Sunday, August 15, 2010

तलवार की धार से, ना गोलीओकी बरसात से (१५ अगस्त देशाचा ६४ वा स्वतंत्र दिवस)


आज १५ अगस्त देशाचा ६४ वा स्वतंत्र दिवस, १९४७ साली लाल किल्यावर पहिल्यांदा आपल्या नेत्यांनी तिरंगा फ़डकवला आजही फ़डकवला व पुढे ही असाच फ़डकत रहाणार.
१५ औगस्ट आला कि मला माझ लहानपण आणि शाळेचे दिवस आठवतात. ते लवकर लवकर उठुन छानसा पांढरा शुभ्र uniform घालुन सकाळी सकाळी शाळेत जायच, ७ वाजता प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहन, सगळी लहान मंडळी एका रांगेत चपटासा भांग पाडुन ऊभी असलेली ध्वजाला Salute करत "जण-गण-मण" म्हणायची व N.C.C. ची परेड व्हायची.
आम्ही सगळे मांडी घालुन बसायचो नंतर पहुण्यांच भाषण व आमच्यातल्याही काही लाहाणग्याची भाषणेही होत.
ही सगळी कर्यक्रम आटोपल्यावर सगळ्याना गोळ्या, बिस्किटांचे वाटप व्हायचं, आणि लगेच सुटी मग काय धावत धावत घरी जायच, जात असतांना हातात एक छोटा तिरंगा आणि तोंडात एखाद देश्भक्तीच गाण गात घराकडे जात तिरंगामय झालेल गाव बघत जातांना अगांवर शाहारे येत, जिथे तिथे देशभक्तीपर गाण्याचे आवज येकु येत. दिवसभर उनाडक्या करुन घरी आल्या नंतर टि.व्ही. वर सुध्दा देशभक्तीपर चित्रपट सुरु असायचेत. हतात तिरंगा, गावागावात सगळी कडे तिरंगा आणि टि.व्ही. वरही नाना पाटेकरचा तिरंगा, त्यातला राज कुमार चा संवाद आठवतो "ना तलवार की धार से, ना गोलीओकी बरसात से, बंदा डरता है तोह सिर्फ़ परवर्दिगार से "


पण आज तस उरल नाही, आज बंदा हर बात से डरता है. बंदा डरता है कसाब की गोलिओ से, बम के धमाको से, महेंगाई से, Corruption से, Politicians से.
६४ वर्ष झालीत देश आजाद होवुन परंतु देश जसा च्या तसा. सुधारणा करण्याच्या नवाखाली फ़क्त चांदी सोन्याचा मुलयमा चढवला जात आहे, आतुन मात्र सगळ पोकळ. आज ही तसाच तिरंगा फडकवला जातो, लाल किल्ल्यावर आजही आमचे पंतप्रधान तेच पोकळ आश्वासन देतात. फक्त फ़रक आल आहे तो आता भ्रष्टाचार करण्याच्या पद्धती मधे. पहीले सरकारी कर्यालयात, राजकारणात, जनावरांच्या चार्यात, तर कधी धान्यात भ्रष्टाचार व्हायचा परंतु आज खेळातही दबाके भ्राष्टाचार होतोय. मग तो IPL असो किवां Common Wealth Game10 असो.
पहीले आतंकवादी लपुन झपुन कश्मिर मधे Bomb फ़ोडायचेत, आज मात्र त्यांच्यात येवढी हिम्मत वाढली कि आमच्या घरात येवुन गोळ्या घालु लागलेत. आणि त्यांना गोळ्या घालण्या येवजी आम्ही त्यांना पोसतोय.
आसो, या ६४ वर्षात देशात याच गोष्टीची Development झाली आहे..

म्हणुन अस वाटत "लाहान पण देगा देवा" म्हणजे ति प्रमुख पहुन्यांची भाषणे ही भाषणेच वाटतील ना की पोकळ आश्वासन, देशभक्ती म्हणजे देशभक्ती असेल त्याला भ्रष्टाचाराचा वास नसेल. जिथे वर्तमाना पेक्षा ईतीहासाला जास्त महत्व असेल, आणि तिरंगा चित्रपटातलाच नाना आपला खरा हीरो असेल. कारण गांधी, भगतसिंग, सावरकर परत येणार नहीत.
आणि देवाकडे एकच मागणि असेल कि तिरंग्या चा मान कधीही कमी होऊ नये.

1 comment:

SNEHAL said...

Hi Swapnil,

School days are the best and memorable days for me too.
Tu barobar mhatalas,sakali-sakali uthun dhwajala salute karnyasaathi,जण-गण-मण mhananyasaathi ani NCC/Scout-guide madhe parade karnyasaathi
ti ji excitement asayachi ti apan kadhich visaru sahakat nahi.

Chocolates milnaar,parade madhe participate karnyasathi milnaar,sutti asanaar mhanun ekdam khush asaycho na.
Ani ho ghari alyawar tar mag kay majjach-majja देशभक्तीपर चित्रपट and all...

pan thodya varshant purna kaalach badalela disato..ti excitement,to josh,deshashthichi ti atmiyata kuthe tari harawaleli disatey Corruption,terrorism chya dabava kahali.

Really...I miss the Independance day's celebration of my school after reading your beautiful bolg....
Thanks swapnil for reminding us those memorable days of १५ अगस्त

From,
SNEHAL LOUIS PAGARE