Friday, October 23, 2009

रणसंग्राम विधानसभेचे


चला लोकशहीतील आणखि एक उत्सव पार पडला. तो म्हणजे महाराष्ट्र विधानसभा निवडनुक २००९ यातही परत निवडुन आली ति म्हणजे आघाडी. ६००० हुन जास्त शेतकरी आत्महत्तेच पातका सहीत,लोड शेडींग,माहागाई,२६/११ सारखे हल्ले, आणि ई महत्वाची पातक आपल्या डोक्यावर घेवुन हा आघाडी रुपी रावण परत या सोन्याहुन मौलवान माहाराष्ट्राला स्वतःच्याच शेपटीने पेटवत आलाय व पेटवत राहाणारच याची शपथ घेवुन आपली पुठची वाटचाल येत्या दिवसात सुरु करणार. आणि यांच बरोबर बरेचसे बुद्धीवादी म्हणवणारे रिकामटेकडे लोक आता यावर गल्ली पासुन दिल्ली पर्यंतच्या चर्चा करतांना प्रत्येक News Channel वर आढळतील. काल प्रर्यंत याच आघाडीला शिव्या घालणारे आता त्यांना शुभेच्छा देतांना व त्यांच्या पुढे लाळ गाळतांना आपल्याला दिसतील.
लाहाणपणि एक म्हण ऎकली होती ति म्हणजे "दोघांच्या भांडणात तिसर्याचा लाभ" ति खरीखुरी या निवडनुकीत बघायला मिळाली. शिवसेना-मनसे भांडणात मग्न दिसलीत ज्याची आजीबात गरज नव्हती! का ते सांगतो पुढे, पण भाजपाला मात्र माणाव लागेल, लगेच आपल्या अपयशाच घापर ईतरांवर फोडुन मोकळी झाली आहे. आता ह्याना विचारमंथनाची गरज नाही कारण उत्तर सरळ सरळ समोर आहे युतीने मनसेशी उगाच भांडत बसण्यापेक्षा त्यानी आघाडीचा पर्दाफाश करण्यात वेळ खर्ची
 घालायला हवा होता. खर म्हणजे उध्दव ठाकरेंनी उगाचच मनसे ला नको तितका तुल देउन त्यांच्या हाती आयते मुद्दे मिळवुन दिले,व राज ठाकरेंनी ते आपल्या शैलीत सादर करुन त्याचा जोरदार फायदा मिळवुन घेतला. एक उदाहरण द्यायच झाल तर नुकतीच दिवाळी झाली आहे, आपण किराणा भरला असालचं समजा तुमच्या हातात मिठाची पिशवी आहे जि की तुमच्या चुकिमुळे फाटली आहे व थोडच पुठे एका Tempo मधे ५० किलो गहु आहेत ज्या पोत्यालाही भोक पडली आहेत व गहु सांडतोय. सांगा तुम्ही काय कराल, सहाजीकच तुम्ही गहु सावडाल व त्या नंतर मिठ सावडता येईल, हो ना? परंतु उद्धव ठाकरेंनी मात्र याच्या उलट केलय. जिथे, आतंकवाद, माहागाई, आत्महत्या, ईत्यादीने भोक पडुन tyaatun सांडणार्या गहू रुपी मतदारांना आपल्या झोळित घेण्या एवजी ते हातातल्या मिठ पिशवितील मिठ सावरण्यात गुंग दिसलेत. व आघाडी या सर्वांचा फायदा घेत परत सत्तेचा सारीपाट सावरण्यात यशस्वी झाली।

याच्याशीच संबधीत एक Cartoon काढण्याचा मि छोटासा प्रयत्न केला यामधे मि हे दाखावान्याचा प्रयत्न केला आहे की दोन भाऊ वेगले असून सुद्धा नफा कसा कमावातात.

1 comment:

Laxminarayan (Suneel) Hattangadi said...

Honestly, I don't have much interest in politics. And I am not the loser either. There is so much "dramabazi" in the different Sabhas! No wonder theatres are not going house-full any more. Good cfartiins!