Wednesday, September 16, 2009

मला कसाब व्हायचंय

शिक्षक आम्हां विद्यार्थाना विचारायचे मोठे होवुन तुम्ही काय होणार कुनी म्हणे Doctor, कुनी Engineer, तर कुनी Lawyer, पण आज बघीतल तर या सगळ्यांपेक्षा जास्त कमाई, ईज्जत आणि Publicity या आतंकवाद्याना मिळत आहे, बघांना या लादेननी येवढ मोठ काम केल तरी तो आजुन मोकळा व येवठंच नाही तर त्यांच्या जिवनावर पुस्तके लिहली जातात, लादेनला सोडा, तो तर फार दुरचा माणुस आहे, आपल्या जावायाचचं बघा ना किती आरामात आहे तो सासुरवाडित. आपला जावाई म्हणजे कासाब बरं का! जावाई याच्या साठी म्हणतोय कारण आपल केंद्र सरकार बायको सारखं त्याच्याखाली लोळतांना, आणि भाऊजींचे लाड पुरवण्यासाठी मेहुणीने तडफडावं तशी न्याय व्यवस्था आपल्याला त्यांची लाड पुरवतांना दिसतॆ आहे. म्हणुन कसाब ला जावाई म्हतोयं. त्यातही त्याला मिळालेली प्रसिद्घि ति केवढी, तो सकाळी किती वाजता ऊठला, त्यानी काय नास्टा केला, तो काय जेवला, त्याने दिवसंभर काय केलं, कधी झोपला, येवठंच नव्हे तर त्याला शिखं आली तरी चार चार Doctor हजर, ईथे सामान्य माणुस आपली न्यायालयात खटला लढायला चागंला वकिल करता येत नाही म्हणुन खटला हरतो, पंरतु या कसाबला गरज नसतांनाही वकिल देण्यासाठी जिवाचं राणं केलंय, काही दळभद्री पुढाकार घेतांतही, कसाब सारख्यांच्याच बाबतीत बरा आठवतो यांना मानवाधीकार. म्हणुन म्हणतोय मला कसाब व्हायचंय,

पाहीजे ति मनमानी करता येईल जेल मधिल जेवण आवडल नाही तर ताट फिरकवुन बिर्याणि मागता येईल, पेपर, पॆसे ई. गोष्टीची मागणि करता येईल. परत रोजच्या पेपर मधे फोटो, एक बातमी व लोंकांच्या तोंडांत सतत नावं जे कोणिच विसरणार नाही. बाकी यानां मारनारे व स्वतःही शहीद होणारे कामटे, साळसकर व ई. तसे हे सगळे येवठे महत्वाचे नाही आहेत. यांची नावे कोण लक्षात ठेवणार. असं माझं नाही आपल्या लाडक्या सरकार आणि ना. मुख्यमंत्री आशोक चव्हाण यांच मत आहे. कारण काही दिवसां पुर्वी एका पत्रकार परीषदेमधे ते करकरे सांहेबाचं नाव विसरले होते, त्यांना आठवतच नव्हतं. बाघा आता चांगल्या माणसांची नावे यांनाच आठवत नाही तर मगं, आपल्या सारघ्या सामाण्यांच काय? म्हणुन म्हणतोय मला कसाब व्हायचयं. काही दीवसां नंतर कसाबला सोडवायला एखादं विमान अपहरण झालं किंवा आपल्याचं न्याय व्यवस्थेने तो गुन्हा करतांना वयाने लहान होता, किंवा त्याला काही कळत नव्हतं तो काय करतोय ते, हे सांगुन मोकळ केलं तर कोतुक वाटण्यासारख काही नसेल त्यात. माझा न्याय व्यवस्थेवर संपुर्ण विश्वास आहे असंही म्हणता येत नाही आज, कारण सगळ्यात जास्त भ्रष्टाचार न्यायालयात होतो न्यायाधीशही भ्रष्ट आहेतं असं विधान नुकतंच प्रसिध्द झालयं. कॊतुक तेव्हा वाटेल जेव्हा आपलं सरकार त्याला मुक्त करुन पाकिस्तानात न पाठवतां इथेच ठेवुन खेतील व मुसलमानी मतांसाठी त्याला निवडनुकीच तिकिट द्यायला पुठाकार खेइल, व मुस्लिम मतांसाठी असलेली आपली लाचारी दाखवतील. म्हणुन म्हणतोय "मला कसाब व्हायचयं".

1 comment:

Anonymous said...

Kay bolnar....
Agadhi nishabd jhalo ya lekhakache wichar aikun.