Friday, March 27, 2009

हिंदु नविन वर्षाच्या हर्दिक शुभेच्छा....

गुडी पड्व्याला विजयाची गुडी उभारा दारी सुख शांति नांदे घरी

जय हिंद.. जय माहराष्ट्र...........

लोकशाही आमच्या बापाची

आपल्याला प्रत्येक गावांमधे, शहारांमधे ठिकठिकांणी काही सुचना बघायला मिळतात. उदा. "इथे थुंकु नये", "इथे कचरा टाकु नये", "गाडी लाऊ नये", या सुचनांबरोबर कही मजेदार गोष्टी बघायला मिळतात त्या म्हणजे जिथे या सुचना लावण्यात आल्या आहेत तिथेच नेमका कचरा टकलेला आसतो, थुंलेल असतं, आणि नो पर्किंग मधे गाडी लावण्यात जी मजा असते ना ति काही ऒरच, काही दिवसांआधी जिवाची मुंम्बई करायाला गेलो होतो, तिथे छत्रपती शिवाजी टर्मिनल ला उतरलो। सगळीकडे बरीच स्वच्छता दिसत होती, मुंम्बा नगरी म्हणजे स्वप्ननगरी, गर्दीचा माहासागर तरीही बरीच स्वच्छता बघायला मिळणे म्हणजे खरचं आश्चर्य, पण ते जास्त वेळ टिकल नाही. कारण पुढे तिथल्या सब-वे मधुन जात असतांना मला एक सुचना दिसली ति होती "ईथे थुंकु नये थुंकल्यास कारवाई होइल" परंतु काही थुंकी बहाद्दुरांनी आधिच त्या फलका वरच थुंकुन कारवाई करुन ठेवली होती. काय करणार आमच्या लोकशांहीनी दिलेला अधिकार तो, अशी काहिंची समजुत, नंतर आपणच बोंबलत फिरायच आमच्या देशात किती घाण  आहे, अहो पण ति घानं केली कोणी, तुंम्ही आम्हीच ना, जर कोणि तुमच्या समोर घाण  करत असेल, कचरा टाकतं असेल तर त्याला फक्त सांगुन बघा कि इथे घाण करु नको बाबा, बघा तुम्हाला काय एकायला मिळत ते...... "ही काय तुझ्या बापाची जागा आहे काय?" किंवा "तुला काय करायंचयं?" अस काही तरी ऎकावं लागेल. काय करणार शेवटी लोकशही ना.
नो पर्किंग मधे गाडी लावणे, झेब्रा क्रोसींग च्या पुढे गाडी उभी करणे, या पेक्षा ही धाडसी काम म्हणजे सीग्नल तोडणे, अहो लोकशाही आमच्या बापाची ना कोण अम्हाला काय म्हणनांर आहे. जर पकडलीच गाडी तर देउ ५०, १०० मामांचाही खिसा गरम. आसाच हा भ्रष्टाचार वाढत असतो, याची पाळे-मुळे आपणच वाढवतो आणि नंतर आपल्या देशात केवढा भ्रष्टाचार, लवकरात लवकर याच निर्मुलन व्हायलाच हवं, अश्या काही तरी गप्पा मारत असतो.