Thursday, September 6, 2012

महात्मा बसवेश्वर आणि आजचा लिंगायत समाज

          महात्मा बसवेश्वरांच्या जीवनाचा आणि लिंगायत समाजाचा सखोल अभ्यास नसतानाही ह्या विषयावर बोलण जरा कठीणच.
कारण महात्मा बसवेश्वर हे नाव  आणि त्यांच्या विचारातून निर्माण झालेला  लिंगायत समाज हे काही आज जन्माला आलेलं नाही हा बाराशे व्या शतकां पासून चालत आलेला इतिहास आहे. मात्र ज्या कारणा साठी आणि जी मनीषा मणात ठेवून बसवेश्वरांनी हि खटाटोप केली होती, आणि हा सर्व उपद्व्याप करण्यासाठी जी काही टीका सहन केली होती तो विचारच आज इतिहास जमा होऊ लागल्याच चित्र दिसतंय. 
महात्मा बसवेश्वरांनी ज्या विचारांवर लिंगायत समाज स्थापन केला तो म्हणजे
"माणूस हा त्याच्या जन्माने नव्हे तर समाजात केलेल्या कर्माने मोठा होत असतो"
हा विचार त्यांनी आणि त्यांच्या अनुयायांनी मनाशी घट्ट धरून जात पात गाडत, धर्माच्या भिंती पाडून लिंगायत समाजाची मुहूर्तमेढी रोवली. लिंगायत धर्मात कुठल्याही जातीच्या, व धर्माच्या लोकास येण्यास बंधनं ठेवली  नाहीत,  जातीपातीची बेडी तोडून गळ्यामध्ये शिवलिंग धारण करा आणि माणुसकीचा अर्थ सांगणारा लिंगायत शिव शरण म्हणून वावरा. असा हा सर्वधर्म समभाव सांगणारा सामाज त्या काळात

Monday, April 2, 2012

Scene 1 


 निवेदक :- वसतिगृह,  प्रत्येकाने आपल्या तारुण्यात अनुभवाव अस एक ठिकाण. इथे अनेक ठिकाण ची अनेक व्यक्ति तुम्हाला बघायला मिळतिल. इथे  येणारा प्रत्येक व्यक्ति आपल्या मनात एक नवीन स्वप्न घेवून दखल होतो. स्वप्ना बरोबरच मनात एक भीती ही असते, ती म्हणजे घरापासून दूर रहाण्याची आणि तिथले इतर विद्यार्थी आपल्याशी कसे  वागतील याची. परंतु काही दिवसांनी ही भीती तर दुर होतेच पण त्याच बरोबर  कळत नकळत आपणही त्यांच्यातलाच एक हिस्सा  झालेलो असतो. नंतर सुरु होतो तो नवीन आयुष्याचा प्रवास नवी स्वप्न नवी आशा उराशी बाळगुण.
प्रत्येक विद्यार्थी इथे एक वेगळच स्वप्न घेवून आलेला असतो इथे आल्यावर त्याच्या स्वप्नाना पंख फुटतात एक दिशा मिळायाला सुरुवात होते. पण कधी कधी काही वेगळच घडत,  एखादा स्वप्न एक बघतो परंतु ध्येय काही तरी निराळ असत आणि खर्या आयुष्यात बनतो मात्र कहीतरी अलगच. पण हे काही असल तरी वसतिगृहाच्या आठवणी आणि अनुभव मात्र जीवनभर सोबत रहातात.
          अश्याच काहिश्या आठवणीनी भरल आहे हे  वसतिगृह, आजही इथे आहे  तीच  मस्ती, तोच  धिंगाना,
आणि तीच परिक्षेच्या काळातली स्मशान शांतता.अश्याच अनेक कहाण्यां मध्ये दडलेली हि एक कहाणी.

रोज सारखीच आजची पाहाट, सकाळचे ७ वाजलेत, वसतिगृहाची कमावली "शांती मावशी" तिला अवगत असलेली एकमात्र  कला म्हणजे झाडझूड त्याच कलेचा उत्कृष्ठ वापर तीचा आजही तसाच लगबगीने सुरु आहे...
   आता बघूया इथे राहणार्या काही इरसाल नमुन्यांच काय सुरु आहे ते.
रूम नं. १०१ हे आहेत "खुशवंत " उर्फ "खंडू खोप्शे" अंगावरती एकही कपडा न ठेवता झोपणे हे श्रीमंत Hollywood वाल्यांच लक्षण असा ह्याचा गोड गैर समाज. तर हा दुसरा "विष्णु" पायाच्या बोटापासून डोक्याच्या केसा पर्यंत स्व:ताला झाकल्या शिवाय ह्याला झोपच लागत नाही. आणि एकदा ज्या स्थितीत तो झोपेल तो सकाळ पर्यंत तसाच, त्यामुळे बर्याचदा गैरसमज होतो कि हा भडवा जिवंत आहे कि मेला, आता ह्याचं मुखदर्शन हे उठल्यावारच, शेजारी आहे तो "मकरंद" उर्फ  "थापाड्या" पुस्तक वाचताना झोप लागल्याने पुस्तकच पांघरून घेतलंय ह्यांनी.
Now lets see  रूम नं. १०२ इंग्रजाचे वंशज ह्याच रूम मध्ये राहतात, बोले तो हिंदी, इंग्लिश, मराठीची मिसळ करणारे हे "Mr. Sam" खोट वाटतंय एका तर.
"ये Sam उठ ये सकाळ झाली"
"Hey Man shut up  झोपू दे मेरे कु"
बघितलं आस आहे हे, next  please हा आहे "दीपक" (दाटून आलेलं पोट दाबत आणि जांगेला खाजवत आहे) असो हि ह्याची नेहमीची सवय. अरे बाप रे "चैतन्य" आज पण झोपला नाही वाटत,
"ये "चैत्या" आज पण झोपला नाहीस का? काय वाचतोस?"
"No yaar i have to complete this झोपतो नंतर "
"अरे उठायची वेळ झाली झोपतो कधी"
"please just go away yaar "
च्या आईला ह्या इंग्लिश ची उगाच रुबाब....
 आता रूम नं १०५ "रंग्या भाई" (रूम मध्ये सूर्यनमस्कार काढतोय) इथले Leader, भाई एकटेच राहतात, बाकीच्यांना भाई ची भीती वाटते. भाई तसे इथलेच पण घरा पासून collage दूर असल्या मुळे ते वसतिगृहात राहतात. तसे भाईचें बरेच किस्से आहेत.
 आज वसतिगृहात काही नवीन मुल येणार आहेत त्यापैकी दोघांना भाई च्या रूम मध्ये जागा मिळणार आहे...
बघूया किती दिवस टिकतात ते...

                                                                 Scene ३


(वसतिगृहाच्या गेट मधून "स्वरराज" यात येतो काही मुलांची अंघोळीला जायची तयारी, तर काही अंघोळ करून आलेत, काही दात घासत बसलेत तर काही पेपर वाचत आहेत कोणी तरी आळस  देत खाली आलाय, शांती बाई झाडू जागेवर ठेऊन बाहेर जात आहे.)

 स्वरराज:- इथे रेक्टर चं office कुठे आहे?
दीपक :- (हाप चड्डी आणि ती-शर्ट वर दात घासत उभा आहे) ते इथे नाही (बेसिन मध्ये थुंकून) गेट च्या बाहेर पलीकडच्या बिल्डिंग मध्ये, पण आता बंद असेल morning walk ला जातो.
विष्णू:- (डोळे चोळत बाहेर येतो, अंगावरती फक्त एक टोवेल) morning walk ला कसला "शांता बाईच्या" माग माग गेला असेल भडवा...
(सगळे हसतात स्वरराज मात्र हलकासा लाजतो)
दीपक:-  (बेसिन मध्ये थुंकत) new Comer  का?
Mr. Sam :- Which room No?
स्वरराज:- (हातातली  bag खाली ठेऊन खिशातला form काढतो) आं रूम नं १०५
(सगळे आवक होऊन स्वरराज कडे बघतात दीपक थुंकी तशीच गिळतो, Sam नखे खात डोळे फाडून बघत राहतो. )
विष्णू:- (gallary मधून ओरडतो) इथून सरळ.
स्वरराज:- Thanks
विष्णू:-Best Of  luck
(सगळे हसतात, स्वरराज मात्र आश्चर्य चकित चेहऱ्याने सगळ्यांकडे बघत पुढे निघतो)
(स्वरराज जरा पुठे जातो तोच समोरून येणारा मकरंद त्याला अडवतो )
मकरंद:- का रे ये हेकनीच्या कुठ जाऊन रायला?
स्वरराज :- आपण कोण?
मकरंद:- बाप्पा! तू मले विचारून रायला "आपण कोण म्हणून?" नवीन आला का बे?
स्वरराज:- हो आजच आलोय.
मकरंद:- नाव काय बे?
स्वरराज:- माझ नाव स्वरराज.
 मकरंद:- अबे चोंग्या पूर्ण नाव सांगायचं शिकवलं नाही का बे तुले कोणी?
स्वरराज:- अं.. "स्वरराज देवधर सहस्त्रबुध्ये"
 मकरंद:- बामन आहे का?
 स्वरराज:- हो..
 मकरंद:- कुठून आला?
स्वरराज:- कोकणातून गावच नाव अलिबाग, रायगड जिल्हा.
मकरंद:- अबे ये तो अलिबाग से आयेला है...
(सगळे हसतात)
 Mr. सम:- ओय मक्या जाने दे उसको... ज्यादा छळ मत... रंग्या के रूम मी रेहने वाला है..
 मकरंद:- (तोंडावर हात ठेवत) अबे त्वा मायाचा मेला बट्या
(स्वरराज मान खाली घालून रूम नं १०५ जवळ जातो रूम ला कुलूप बघून इकडे तिकडे बघतो तर सगळी मुल दुरून एकत्र जमा होऊन त्याच्या कडे बघत असतात त्यातलाच एक जन मानेने खूनवून त्याला चावी welcome mat च्या खाली म्हणून सांगतो, स्वरराज  कुलूप आणि दरवाजा उघडून आत जातो.)

                                                                     Scene ४


(वसतिगृहाच्या शेजारी एक  मुलींचा शिकवणी वर्ग सुरु असतो, तिथे परिसरातल्या सगळ्या मुली शिकवणीला येतात  वसतिगृहाच्या मागच्या बोळातून शिकवणीला जाण्याचा विशाखाचा आणि तिच्या मैत्रिणीचा रोजचा मार्ग  विशाखा हि अगदी साधी सरळ  मुलगी पंजाबी ड्रेस , अंगभर ओढणी लांब सरळ केस आणि छातीशी कवटाळलेले पुस्तक खाली मान घालून रोज त्याच मार्गाने जाणारी. वासातीगृहातला सगळ्यात घाणेरड्या वर्तवनुकीचा भाईची पक्का दुश्मन  "राहुल " दोघानाही विशाखा आवडते. )

राहुल:- (लाल शर्ट, काळी जीन्स शर्टचे दोन बटन उघडे आणि कॉलर मागे फेकलेली, वसतिगृहाच्या मागच्या     बोळातून जातोय तोच समोर विशाखा आणि मैत्रिणी येत आहेत त्यांच्या समोर उभा राहून ) आज सुट्टी आहे म्हणे class ला जायचं का मग Picture ला नवीन लागलाय बाल्कनीत बसून बघू येणार काय..?
विशाखाची मैत्रीण:- ये रस्ता सोड तिचा
राहुल:- ताई तुम्ही जावा घरी, बोलतोय मी आणि माझी परी.
विशाखा:- वाट सोड (मान खाली घालून धावत सगळ्या तिथून निघून जातात)
                                                                      Scene ५
(राहुल वसतिगृहात येतो रूम नं १०५ मध्ये रंग्या व्यतिरिक्त कोणीतरी दुसरा दिसतो तर तो ते बघून थोडासा घाबरत आत शिरतो )
राहुल:- काय रे तू कोण? रंग्या नाही का? (असं म्हणत खिडकी जवळ च्या Cot वरती अडवा होतो)
स्वरराज:- नाही मला नाही माहिती मी नवीन आहे. आजच आलोय.
राहुल:- ते कळतंय बे... कुठं आला?
स्वरराज:- अलिबाग
राहुल:- अलिबाग से आयेला है... देख Tension नाही लेणे का.. कूच भी लफडा हुवा अपने को बोलणे का, क्या समज्या. बिलकुल बिनधास्त रहेने का chill एकदम अपुन है ना.
स्वरराज:- (समान आवारातच तो त्याच्या शी बोलतो) Thanks, by the way तुमच शर्ट छान आहे बर का.
राहुल :- होय काय? मग जमतच नाही आपल्याला अस तस, Branded एकदम. (अचानक खिडकीतून त्याला खाली विशाखा दिसते आणि राहुल तिला बघून शिट्टी वाजवतो) ओय जानेमन.. बाल्कनी... हाहाहा 
(स्वरराज घाबरतो)

                                                                       Scene ६
(कट्ट्यावर सिगारेट पीत रंग्या उभा आहे विशाखा आणि तिच्या मैत्रिणी त्याच्या जवळ जातात, त्यांना बघून रंग्या सिगारेट विझवत त्यांच्या जवळ येतो. विशाखाच्या मैत्रिणी सकाळी झालेला प्रकार त्याला सांगतात आणि वसतिगृहाच्या रंग्याच्याच खिडकी कडे बोट दाखवत सांगतात कि तोच लाल शर्ट वाला मुलगा तिथून शिट्टी मारतो, आणि नेमक हे खिडकीतून राहुल ला दिसत )

राहुल:- अरे नाव काय रे तुझं?
स्वरराज:- स्वरराज...
राहुल:- हा हा तेच ते.. तुला शर्ट आवडलं ना आपल.. चाल घालून दाखव बघ, घे रे घाल रे...(शर्ट काढून स्वरराज च्या हातात देतो) मी दुसर शर्ट घालून येतो तो पर्यत काढायचं नाही अजिबात कळल का रे?
(स्वरराज गपचूप T-Shirt काढून ते Shirt घालतो राहुल तिथून निघून जातो)

(रंग्या रागाच्या भरात वसतिगृहात येतो त्यात रूम चा दरवाजा उघडा बघून त्याची आणखीनच सटकते तो काहीही विचार ना करता आत घुसतो आणि स्वरराजला भरपूर बदडतो)

रंग्या:- साला पोरीला छेडतो, शिट्ट्या मारतो भाडखाऊ, (मकरंद, दीपक सोडवायला येतात ) अबे छोड साला आई घाला पोरगी छेडतो. कोण कोण आहे कोण रे हा.. 
(स्वरराज दाबून अंग चोळत Cot  वर बसतो)