Saturday, October 16, 2010

परकीय भाषेतून कमाई....

भाषेचा उगम हा पाषाण युगा नंतर झाला,
अस मी कुठे तरी वाचल होत. पाषाण युग म्हणजे (Stone age).
आदी-मानव सुरवातीला खानाखुना करुन म्हणजे Sign Language मधे बोलायचा, नंतर हळू हळू संभाषणा साठी भाषेचा वापर होऊ लागला. वेगवेगळ्या जागे नुसार, संस्कृती नुसार त्याचा विकास होत गेला. आज जगात किती तरी भिन्न भिन्न भाषा बोलल्या जातात. बाकी जागाच राहू द्या बाजूला, आपल्या भारतातच बघाना प्रत्येक प्रांतात एक भाषा आणि प्रत्येक ५० किमी. नंतर त्याच भाषेची वेगळीच लय दिसून येते, उदा. महाराष्ट्रात मराठी एकच  भाषा पण किती वेगवेगळ्या पद्धतीने बोलली जाते. विर्भातली "वर्हाडी", कोकणातली "कोकणी,मालवणी", खानदेशातली "खानदेशी मराठी" मराठवाड्यातही एक वेगळाच लय एकायला मिळतो मराठीचा, त्यानंतर येते ती मुंबई ची "बंबईया मराठी", आणि पुण्याची "शुद्ध पुणेरी मराठी" ई.
   जस की मी वर लिहले की भाषेचा वापर हा संभाषणा साठी व्हायचा, आजही त्याच साठी होतो, पण आज त्या व्यतिरिक्त भाषेचा वापर पैसा कमावान्या साठी ही केला जाऊ शकतो. होय, कुठलीही परकीय भाषा शिका आणि "Transalator", "Dictator" म्हणून चांगल्या पगाराचा Job मिळवा. कामित कमी २००००/- हजार दर महा कमाऊ शकता...