Friday, October 23, 2009

शिवसेनेचे call center…..

भारतिय राजकारणाच्या ईतिहासात पहील्यांदा प्रत्येक सामाण्य माणसा पर्यंत त्यांच सरकार कसं पोहचु शकेल यांचि व्यवस्थित हाताळणि शिवसेनेनि केलेलि दिसतेय. त्यांनि सुरु केलयं call center, होय, ईथे तुम्हि तुमच्या भागातल्या समस्या १ call करुन सांगु शकता किंवा त्यांच्या वेबसाइट वर जावुन सुद्दा त्या नोंदवु शकता. जसे कि कचर्याशि निगडीत समस्या, आरोग्याशी निगडीत समस्या, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न, शेतिशि निगडीत प्रश्न, हे व अश्या अनेक समस्यांचि त्यानंतर व्यवस्थित विल्हेवाट लावलि जाते. व ति समस्या ज्या विभागातुन नोंदवली जाते त्या विभागातिल विभागप्रमुख व शाखाप्रमुखाशी संपर्क साधुन त्यांच्या कार्यकर्तांकडुन ति समस्या तातकाळ सोडवण्याचा प्रयत्न केला जातो. या समस्येंचा व कार्याचा report कार्याअध्यक्ष उद्धव ठाकरे व ईतर महत्वांच्या नेत्यांपर्यंत हमखास पोहचतो. ज्यामुळे कामात दिरंगाई होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही.असा हा अत्भुत प्रयत्न सुरु तर झालाय परंतु तो फक्त शिवसेना भवन पुरताच. त्याला विधान भवनात राबवण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहीले. परंतु हे स्वप्न भंगणार मात्र नाही नक्किच लवकरात लवकर ते पुर्ण होईल.

No comments: