Thursday, December 30, 2010

राणे नी भरला "सकाळ" ला दम...

         "बालाजी (अ)प्रसन्न, म्हणून `सकाळ'चे शिंतोडे" या मथळया खाली उद्योग मंत्री नारायण राणे यांनी "सकाळ" दैनिकाचा खरापुच समाचार घेणार पत्र "प्रहार" वेबसाइट वर प्रसिद्ध केले आहे

"‘सकाळ’च्या दिनांक 21 डिसेंबर, 2010च्या अंकात ‘इंद्रायणीतील बांधकामांना राणेंचा जाता-जाता वरदहस्त’ या मथळय़ाखाली मुखपृष्ठावर बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे. दिनांक 21 व 22 डिसेंबरला मी कोकणात असल्यामुळे या बातमीसंबंधी खुलासा करू शकलो नाही.  त्यामुळे या खुल्या पत्राच्या रूपाने हा खुलासा करतो आहे." अश्या प्रकारे सुरुवात करत एक मोठ्ठ पत्र त्यांनी सकाळ च्या संपादकाना लिहल आहे.
पत्राच्या शेवटी राणे म्हणतात.....

 संपादक महोदय, मला आपल्याला एक जाणीव करून द्यावीशी वाटते. मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असताना महसूल विभाग माझ्याकडेच होता. पुण्याच्या सेनापती बापट मार्गावर आज जे टुमदार, सुंदर व सुबक इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर व अन्य बांधकामे उभी आहेत, त्या बांधकामाखालची जमीन त्यांच्या मालकांना त्यावेळी कोणतीही पदरमोड न करता कोणाच्या वरदहस्तामुळे मिळू शकली हे आपण कृपया त्या मालकांना विचारा. प्रामाणिक, नि:पक्षपाती आणि विकासात्मक दृष्टिकोन समोर ठेऊन मी आजवर काम करीत आलो आहे. माझ्यावर विनाकारण शिंतोडे उडविले, तर सहन करण्या-यांपैकी मी नाही. पुण्यातील उद्योगजगत, बांधकाम व्यवसायिक, जनमानसात व पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये ‘सकाळ’च्या पत्रकारितेसंबंधी जे बोलले जाते, ते मला आज न उद्या ‘प्रहार’मधून छापावे लागेल. राणे यांचे नाव घेतले म्हणजे वर्तमानपत्राचा खप वाढतो हे खरे असले तरी, बातमीकरिता माझ्या नावाचा दुरुपयोग केला जाऊ नये, एवढेच लक्षात आणून देण्यासाठी या पत्राचे प्रयोजन!
आपला नम्र,
नारायण राणे.
या गोष्टीवरुन आस लक्षात येत की, आपल्या देशात नवीन Wekileaks सारख्या website सुरु करायची काही गरज नाही, प्रतेक मोठा व्यक्ति सध्या Blog, Twitter, तर कोणी स्वतः चाच वर्तमानपत्र सुरु करुन अशे पत्र व्यहार स्वत:च जनते समोर उघडे करतायेत. नवीन युगातल्या नवीन Media ची जय हो.....
आपल्या ह्यावर प्रतिक्रया नक्की कळवा....

No comments: