Saturday, November 27, 2010

वसतिगृहाच्या आठवणी..

       वसतिगृह,  प्रतेकाने जीवनात अनुभवाव अस एक ठिकाण. इथे अनेक ठिकाण ची अनेक व्यक्ति तुम्हाला बघायला मिळतिल. इथे  येणारा प्रत्येक व्यक्ति आपल्या मनात एक नवीन स्वप्न घेवून दखल होतो. स्वप्ना बरोबरच मनात एक भीती ही असते, ती म्हणजे घरापासून दूर रहाण्याची आणि तिथले इतर विद्यार्थी आपल्याशी कसे  वागतील याची. परंतु काही दिवसांनी ही भीती तर दुर होतेच पण त्याच बरोबर आपणही कळत नकळत त्यांच्यातलाच एक हिस्सा  झालेलो असतो. नंतर सुरु होतो तो नवीन आयुष्याचा प्रवास नवी स्वप्न नवी आशा उराशी बाळगुण.
प्रत्येक विद्यार्थी इथे एक वेगळच स्वप्न घेवून आलेला असतो इथे आल्यावर त्याच्या स्वप्नाना पंख फुटतात एक दिशा मिळायाला सुरुवात होते. पण कधी कधी काही वेगळच घडत,  एखादा स्वप्न एक बघतो परंतु ध्येय काही तरी निराळ असत आणि खर्या आयुष्यात बनतो मात्र कहीतरी अलगच. पण हे काही असल तरी वसतिगृहाच्या आठवणी आणि अनुभव मात्र जीवनभर सोबत रहातात.
          अश्याच काहिश्या आठवणीनी भरल होत माझही वसतिगृह, आजही जेव्हा ती मस्ती, तो धिंगाना,
आणि ती परिक्षेच्या काळातली स्मशान शांतता आठवाते तेव्हा अंगावर शाहरा उभा राहतो. अस वाटत की अजुनही थोड़ी मस्ती बकिच आहे, जर खरच वेळ थोड़ा मागे घेउन जाता आला असता तर.
माझ्या वासतिग्रुहाच नाव होत पुण्यातील गणेश पेठेतल "लिंगायत सेवा मंडळ" हे नाव पहिल्यांदा  माला माझ्या काका कडून कळल, पुण्यात आल्या नंतर जेव्हा याचा शोध घ्यायचा म्हटल तर सापडता सापडेना, कारण हे बरच अस प्रसिद्ध नव्हत. २ तास  पायी रपेट केल्या नंतर मी थकलो व शोध मोहिम इथेच थांबवू असा विचार केला, परंतु जिथून माघारी जायचा  विचार आला त्याच चौकात "लिंगायत सेवा मंडळ" सापडल. त्या वेळी तिथे चिटनिस म्हणून "दत्तात्रय वयाचाळ" म्हणुन गृहस्थ होते नंतर ते आमचे सगाळयांचे लडके "दत्ता भाऊ"  झालेत. Hostel समोर त्याचा वाडा होता, ज्या दिवशी मी Hostel ची चौकशी करायला गेलो होतो त्याच दिवशी तो वाड़ा पडला होता. मी त्याच्या कड़े चौकशी केली की "माला इथे वसतिगृहात Room मिळेल काय?" त्यावर त्यांच उत्तर होत "अरे मलाच रहायला घर नाही तुला कुठून देऊ" ते एकून मला थोड हसू ही आल आणि राग ही, परंतु लगेच ते म्हणाले "बर, एक काम कर उद्या Document घेउन ये बघू आपण". तेव्हा वाटल की चला २ तासाच्या रापेटिच चीज झाल. मग काय नवीन बकरा Hostel मधे येणार म्हटल्या वर जुनी मूल माझी "खिचाई" करायला कंबर कसून तैयार होती. प्रत्येकानी माझ्याशी गोड बोलून मैत्री केली, आणि म्हणाले "आम्ही एक नाटक करतोय आणि तुला राजा म्हणून भूमिका करायची आहे" नाटकांचा भुकेला मी हे एकून खुश झालो आणि हो म्हणालो. दुसर्या दिवशी तालीम होती, तेव्हा एकाने सांगितली की हे सगळे राजाला सिंहासणावर बसवतात आणि लाइट बंद करुन, अंधारात त्या वर चापलांचा मारा करतात. हे ऐकल्यावर मी घाबरलो पण डगमगालो नाही. दुसर्या दिवशी तलामित त्यानी मला "राजे सिंहासनावर बसा" म्हणत Bed वर बसवल व सगळे हलू हलू मागे सरकून लाईट बंद करताच मी Bed खाली गेलो. चापलांचा मारा संपताच लाईट लावून सगळे हसत होते. त्यातला एक म्हणाला "अरे राजा कुठे आहे?" बघतात तर मी त्याच्या मागे उभा होतो, हे पाहून त्याना आश्चर्य वाटल,पण त्या घटनेनंतर आमची सगल्याची छान मैत्री जमली.
  वासतिग्रुहातली आणखी एक गंमत म्हणजे, पुण्याच्या पेठे मधल्या घरां मधे अवार्जुन बघायला मिळणारा एक Dainasour पेक्षा ही खतरनाक प्राणी ज्याला  "ढेकुन" ("Bug" ) आस संबोधतात. त्याला पेठेतलच  आमच Hostel  अपवाद कस असेल. तिथल्या त्या प्राण्यां पासून लढ़ण्या साठी आम्हाला जणू जुनी मूल Training देत असे. Hostel Managment ने ही त्याच्या विरुद्ध चांगलाच मोर्चा बांधला होता. परंतु प्राण्या कडुन काहीतरी शिकण्या सारख असत म्हणतात ना, तर या ढेकनान कडून  "चिकाटी" ही शिकण्या सारखी होती. याचा कितीही नायनाट केला तरी हे परत येणारच. पण शांत बसेल ते Managment कसल, Managment व या प्रान्यात जणू युद्ध पेटल होत व आम्ही त्या प्राण्याशी रोज रात्री लुटूपुटूच्या लढाया करायचो. सगळ्यात मोठ पाउल म्हणजे Managment नी सम्पूर्ण Hostel ची रंगरंगोटी करुन त्याचा एकदाचा बंदोबस्त लावलाच.
       या आणि अश्या काही अनेक आठवणीनी सजल होत आमच वसतिगृह. आजही बरीच जुनी मूल (Senior Students) तिथून जुन्या आठवनींची अनुभवाची  पोटरी घेउन बाहेर च्या जगात पडत आहेत, तर परत कोणी तरी नवीन विद्यार्थी नवी स्वप्न, नवी आशा थोडीशी भीती आणि बरीच शी गंमत व अनेक चांगले वाईट अनुभव घेण्यासाठी दाखल होतोय.

3 comments:

Ashish Kulkarni said...

Farach chaan
very good article

Swapnil Demapure said...

Thanks Ashish...

Unknown said...
This comment has been removed by the author.