Thursday, October 7, 2010

महाराष्ट्रा बाहेरील बाळ ठाकरे...

              महाराष्ट्राची एकमेव ओळख, एकमेव अभिमान म्हणजे,
"छत्रपति शिवाजी महाराज". महाराजांनी रक्ताच पाणी करुन महाराष्ट्राची बाग़ फुलवली, जो महाराष्ट्र देशाच्याच नव्हे तर जगाच्या नकाशावर सर्वोतपरी प्रबळ ठरला होता. पण मध्यंतरिच्या काळात प्रतेका साठी आपली दारं  उघडी करुन देणारा महाराष्ट्र अनेकांच्या रंगात, रंगता-रंगता स्वतः चा रंग विसरायला लागला होता. परत गरज होती ती मराठी चा स्वाभिमान जागवण्याची, मराठी माणसाला एकत्र आणण्याची आणि ते काम घडल माननीय शिवसेना प्रमुख बाळा साहेब ठाकरे यांच्या कडून, पण त्याच बरोबर त्यांच्या वर बरीच टिका ही झाली. आजही बरीच महाराष्ट्रातलीच मराठी माणस त्यांच्यावर टिका करायला मागे पुढे पाहत नाहित.
        पण याच्याच उलट जेव्हा आपण महाराष्ट्रा बाहर जातो, तेव्हा महाराजां नंतर महाराष्ट्रा ची ओळख होते ती बाळा साहेब ठाकरे यांच्या नावानेच. मग ते बाहेरील प्रांतात असो की देशात, महाराष्ट्रा बाहर जेव्हा जातो तेव्हा साहजिक प्रश्न विचारला जातो तो म्हणजे "Where are you from?"  महाराष्ट्र अस सांगितल्या वर "बाळ ठाकरे" असा काहीतरी reply  त्याच्या कडून मिळतो. काल पर्यंत ज्यांना
आपण महाराष्ट्रात राहून Fundamentlist म्हणत होतो आचानक आपण त्यांचे गुणगान गायला लागतो. त्या प्रांतात गेल्या नंतर तिथल्या लोकांच त्याच्या मात्रुभाषेवारिल वरील आणि त्यांच्या संस्क्रुतिवरिल प्रेम पाहून बाळा साहेबांच्या गोष्टी मनाला पटायला लागतात.