Wednesday, November 24, 2010

विदर्भ वेगळाच पडला शेवटी...

                                                                         
विदर्भ वेगळा मागणार्या विदर्भ वाद्यानीच विदर्भाला वेगळ पाडलेल दिसतंय. एक सांगा विदर्भ वेगळा झाल्यावर खरच विदर्भाचा विकास होणार काय? शेवटी विषय उरतो काय तर, कसा हि होवो पण विकास झाला पाहिजे. बर विदर्भ वेगळा झाल्या वरच त्याचा विकास होणार आहे का? तसच असेल तर मग खुशाल होऊन जाऊ द्या, पण याची शास्वती जो घेणार असेल त्याणेच पुढे यावे.
काय तर म्हणे वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनात नक्षलवाद्यांना आणणार, त्याची मदत घेतली जाइल नवीन राज्य आणि प्रशाषण स्थापण्यासाठी. आहो ज्याना भारतीय प्रशाषनच मान्य नाही, ज्या गोष्टी विरुद्ध त्याचा लढा आहे त्याच्याच स्थापणे साठी त्याची मदत घेणार, मग खरच विचार करा ते प्रशाषण कस असेल आणि किती दिवस टिकेल? सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे खरच विदर्भाच्या विकासा साठी विदर्भातील नेते कार्यशील आहेत का?
नुकताच दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये गावी "आर्णी (यवतमाळ)" गेलो होतो. आमच्या मतदार संघातील नवीनच असलेले पण राजकारणात जुने असलेले मात्तबर असे नेते आमदार म्हणून मिळाले आहेत जे आता सध्या मंत्रिमंडळात मंत्री पद भुषवतायेत मा. शिवाजीराव मोघे, हे आमच्या मतदार संघाला मिळालेलं आत्तापर्यंतच एकमेव मंत्रिपद, पण तेही सध्या डगमगत्या स्थितीत आहे. आजच "सकाळ" मधे बातमी वाचली की "पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वात जुन्या मंत्रिमंडळातील कॉंग्रेसच्या किमान दहा चेहऱ्यांना अर्धचंद्र मिळण्याची शक्‍यता आहे. अकार्यक्षमतेमुळे सुभाष झनक, शिवाजीराव मोघे अशा काही नावांचा समावेश मंत्रिमंडळात होणार नसल्याचा अंदाज आहे."
आसाच अकार्यक्षम कार्यभार साधाल्या जात असेल तर कसा होणार विकास.  जर इच्छा आणि दूरदृष्टि
असेल तर साधा सरपंच सुद्धा विकास घडवुन आणु शकतो. आज विदर्भाची परिस्थिति बघितली तर विकास फ़क्त श्रीमंतांचाच झालेला दिसेल. गरीब अजुनही "जैसे थे" अवस्थेत आहेत. विदर्भातील शहरांमधे थोडासा विकास दिसून येइल ही,परंतु खेड़े अजुन ही भकास आहेत. गावातले रस्ते तेवठे "प्रधान मंत्री ग्राम सड़क योजने" अंतर्गत जोडलेले दिसतात, मात्र गावत पाणी नाही की विज नाही. कुठल्याही प्रकारच्या शेतीला जोड़ रोजगाराची साधन नाहीत. त्यातही ती कोरड वाहू शेती शेतात पिकवुन पिकवुन पिकावणार काय? कपसाला सरकार भाव देत नाही की, संत्राला निट बाजार पेठा उपलब्ध नाहीत. त्यात राज्यकर्त्याना राजकारणा पासून फुरसत नाही. आशा म्हणून अपक्षाना निवडून दिल तरी ते परत पैशाच्या ललचे पोटी एखाद्या पक्षात जातातच, एक उदाहरण सांगायच झालच तर माजी आ.संजय देशमुख अपक्ष म्हणुन जनतेनी पाठिंबा दिला तर साहेब खुशाल Congress मधे ठान मांडून बसलेत, आता सध्या घरी आहेत. दुसरे आमचे माजी खा. राठोड साहेब

बदल म्हणून भाजप च्या उमेदवारस निवडून दिल, तर ह्यानी ही परत Congress चाच दरवाजा ठोठावला, हेही सध्या घरीच आहेत. असे हे विदर्भातले राजकारणी...
आणि आमचे विदर्भ वादी संघटन इतर वेळी काय काम करतात हे कुणाला ही माहिती नाही, कही काम करतात की नाही याचीच शंका आहे.
आहो विदर्भाच्या विकास साठी तुम्ही स्वत: काही आराखडा तैयार करुन दाखवा, त्याला तुमच्या परीने सरकारची मदत न घेता पुर्नत्वाला नेवून दाखवा, ही धमक पहिला विदर्भातल्या लोकाना दाखवून बघा, आणि मगच वेगळ्या विदर्भाची मागणी करा... (गौतम बुद्धांनी संगीतलय "जोड़ा पण तोडू नका").
आजुनही तो मिहान प्रकल्प तसाच धूळ खात पडलाय, त्या साठी करा ज़रा आंदोलन म्हणजे तुमच्या मुलाना रोजगारासाठी पुणे मुंबई ची धूळ घावी लागणार नाही.
विदर्भ वेगळा मागण्याच्या नादात विदर्भा वाद्यानिच विदर्भाला विकासा पासून वेगळ केले आस चित्र आज विदर्भात दिसून येत आहे.
आता वेळ आहे ती वेगळ होण्या पेक्षा सोबत राहुनच स्वत: ला सिद्ध करण्याची, तर पेटू द्या रणसंग्राम विर्भाच्या विकास साठी हल्ला बोल....

2 comments:

Anonymous said...

sahi....me purn pane sahmat ahe swapnil chya vicharashi...

Swapnil Demapure said...

Thanks, for ur comment...