Thursday, September 6, 2012

महात्मा बसवेश्वर आणि आजचा लिंगायत समाज

          महात्मा बसवेश्वरांच्या जीवनाचा आणि लिंगायत समाजाचा सखोल अभ्यास नसतानाही ह्या विषयावर बोलण जरा कठीणच.
कारण महात्मा बसवेश्वर हे नाव  आणि त्यांच्या विचारातून निर्माण झालेला  लिंगायत समाज हे काही आज जन्माला आलेलं नाही हा बाराशे व्या शतकां पासून चालत आलेला इतिहास आहे. मात्र ज्या कारणा साठी आणि जी मनीषा मणात ठेवून बसवेश्वरांनी हि खटाटोप केली होती, आणि हा सर्व उपद्व्याप करण्यासाठी जी काही टीका सहन केली होती तो विचारच आज इतिहास जमा होऊ लागल्याच चित्र दिसतंय. 
महात्मा बसवेश्वरांनी ज्या विचारांवर लिंगायत समाज स्थापन केला तो म्हणजे
"माणूस हा त्याच्या जन्माने नव्हे तर समाजात केलेल्या कर्माने मोठा होत असतो"
हा विचार त्यांनी आणि त्यांच्या अनुयायांनी मनाशी घट्ट धरून जात पात गाडत, धर्माच्या भिंती पाडून लिंगायत समाजाची मुहूर्तमेढी रोवली. लिंगायत धर्मात कुठल्याही जातीच्या, व धर्माच्या लोकास येण्यास बंधनं ठेवली  नाहीत,  जातीपातीची बेडी तोडून गळ्यामध्ये शिवलिंग धारण करा आणि माणुसकीचा अर्थ सांगणारा लिंगायत शिव शरण म्हणून वावरा. असा हा सर्वधर्म समभाव सांगणारा सामाज त्या काळात
लोकांना रुचणारा नव्हताच, महात्मा बसवेश्वरांना ह्या साठी बरीच टीका आणि कष्ट सहन करावे लागलेत.
लिंगायत समाज आणि ह्या समाजाचे ग्रंथ, विचार मिटवून टाकण्या साठी त्या काळात  धर्म रक्षक म्हणून घेणार्यांनी तलवारीचा हि वापर केला. पण हा समाज, ह्या समाजाचा पाया असलेले ह्याचे ग्रंथ आणि विचार, साहित्य सामुग्री वाचवण्यासाठी महात्मा बसवेश्वरांच्या अनुयायांनासुद्धा तलवारीचे उत्तर तलवारीने देत ह्या समाज उपयोगी ग्रंथांच रक्षण करण्या साठी वेळप्रसंगी प्राणाची आहुती देखील द्यावी लागली.
          आज ती धर्मग्रंथ वाचलीत, अनेक शिवशर्नार्थ शिवरूप झालेत। पण आज  लीगायात धर्मातील किती लोक ह्या आचरणाच खरच पालन करत असतील, देशातील पाहिलं आंतर्जातीय  (ब्राम्हण मुलगी आणि दलित मुलगा ) यांचा विवाह लावून सर्वांच्या टीकेचे पात्र झालेल्या मा. बस्वेश्वरांच्या समाजात आज किती आंतर्जातीय विवाहास स्वखुशीने मान्यता मिळते? ह्या प्रश्नाच उत्तर असेल "बोटावर मोजण्या इतक्या सुद्धा विवाहास मान्यता मिळत नाही।   कारण आम्हाला हि ह्या समाजाच्या प्रवाहात जायचे आहे"। 
का हा आजचा लींगायत समाज मुख्य प्रवाहात जाण्यास येवाठा उत्सुक आहे? मुख्य प्रवाहातून शुद्र समाजाला बाहेर काढत प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाण्याची दिशा आणि हिम्मत दाखवणार्या  मा. बस्वेश्वरांचा समाज हा इतका लाचार असूच शकत नाही। आज किती  तरी ठिकाणी ख्रिस्चन समाज मिशनरीज उभारून हिंदू धर्मातील गरीब जनतेला स्वधर्माचे गुणगान गाऊन  किंबहुना त्याच्या गरिबी आणि अडानिपणाचा फायदा घेऊन मोठ्या प्रमाणात धर्मांतर घडवून आणत आहेत।  याचा अर्थ असा नव्हे कि आपणही असेच काही करावे पण निदान शुद्र,पिडीत आणि मागास समाजास धर्माचे कवाडे उघडी करून त्यांचे स्वागत करण्यास काय हरकत आहे।
         मा. बस्वेश्वरांच्या उपदेशानुसार फक्त गळ्यात शिवलिंग  घातल्या नंतर तुम्ही लींगायत झालात मग तुम्ही कुठल्याही जाती धर्माचे असो। मग असे असतांना मला एक असा प्रश्न पडतो की लींगायत धर्मामध्ये पोट जाती का येतात? उदा. लीगायात (पंचम),(टाकळकर),(दिक्षवंत)...ई। असो। ह्या प्रश्नाचे उत्तर कोणी विद्वान समाजाचा अभ्यासकाच निट  देवू शकेल। पण समाजातला खालचा घटक हे उत्तर मिळवण्या साठी इच्छुक आहे का?
        आपण कितीही मुख्य प्रवाहात असलो तरीही हे विसरता कामा नये कि आपण मा. बस्वेश्वरांच्या लिंगायत समाजाचे अनुयायी आहोत। जो समाज जात पात आणि कुठल्या हि धर्मापेक्षा मानवतेला प्रथम मान्यता  देतो। त्या मुळे कुठल्या हि धर्माचा व्यक्ती असो त्यास मानवतेची वागणूक हि लींगायत समाजाकडून मिळालीच पाहिजे।


2 comments:

Anonymous said...

well written but...in depth knowledge is necessary...

Anonymous said...

Visit to know more about Lingayat Religion and Basava www.lingayatreligion.com