणाली बाळू
मिटीमिटी पाहात होतो
माझे छत्र शोधीत होतो
आम्ही आई शोधीत होतो.
त्याच रात्री आम्ही पाचांनी
एकमेकांस बिलगूनी
आईची मायाच समजून
घेतली चादर ओढून
आधीचे नव्हतेच काही
आता आईदेखील नाही
अश्रूंना घालीत अडसर
जागत होतो रात्रभर
झालो पुरते कलंदर.
कवी:- नारायण सुर्वे
राजे पुन्हा जन्मास या
जन्म घ्या तुम्ही जन्म घ्या
राजे पुन्हा जन्मास या…!

शिरि शिरपेच हाती समशेर शोभती
अश्वरुढ होई राजा शिवछत्रपती
हे राजे, तुम्हा हिन्दुह्रुदय पुकारती
भगवा धरुन हातात या..
राजे पुन्हा जन्मास या. १

कावा गनिमी करुनी, धर्मरक्षिण्यास
फाडिले अफजल खानास तसा
आज सरकार म्हणे त्यास फासी नको.
फाडण्या पुन्हा खानास या
राजे पुन्हा जन्मास या. २

नाव घेती तुमचे किती, परी
चरित्र कुणा का ना उलगडे तरी?
राजकारण करी, ती नावावरी,
शिकवण्या धडे राजकारणाचे या
राजे पुन्हा जन्मास या. ३

पुन्हा महाराष्ट्र नवनिर्माणास या
मराठि अस्मिता जागविण्यास या
नको बांधणि किल्ल्याची आम्हा आता
माणुस मराठि एकदा जोडण्यास या
राजे पुन्हा जन्मास या. ४

जाणत्या राजास ला़ख्-लाख मुजरा असो
स्विकारण्या माझ्या मुजर्यास या
राजे पुन्हा जन्मास या.
जन्म घ्या तुम्हि जन्म घ्या
राजे पुन्हा जन्मास या. ५

कवी:- स्वप्निल देमापुरे