दिवसागणिक आधुनिकतेच्या जोडीने सतत नावीन्यपूर्ण पद्धतीने वाढत असलेलं क्षेत्र म्हणजे करमणूक आणि मनोरंजनाचे क्षेत्र. कुण्याकाळी राजदरबारांमध्ये राजाश्रयाने मनोरंजनाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढीस आले, नवनवीन प्रयोग घडत गेले, त्या काळातील कलेची जाण असणाऱ्या राजा माहाराजांनी कलाकारांना मोठं केलं. संगीत, नाट्य, नृत्य, खेळ अश्या अनेक कला-गुणांना वाव मिळाला.
त्यांनतर हेच मनोरंजनाचे क्षेत्र राजदरबारातून बाहेर येत जनसामान्यात मिसळलं वगनाट्य, पथनाट्या द्व्यारे मनोरंजना सोबतच समाज प्रबोधन आणि क्रांतिकारी चळवळी च माध्यम बनलं.
ब्रिटिश काळापासून ह्या क्षेत्राला तंत्राद्यानाची जोड मिळाली, रेकॉर्ड-प्ल्येयर, रेडिओ, ट्रान्सिस्टर, वरून मनोरंजन हे घराघरात पोहचलं. त्याच काळात तंम्बुत पडद्यावर दाखवला जाणारा सिनेमा इंग्रजांनी भारतात आनला, त्यावर दादासाहेब फाळके नावाच्या अवलियाची नजर पडली आणि भारतीय चित्रपट श्रुष्टिचा जन्म झाला.
त्यांनी "राजा हरिशचंद्र" हा भारतातील पहिला मूकपट बनवला आणि भारतीय मनोरंजन क्षेत्राची व्याप्ती अजून विस्तृत केली.
कालांतराने त्यात आवाज आला मग रंग आलेत आणि 70mm पडद्यावर इस्टमन कलर सहित अनेक कलाकार हे स्टार आणि सुपरस्टार झालेत.
1965 नंतर दृश्य स्वरूपातील मनोरंजन घराघरात पोहचवण्यासाठी Television म्हणजेच दूरदर्शन ने मोलाचा वाटा उचलला. त्यावर येणाऱ्या बातमीपत्र, मालिका सहित जाहिरातींनी सुद्धा जनमाणसाच्या मनावरती छाप उमटवली.
कालांतराने त्यात आवाज आला मग रंग आलेत आणि 70mm पडद्यावर इस्टमन कलर सहित अनेक कलाकार हे स्टार आणि सुपरस्टार झालेत.
1965 मध्ये सुरु झालेला आणि 1980 नंतर दृश्य स्वरूपातील मनोरंजन घराघरात पोहचवण्यासाठी Television म्हणजेच दूरदर्शन ने मोलाचा वाटा उचलला. त्यावर येणाऱ्या बातमीपत्र, मालिका सहित जाहिरातींनी सुद्धा जनमाणसाच्या मनावरती छाप उमटवली. दूरदर्शन वरील काही मालिका ह्या जगातील Television इतिहासातील सर्वाधिक बघितल्या गेलेल्या मालिका आहेत ज्यामध्ये महाभारत, रामायण, कृष्णा सारख्या पौराणिक मालिकांचा समावेश आहे. त्याव्यतिरीक्त प्रेक्षकांच्या मनावर आरूढ होणाऱ्या मालिका म्हणजे अलिफ-लैला, विक्रम वेताळ, ब्योमकेश बक्षी, फौजी, सर्कस, मालगुडी डेस, देख भाई देख आणि सर्वांचं लाडका शक्तिमान अश्या अनेक मालिका त्या काळात प्रसिद्धीचे रेकॉर्ड ब्रेक करत होत्या. आज 800 हुन अधिक TV_Channels उपलब्ध आहेत ज्यात अनेक भाषणांमध्ये
मनोरंजनाचे कार्यक्रम लोकांपर्यंत पोहचवले जातात.
मनोरंजनाच्या व्याप्तीच कारण ठरलं ते म्हणजे तंत्राद्याना मधला बदल. आणि त्याबदलाला आत्मसात करत मनोरंजन क्षेत्र अजून व्यापक होत गेलं. सुरवातीला फक्त पडद्यावर बघायला मिळणाऱ्या मनोरंजनाच्या गोष्टी घराघरात TV बघायला मिळू लागल्यात आणि आता तर त्या तुमच्या आमच्या खिश्यात म्हणजेच आपल्या मोबाईल फोन च्या स्क्रिन वर सुद्धा उपलब्ध झालेत.. आज Google च्या Youtube वर अनेक Channels उपलब्ध आहेत जे तुमच्या आमच्यातल्याच कलाकाराने स्वतः बनवून सगळ्याच्या मनोरंजना साठी सादर केले आहेत..
ज्याच्या मध्ये कलाकार दडलेला आहे परंतु संधी मिळत नाही अश्याना जगासमोर कला सादर करण्यासाठी Youtube हे उत्तम प्लॅटफॉर्म आहे. मात्र आज Youtube नवीन कलाकारांसोबतच जुने जाणते कलाकार हि मनोरंजनाचा धुमाकूळ घालताना आपण बघतोय.. सध्या च्या घडीला भारतातील Youtube वर भरपूर प्रसिध्द्वअसलेले Channels म्हणेजच TVF (the viral fever), AIB , Pretentious movie
review ,
हा fever सध्या मराठीत हि चढलेला दिसतोय त्यात सगळ्यात फेमस होतोय तो म्हणजे BaDiPa channel चा Casting Couch with अमेय and निपुण हा शो. त्यांनतर पसंतीस पडतोय तो संतोष आणि कुशल चा struggler_saala अशे इतरही शो प्रेक्षांसाठी त्यांच्या मनोरंजना साठी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत.
भारतात Vines हा प्रकार सुद्धा BB ki vines ने खूप प्रसिद्ध केला.. मराठीतही हा प्रयोग काही अंशी झालेला दिसतोय.
अश्याच प्रकारे जसजसा नवनवीन गोष्टी समोर येतील तासतशे मनोरंजन क्षेत्र ते आत्मसात करत अप्लाय व्याप्ती वाढवत राहील.
No comments:
Post a Comment