मला या निसर्गाने आणि त्याच्या सौंदर्याने नेहमीच आश्चर्यचकित केलय.
भारत हा जसा भाषा आणि संस्क्रुतीच्या विविधतेने नटलेला देश आहे,
तसेच निसर्गाने हि त्या सुंदरतेच्या विविधतेची उधळन मनसोक्त केली आहे.
जेव्हा कधी मला ह्या निसर्गाची पवित्रता अनुभवायची मिळते तेव्हा तेव्हा मन उचंबळुन येत.
तर अश्याच एका निसर्गाच्या सानिध्यातील सहलीला आम्हि निघालोय.
The South western part of कर्नाटक, जिथे निसर्गाने अशी काही जादु केली आहे जी आम्हि शहरांमधे हरवुन बसलोय. आम्ही निघालोय "कुर्ग" ला.
निसर्ग सौदर्य, स्थानिक स्वदिष्ट जेवन, आणि Coffee च्या झाडांची बंदिस्त सुगंध.
आरामदायी ट्रिप ला अजुन काय हवय?
आम्हि कुर्ग च्या दिशेने असताना अमच्या लिस्ट मधे पहिला स्टोप होता. बालेकुपे मधिल golden temple,
हि एक तिबेटियन मोनेस्ट्रि आहे, तिबेटियन संस्क्रुतिला भारतात एक वेगळेच महत्व आहे.
तिबेटच्या बहेरील हि मोनेस्ट्री दुसर्या क्रमांकाची आहे, या मंदिराची बांधनी आणि Structure खरच तुम्हाला inspire करुन जातं.
त्यानंतर आम्ही निघालो अमच्या दुसर्या stop कडे, "दुबारे Elephant camp" आणि वॉटर राफ्टिंग.
जिथे अम्हि जास्त मजा केली ति म्हणजे वॉटर राफ्टिंग, नदिच्या मधोमध जावुन पोहणं काय असत हे अम्ही तिथे अनुभवलं.
ति धमाल अनुभवल्या नंतर अम्हि निघालो आमच्या Resort कडे निसर्गाच्या कुशीत असलेल्या या Resort मधे आम्ही मुक्कामी थांबलो, जिथे रात्र या विचारत जात होती कि सकाळी अजुन काय नवीन बघायला मिळणार.
सकाळी उठल्यावर तिथला परिसर बघुन मन प्रसन्न झाल. रात्री भयान अंधारातला हा Resort मात्र सकाळी सुर्यकिरणानी न्हावुन निघलेला परिसर मन सुखावुन गेला.
इथल्या अद्भुत जंगलात निस्र्गाचे अनेक मोती दडलेले आहेत, त्यातच ताठ मनेने उभ असलेल हे "थलकावेरी मंदीर". हे मंदीर कावेरी नदिच उगम स्थान, जिथे निसर्ग मोठया सुंदरतेने आपले रंग बदलत असतो.
त्याच्याच पुढे मेडेकरी गावापासुन ८ कि.मी. अंतरावर आहे आबे फ़ॊल, जो Coffee बागांनी वेढलेला आहे आणि इथले कोसळणारे धबधबे हे कावेरी नदिला जोडणारे आहेत .
त्या नंतर बघायला मिळाल ते निसर्गधाम Forest, जे बांबु च्या व्रुक्षानी दाटलेल आणि अनेक पक्षानी नटलेल.
कुर्ग आणखी एका गोष्टि साठी प्रसिध्द आहे ते म्हणजे इथले मसाले, Coffee Beans, Home Made Wine’s, आणि Home Made Chocolate’s साठी. अश्च्र्याची गोष्ट म्हणजे ह्या वाईन्स मधे Alcohol contains नाही.
अश्या प्रकारे अम्ही इथले मसाले आणि Chocolate’s घेउन अमच्या परतिच्या दिशेने निघालॊ.
परंतू आमचा प्रवास इथेच थांबत नाही, Because this is not a destination.
No comments:
Post a Comment