Friday, March 27, 2009

लोकशाही आमच्या बापाची

आपल्याला प्रत्येक गावांमधे, शहारांमधे ठिकठिकांणी काही सुचना बघायला मिळतात. उदा. "इथे थुंकु नये", "इथे कचरा टाकु नये", "गाडी लाऊ नये", या सुचनांबरोबर कही मजेदार गोष्टी बघायला मिळतात त्या म्हणजे जिथे या सुचना लावण्यात आल्या आहेत तिथेच नेमका कचरा टकलेला आसतो, थुंलेल असतं, आणि नो पर्किंग मधे गाडी लावण्यात जी मजा असते ना ति काही ऒरच, काही दिवसांआधी जिवाची मुंम्बई करायाला गेलो होतो, तिथे छत्रपती शिवाजी टर्मिनल ला उतरलो। सगळीकडे बरीच स्वच्छता दिसत होती, मुंम्बा नगरी म्हणजे स्वप्ननगरी, गर्दीचा माहासागर तरीही बरीच स्वच्छता बघायला मिळणे म्हणजे खरचं आश्चर्य, पण ते जास्त वेळ टिकल नाही. कारण पुढे तिथल्या सब-वे मधुन जात असतांना मला एक सुचना दिसली ति होती "ईथे थुंकु नये थुंकल्यास कारवाई होइल" परंतु काही थुंकी बहाद्दुरांनी आधिच त्या फलका वरच थुंकुन कारवाई करुन ठेवली होती. काय करणार आमच्या लोकशांहीनी दिलेला अधिकार तो, अशी काहिंची समजुत, नंतर आपणच बोंबलत फिरायच आमच्या देशात किती घाण  आहे, अहो पण ति घानं केली कोणी, तुंम्ही आम्हीच ना, जर कोणि तुमच्या समोर घाण  करत असेल, कचरा टाकतं असेल तर त्याला फक्त सांगुन बघा कि इथे घाण करु नको बाबा, बघा तुम्हाला काय एकायला मिळत ते...... "ही काय तुझ्या बापाची जागा आहे काय?" किंवा "तुला काय करायंचयं?" अस काही तरी ऎकावं लागेल. काय करणार शेवटी लोकशही ना.
नो पर्किंग मधे गाडी लावणे, झेब्रा क्रोसींग च्या पुढे गाडी उभी करणे, या पेक्षा ही धाडसी काम म्हणजे सीग्नल तोडणे, अहो लोकशाही आमच्या बापाची ना कोण अम्हाला काय म्हणनांर आहे. जर पकडलीच गाडी तर देउ ५०, १०० मामांचाही खिसा गरम. आसाच हा भ्रष्टाचार वाढत असतो, याची पाळे-मुळे आपणच वाढवतो आणि नंतर आपल्या देशात केवढा भ्रष्टाचार, लवकरात लवकर याच निर्मुलन व्हायलाच हवं, अश्या काही तरी गप्पा मारत असतो.
लोकशाही-लोकशाही म्हणजे तरी काय हो कुठेही काहिही बोलण्याची, काहिही करण्याची मुभा, स्वतंत्र म्हणजे लोकशाही का? असेलही कदाचित पण त्यालाही काही मर्यादा आहेत. आणि त्या मर्यादा पाळुनच त्याचा वापर केला गेला, उपभोग घेतला गेला तरच सर्वांगीन विकास होऊ शकतो, नाही तर केवळ भोबट पसारा जो सद्या आत्ताच्या परिस्थितित चालला आहे. जो तो येतो कुठल्याही परीस्थीतीला आपल्या परीने वळवण्याचा प्रयत्न करतो, बरं येवढच काय तर काही घोळ झाला तर लोकशाही चे दाखले देवुन मोकळे होतात. उदा. (माहाराष्ट्रात पसरलेले भैये), सगळ्यात जास्त घाण पसरवणारे, आजार पसरवनारे, जिथे जाईल तिथल्या स्थानिक लोकांचे रोजगार पटकवनारे हे भैये. कमी मजुरीत जास्त काम करनारा मजुर मिळतोय म्हणुन आपण त्याला काम देतो नंतर त्याचे दुषःपरीणाम भोगतो. खर म्हणजे भैये हा प्रकार एखाद्या स्वस्त दारु सारखा आहे किमंत कमी पण दुषःपरिणाम जास्त. परंतु जेव्हा यांना ईथुन काढण्याचा प्रयत्न केला गेला, त्याच बरोबर नविन जनपत परत नं येवु देण्याचा प्रयत्न केला गेला, तेव्हा तेव्हा काही भामटे उठले आणि लोकशाही चे दाखले देऊ लागलेत. काय तर म्हणे या देशा मधे कोणिही कुठेही येऊ जाऊ शकतो, आहो मान्य आहे त्यालाही काही मर्यादा आहे."अतिथी देवो भवः" हे आम्ही सुध्दा मनो भावे मानतो पण अतिथी चार दिवसाचा असेल तर आदरतित्थ करण्यात मजा. असच जर चालु राहील तर माहाराष्ट्राचा उत्तर प्रदेश ,बिहार व्हायला वेळ लागणार नाही. आपल्या लोकशाहीने आपल्या संविधानाने आपल्याला भाषे नुसार प्रांत वाटप केले आहेत. तर प्रत्तेकाच हे कर्त्वय आहे कि त्याने आपल्या परीने आटोकाट प्रयत्न करावेत आपला प्रांत सुधरवण्यासाठी, जर प्रत्येकाने हा विचार केला तर हा देश सुधरायला प्रगत व्हायला वेळ लागनार नाही. पण याचा अर्थ असा नाही कि आपला प्रांत सुधरवण्यासठी ईतर प्रांतावर आक्रमण करावेत. आज गुजरात कडे बघा कसा प्रगत होत चालाय तोही इतरांच नुकसान न करता स्वताः च्या पायावर, आणि तोच बिहार कडे बघा, केंद्रीय मंत्रीमंडळात पद मिळालं तरी ही बिहारची प्रगती ध्धिम्म. लोकशाही-लोकशाही म्हणत लोकशाहीची व्याख्या कराणार्यांनीच लोकशाहीची कशी धिंड काढली आहे ते आपण बघतोच आहोत, मंदीच्या काळात लादलेल्या निवडनुका असो वा अनुकरार असो, किंवा बोफोर्स चे घोटाळे असो. तस पाहाता लोकशाही या विषया वर बोलण्या सारख आणि लिहण्यासारख बरच काही आहे. पण हा "पण" आडवा येतोय, असो परंतु आता अधीक बोलण्यापेक्षा आणि लिहण्यापेक्षा मला वाटत लोकशाही समजुन घेणे  महत्वाच आहे. काहीतरी क्रुती करणे गरजेचे आहे.आणि याची सुरवात स्व:ता पासुन करणे गरजेचे आहे. म्हणुन म्हणतोय आता वायफळ बडबड करण्या पेक्षा आता एकच विचार
जय हिंद जय माहराष्ट्र........

2 comments:

priyanka said...

Hmmmmmm its time to Halla Bol...
Good article keep it up

Ashish said...

Wah! mast article lihila ahe lekhakane...
Halla Bol....


MaharashtraMajha.com