Wednesday, December 2, 2009

निखिल वागळे जरा साभांळुन......

झी मराठि वरील आमने-सामने या वाद-विवादाच्या कार्यक्रमातुन अधीकच प्रसिद्धीत आलेले निखिल वागळेंवर नुक्तिच शिवसेने कडुन पुष्प सुमने उधळल्या गेली आहेत. अहो म्हणजे मार खालायं, बाळासांहेबांवर उटसुट उलटसुलट व्यक्तव्य केल्या कारणाने हा प्रकार घडला. प्रत्येकाशी तडकाफडकी सरळ भाषेत बोलणारा माझा एक आवडता पत्रकार म्हणुन मि त्यांना पाहतो. परंतु कधी कधी खरचं फारच अती करताहो वगळे साहेब वटवट तुम्ही. हल्ला झाल्या नंतर पेटुन उठलेल्या निखिल वागळेंनी लगेचच संपुर्ण पत्रकार यंत्रणेला डोक्यावर घेउन आपण किती शक्तीशाली आहोत हे दाखवण्यासाठी आकांत-तांडव सुरु केला. लोकांनां आपण किती भोळे व आपल्यावर कसा शिवसेनेने अन्याय केला हे दाखवण्याचा आटा-पिटा सुरु केला. लोंकान कडुन exit poll मागितलेत, बिध्द्दास्त बोला कार्यक्रमात मते विचारले असता, त्यांची मते एकण्या एवजी स्वःताचिच वटवट अधिक होती. ति होणारच म्हणा कारण ४८ तासांच्या आत सरकारने शिवसेनेवर कारवाई कारा नाहीतर आम्ही शांत बसणार नाहीत आमची ताकद दाखवु म्हणनार्या वागळेंना एका प्रेक्षकांने एक सुंदर प्रश्न विचारुन शांत बसवल तो म्हणजे "४८ तासात कारवाई झाली नाही तर सरकार वर दबाव आणु म्हणता, आज तुमच्यावर हल्ला झाला म्हणुन ताकद आठवली, तेव्हा का सरकारवर दबाव टाकला नाही जेव्हा मुम्बंई वर हमला झाला, सरकारने त्यांना लवकरात लवकर फासी द्यावी म्हणुन का ही ताकद वापरत नाही तुम्ही? " प्रश्न एकुन गप-गार झालेले वागळे लगेचच विषयांतर करु लागलेत.
या सर्व प्रकारामुळे काही आधिक महत्वाच्या गोष्टी समोर आल्यात, या आधी महानगर दैनीकासाठी काम करणार्या वागळेंबरोबर त्यांचे साथिदार कपिल म्हणुन होते. त्यांनी दै. पुण्य नगरी मधे वागळेंच्या जुन्या कट कारस्थानांचा एक उत्तम लेख लिहला आहे जरुर वाचा. त्यातुन अस कळत की शिवसेनेशी त्यांच जुनच वैर आहे. कपिलजींच्या म्हणण्यानुसार त्या वेळेस महानगर दैनिकाचा विरोध म्हणुन तो जाळण्याचा ऊपक्रम शिवसेनेने हाती घेतला होता. याला घाबरुन वागळेंनी त्यावेळचे शिवसेनेचे नेते विठ्ठल चव्हाण व छगन भुजभळ (ते तेव्हा शिवसेनेत होते.) यांची मदत घेतली, ती मदत करत असतांना विठ्ठल चव्हाण येवठं हि म्हणाले कि जाउ द्या शेवटी मराठी माणुस आहे कशाला त्याच नुकसान करायच. परंतु शिवसेनेच्या भाषेत बोलायच झाल तर या ऊपर्यानी त्यांच विठ्ठल चव्हाणांच्या म्रुत्यु नंतंर ते गुंड होते असं ठरवुन विधानसभेत कशाला त्या साठी श्रध्दांजली वाहता हि नैतिकता आमदारांना शिकवण्याचा शाहाणपना यांनी केला होता. म्हणुन म्हणतोय वागळे साहेब जरा जपुनच बोला नाहीतर उगाच जनमाणसात पेटेल तुमच्या विरुध्द रणसंग्राम.................
उद्या तुमच्यावरच होईल हल्ला बोल.................

राऊतांना आलाय ऊत.............

गेल्या काही दिवसापासुन सामना मधे जे लेख बाळा साहेबांचे म्हणुन खपवले जात आहेत ते वाचुन आपल्या सारख्या सामान्य माराठी माणसांनी काय प्रतीक्रिया द्यावी हेच कळत नाही. कधी मराठी माणसांनिच पाठीत खंजीर खुपसला काय! तर कधी सचीन सारख्या महान क्रिकेट पटुवर सडकुन टिका. आणि महत्वाच काय तर तोही एक मराठी माणुस असतांना. बाळासाहेब आता ८०+ वर्षाचे झाले आहेत. मला तर वाटत आता ते या गोष्टीत लक्षही घालत नसतील. तस पहीले पासुन त्यांचा लाडका संजय ज्याला ते संज्या म्हणातात तेच सामनाचा कारभार पाहतात. मात्र आता संजय राऊतांनी जे काही सामनाचा आडोसा घेवुन चालवलय ते खरचं टिकेस पात्र आहे. संजय राऊत साहेब आपणास आमची नम्र विनंती आहे क्रुपया या सगळ्या गोष्टी जरा कमी करा सामन्य़ जणता व शिवसैनिकांना संभ्रमात आणु नका. त्यानंतर निखिल वागळेंवर हल्ला, हे प्रकरण वादाचच, ते बरोबर की चुक यात लक्ष न घातलेलच बरं, निखिल वागळे खरं तर माझे आवडते पत्रकार, परंतु त्यांची काहीच चुक नाही असंही मि म्हणत नाही. कारण एका हाताने टाळी वाजत नाही........
तरीही राऊत साहेब आपल्याला उगाच ऊत येवु देवु नका. पहीलेच मनसे मुळे बराच धक्का बसलाय त्यातुन सावरुन मराठी माणसांसाठी काम करणारी मराठी माणसांची आपली शिवसेना असा लैकीक परत पोहचवण्यासाठी धडपडण्या ऎवजी, मराठी माणसावरच हल्ले, जरा आवर घाला............