Thursday, August 4, 2016

आपल्या मधले आंबेडकर जागवा...

भारत हा फक्त एक देश नसुन एक हजारॊ वर्ष जुनी संस्क्रुती आहे, अनेक चांगल्या, वाईट रुढी आणि  परंपरानी व्यापलेली.
परंतु ह्या उद्दात्त, उत्तम संस्क्रुतीला ग्रहण लागल ते जाती-पातीच, समता आणि विषमतेच.
ह्याची खरी उतपत्ती झाली ती वर्ण व्यवस्थेतुन.
भारतीय समाजाचे प्रमुख चार वर्ण
१. ब्राम्हिण (पुजारी,गुरु,शिक्षक)
२. क्षत्रिय (राजा, शाषणकर्ता, योद्धा)
३. वैश (शेतकरी, व्यापारी) आणि
४. शुद्र (मजदुर, सेवक)
शुद्र समाजाला ह्या वर्ण व्यवस्थेमधील प्रथम तिन म्हणजेच ब्राम्हिण, क्षत्रिय आणि वैश समाजाकडुन अमानवीय वागणुक दिली गेली.

अस्प्रुष्य म्हणुन त्याना समाजातुन सतत उपेक्षित ठेवल गेल.परंतु ह्या व्यवस्थेला छेद देण्या साठी पुरातन काळातही काही प्रयत्न केल्याच आपण अनेक महकथा मधुन वचतो,
उदा. प्रभु रामचंद्रानी खाल्लेली शबरी चि उष्टी बोर असोत किंवा श्री क्रिष्णा ने खाल्लेले सुदामाचे पोहे.
त्यानंतरच्या काळात, संत कबीर, संत ग्यानेश्वर, संत तुकाराम महाराज ई. अनेक संत माहात्म्यानी आपल्या वांड.मयातुन समाज सुधारणेचा वसा जोपासला.
परंतु समाज मनाच्या मानसीकतेवर सखोल परीणाम होण्यासाठी येवठस पुरे नव्हत बहुतेक. कारण ह्या नतंर हि समाज व्यवस्था अशिच चालत गेली,
किंबहुना अजुन बिघडत गेली. शुद्र समजले जाणारे समाजातिल घटक हे सुध्दा मणुस आहे हे उच्चवर्णिय विसरलेत.

पंरतु ह्याच परिस्थितित एक सुभेदार महाराच्या घरी त्याच १४ व आपत्य जन्माला आलं. आणि त्यांनी संपुर्ण समाज व्यवस्थेला आणि ईतिहासाला हादरवुन सोडल.
ते होते भारतरत्न Dr. भिमराव रामजी आंबेडकर,

"बाबा साहेब", "महामानव", "युगपुरुष", "घटनाकार" अश्या अनेक नावांनी हा देश त्याना ओळखतो.
शाहीरानी खुप छान म्हटलय की, "उद्धारीली लाखो कुळे, भिमा तुझ्या जन्मामुळे."

बाबा साहेबांचा जन्म महु ह्या गावी १४ एप्रिल १८९१ साली झाला, त्यांनी आपल संपुर्ण आयुष्य पिडित आणि शोषीतांच्य उद्धारा साठी वाहुन घेतल.
पण ह्या शोषित समाजाच्या उद्धारा साठी, न्यायासाठी आणि मानुस म्हणुन जगण्याच्या हक्कांसाठी ह्या मानवास महामानव म्हणुन घडत असताना जनावराच जिन जगाव लागल,
हे अपना सर्वांनाच माहीती आहे.
शाळा शिकण्यासाठी केलेला संघर्ष असो कींवा उच्चशिक्षाणासाठी लंडन ला जातांनाची कसरत, येवठ पांडित्य ग्रहण करुनही नॊकरी च्या ठीकाणी मिळालेली हिन वागणुक असो..
हे सगळे प्रसंग झेलत स्वत: ला सिध्द करण्या साठी आणि त्याहुन हि अधिक समजाच्या संपुर्ण विकासासाठी ऎखाद्या अजींक्य योध्या प्रमाणे लढलेत आणि जिंकलेत.

Saturday, April 18, 2015

पुणे वाहतूक

 
पुणे तिथे काय उणे असे म्हणुन उणेकर (माफ करा पुणेकर असं लिहायचं होत),
तर "पुणेकर" स्व:ताचिच पाठ थोपटून घेतात. परंतु  पुण्या मधेही काहीतरी उणे आहेच हे पुणेकरांनी हि मान्य करायला हवं, ते म्हणजे पुण्याची बेशिस्त वाहतूक व्यवस्था आणि बेशिस्त पुणेकर.
पुण्यात सध्या दोन पुणेकरांचे गट पडतात एक म्हणजे जुने पुणेकर आणि सध्या बाहेरून येउन पुण्यात स्थाईक झालेले नवीन पुणेकर. जेव्हा कोणि पुण्याला किवां पुणेकरांना बेशिस्त पुणेकर अस म्हणतो तेव्हा दोघेही एकमेकां कडे बोट दाखवून मोकळे होतात. आज पुणे शहाराच्या वाहतुकीची जी अवस्था आहे ती पाहून पुणे शहराला ही गुदमर्लेल्या  सारखा होत असेल. जगभरामध्ये वाहतुकी साठी नवीन नवीन गोष्टींचा वापर होऊ लागला आहे, Railway, Metro, Bullet Train, Intercity Water Transport, Private Jet. ईत्यादी अनेक गोष्टींनी प्रवासी वाहतूक व्यवस्था सुरळित केलेली आहे. अनेकदा आपण वाचतो कि जापान मधे कंपनी चे CEO सायकल ने ऑफीस ला जातात, तर UK मधे Managers खाजगी वाहना ऐवाजी Metro किंवा इतर Public Transport चा  वापर करतो. परंतु हिंजेवाडी च्या रस्त्यावर बघाल तर साधा Team Leader सुद्धा कार मधुन जातान दिसेल. ह्याचा अर्थ आपण खुप प्रगत आहो किंवा आपल्या लोकांकडे खुप पैसा आहे अस काही नाही, हे फ़क्त आपल फ़सलेल Public Transport  म्हणुन हा पर्याय. PMPL च्या बसेस ची वाट बघत बसायच, ति आल्यावरही त्यात लोंबकणारे लोंढे हे पाहुनच मनात धस्स होत, त्यात बसायची हिम्मत होइलच अस नाही.
आणि पुण्यात Auto म्हणजे न बोललेला विषय, मिटर हे फ़क्त दिखाव्यासाठीच असतात. जरा लांब जायच असेल तर ५००-६००/- हा आकडा सांगुन मोकळे होतात. यायच तर या, नाही तर बसा "बस" ची वाट बघत. किंवा ६ सिटरAuto जे प्रत्येक ५मिनिटाला सवारी बसवण्यासाठी नाही तर कोंबण्या साठी थांबवत थांबवत नेतात, वर त्यांची मुजोरी ही सहन करवी लागते, म्हणुन आज पुण्यात प्रत्येक जण आपल खजगी वाहन वापरण जास्त सोईच मानतो, आणि अश्यानेच पुण्याच्या वाहतुकिचा प्रश्न दिवसेंदिवस जटील होत चालला आहे.

Sunday, April 12, 2015

Foreign Language (JLPT)





परकीय भाषेतुन कमाई हा लेख आत दृष्य स्वरुपात.
इतर व्हीडिओ बघण्यासाठी ह्या लिंक वर क्लिक करा New Vedios


Thursday, April 9, 2015

लेख आता दृष्य स्वरूपात

आपल्या रणसंग्राम वरती एक नवीन उपक्रम चालू केलेला आहे. काही निवडक लेख आणि' कवितांच Recording करून त्यांना दृष्य स्वरूपात दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न हाती घेतला आहे,
त्याच बरोबर इतरही काही विषयांवर Videos बनवून इथे व्हिडीओ या सदरा अंतर्गत प्रदर्शित  करण्यात येणार आहेत. आशा आहे आपल्याला हा छोटासा प्रयत्न नक्कीच आवडेल.
धन्यवाद.
ह्या लिंक वर क्लिक करा New Vedios



Saturday, June 1, 2013

शेतकर्याची ट्वेन्टी-२०...

This is Guest Article by Mr. Ashish Kulkarni, 
हिंन्दुस्तानच्या संघाने  2007 ला पहिला ट्वेंटी-२० चा विश्वचषक झिंकला आणि सगळीकडे अगदी एकच जल्लोष चालु आहे. सर्वांना खुपच आंनद झालाय अगदी दिवाळॉ साजरी होतीये सर्वत्र. मि सुद्धा अगदी बेहोष होउन नाचलो. दुसर्या दिवशी एक एक आकडे बाहेर येऊ लागले आणि…. बापरे बाप.. केवढी हि बक्षिसे, काय हे मोठे मोठ्ठे आकडे. प्रत्येक खिळाडु अगदि करोडपती झाला. आमच्या मुख्यमंत्र्यांनी १०-१० लाखाची बक्षीसे जाहिर केली.
पण मनात एक खंत होतीच आमचे हेच मंत्री जेंव्हा विदर्भातले शेतकरी व्याजमाफी द्या म्ह्णुन अर्ज करतात तेंव्हा अगदी “ग्रेट इकॉनॉमिस्ट” असल्याचा भास निर्माण करत नकार देतात आणि इथे मात्र पैशांची खैरात होतीये, खेळाडुंना पैसे जाहिर करताना कसा नसतो यांच्या तिजोरीत खडखडाट? प्रत्येक खिळाडुला या आधीच एकढा प्रचंड पैसा मिळालेला असताना आणखी हे दहा लाख कश्या करता? त्याच वेळी एक कल्पना सुचली.. शेतकर्यांच्या भल्या साठी..
आपण भरवायची शेतकर्यांची ट्वेंटी-२०
धम्माल मजा येईल, विदर्भातल्या १२ टिम्स. प्रत्येक संघा मध्ये १२ शेतकरी. शरद पवार (साहेब), शेतकर्यांचे कैवारी, पुरस्कर्ते शोधुन आणतीलच. मग बक्षीसे जाहिर होतील शेतकर्यांसाठी..
१ चौकार मारला कि एक लाख रुपये.
१ षटकार मारला कि सहा लाख रुपये आणि कोणा एका शेतकर्याने जर मारले सहा चेंडुंमध्ये सहा षटकार तर त्याला हि आपल्या युवराज सिंह प्रमाणे एक करोड रुपये मिळतील. बिचारे शेतकरी आपले आणि आपल्या गावाचे कर्ज फेडुन सुखाने जगतील तरी.
सध्या ना बियाणे चांगले मिळतय ना त्यातुन पिकणार्या मालाला चांगली किम्मत मिळतीये. तर मग मित्रांनो शेतकर्यांना पैसे मिळवुन द्यायची हि आईडियाची कल्पना कशी वाटतीये? जरुर कळवा.
आपण भरवायची ना मग शेतकर्यांची ट्वेंटी-२०?
आशिष कुलकर्णी