भ्रष्टाचाराची कीड हि सध्या संपूर्ण जगावर पसरली आहे. ह्या रोगाची लागण भारताला कधी झाली हे सांगण जरा कठीणच पण आज ती इतकी खोलवर रुजली आहे कि संपूर्ण समाज व्यवस्था ह्या रोगाने पोखरून टाकली आहे.ह्या भ्रष्टाचार-नावाच्या रोगा साठी बरेच कायदे करून लसीकरण करण्याचा प्रयत्न केला गेला पण काहीही उपयोग झालेला दिसला नाही. आता हा साधा रोग राहिला नसून त्याने महाकाय रूप धारण केल आहे. काल पर्यंत लहान सहान ठिकाणी छोट्या प्रमाणावर भ्रष्टाचार सगळी कडे होता. पण आज घोटाळ्यांचे आकडे बघितले तर आकडी येईल. रोज नवी बातमी, ४०० कोटी चा घोटाळा, 7०० कोटी, १००० कोटी, १लाख कोटी या वरूनच कळत की हि साधी कीड भस्मासुर बनली आहे. हा भ्रष्टाचाराचा भस्मासुर आज आ-वासून उभा आहे, आणि आपल्या हक्काची आणि कष्टाची कमाई गिळंकृत करण्यासाठी तत्पर उभा आहे.
Ransangram Pages
Friday, August 19, 2011
Wednesday, August 10, 2011
सोन्याच अंड देणारी कोंबडी विकून टाकली
महानगरांमध्ये जिथे खास करून झपाट्याने विकास होत चाललाय अश्या ठिकाणी रिकाम्या जमिनींना, शेताला सोन्यापेक्षा हि जास्त किंम्मत मिळु लागली आहे. एकराने विकल्या जाणार्या जमिनी आज गुंठ्यांनी विकल्या जात आहेत. हीच बाब आज पुणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात बघायला मिळती आहे. विद्देच माहेर घर असलेल पुण आता IT क्षेत्रालाही भुरळ घालू लागल आहे.
बघता बघता हिंजेवाडी, मगरपट्टा, तळेगाव, औंध ह्या काही गावां मध्ये IT पार्क उभे राहिले आहेत. शिक्षणाच्या बाबतीत तर पुण्याच आकर्षण पहिले पासून आहेच, रोज गल्ली बोळां मध्ये एक नवी शिक्षण संस्था जन्मास येते. त्यामुळे इथे शिक्षणासाठी आणि रोजगारासाठी दररोज येणारांच्या संखेत लक्षणीय वाढ झाली आहे. म्हणून प्रत्येक IT पार्क आणि शिक्षण संस्थाच्या आजु बाजु च्या परिसरासरांच्या किंम्मती उच्चांक गाठतात. लोखंडाच परिसाच्या स्पर्शाने सोन व्हावं तस ह्या IT पार्क आणि शिक्षण संस्था सारखे पारीस जमीनीच सोन करत आहेत.
ह्यामुळे शेतकरी शेतीला कंटाळले कि पैशाला हपापले हे कळत नाही, पश्चिम महाराष्ट्रातला
Subscribe to:
Posts (Atom)