This is Guest Article by Mr. Ashish Kulkarni,
हिंन्दुस्तानच्या संघाने 2007 ला पहिला ट्वेंटी-२० चा
विश्वचषक झिंकला आणि सगळीकडे अगदी एकच जल्लोष चालु आहे. सर्वांना खुपच आंनद
झालाय अगदी दिवाळॉ साजरी होतीये सर्वत्र. मि सुद्धा अगदी बेहोष होउन
नाचलो. दुसर्या दिवशी एक एक आकडे बाहेर येऊ लागले आणि…. बापरे बाप.. केवढी
हि बक्षिसे, काय हे मोठे मोठ्ठे आकडे. प्रत्येक खिळाडु अगदि करोडपती झाला.
आमच्या मुख्यमंत्र्यांनी १०-१० लाखाची बक्षीसे जाहिर केली.
पण मनात एक खंत होतीच आमचे हेच मंत्री
जेंव्हा विदर्भातले शेतकरी व्याजमाफी द्या म्ह्णुन अर्ज करतात तेंव्हा अगदी
“ग्रेट इकॉनॉमिस्ट” असल्याचा भास निर्माण करत नकार देतात आणि इथे मात्र
पैशांची खैरात होतीये, खेळाडुंना पैसे जाहिर करताना कसा नसतो यांच्या
तिजोरीत खडखडाट? प्रत्येक खिळाडुला या आधीच एकढा प्रचंड पैसा मिळालेला
असताना आणखी हे दहा लाख कश्या करता? त्याच वेळी एक कल्पना सुचली..
शेतकर्यांच्या भल्या साठी..
आपण भरवायची शेतकर्यांची
ट्वेंटी-२०
धम्माल मजा येईल, विदर्भातल्या १२ टिम्स.
प्रत्येक संघा मध्ये १२ शेतकरी. शरद पवार (साहेब), शेतकर्यांचे कैवारी,
पुरस्कर्ते शोधुन आणतीलच. मग बक्षीसे जाहिर होतील शेतकर्यांसाठी..
१ चौकार मारला कि एक लाख रुपये.
१ षटकार मारला कि सहा लाख रुपये आणि कोणा एका शेतकर्याने जर मारले सहा चेंडुंमध्ये सहा षटकार तर त्याला हि आपल्या युवराज सिंह प्रमाणे एक करोड रुपये मिळतील. बिचारे शेतकरी आपले आणि आपल्या गावाचे कर्ज फेडुन सुखाने जगतील तरी.
१ षटकार मारला कि सहा लाख रुपये आणि कोणा एका शेतकर्याने जर मारले सहा चेंडुंमध्ये सहा षटकार तर त्याला हि आपल्या युवराज सिंह प्रमाणे एक करोड रुपये मिळतील. बिचारे शेतकरी आपले आणि आपल्या गावाचे कर्ज फेडुन सुखाने जगतील तरी.
सध्या ना बियाणे चांगले मिळतय ना त्यातुन
पिकणार्या मालाला चांगली किम्मत मिळतीये. तर मग मित्रांनो शेतकर्यांना पैसे
मिळवुन द्यायची हि आईडियाची कल्पना कशी वाटतीये? जरुर कळवा.
आपण भरवायची ना मग शेतकर्यांची
ट्वेंटी-२०?
आशिष कुलकर्णी
No comments:
Post a Comment