Friday, August 28, 2009

निवडणुक २००९

नुकत्याच १५व्या लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या, केंद्रीय मंत्रीमंडळ हि स्थापन झाल. संपुर्ण महाराष्ट्रात व संपुर्ण देशात पक्षांनी भरघोस मते मिळवुन हि लोकसभा निवडनुक जिंकुन सर्वांना आश्चर्याचा धक्काच दिला आहे. सर्वाधिक २१६ जागा या पक्षानी मिळवत सत्ता स्थापन केली. व भाजप ला केवळ १६० जागां वरच समाधान मानावं लागलं. खरं तर जास्त नुकसान झाल ते कोग्रेस प्रणीत यु.पि.ए. मधुन बाहेर पडलेल्या व पडु इच्छीना-या घटक पक्षानां, उदा. लालुप्रसाद यादव, रामविलास पासवान ( जे स्व:ताही निवडुन येवु शकले नाहीत ) आणि पंतप्रधान होण्याची स्वप्ने पाहानारे आपले शरद पवार साहेब. ज्याच्या केवळ महाराष्ट्रातच ९ जागा येवु शकल्या. आणि यातल्याही काही जागा ह्या निच्शितच होत्या, जश्या कि माढ्यातुन खुद्द पवार साहेब, बारामति मधुन प्रथमच उभ्या असलेल्या त्यांच्या सुपुत्री सुप्रिया सुळे, साताराहुन स्वयंभु संभाजी राजे, यांना तसं पाहता निवडुन येण्यासाठी कुठल्याही पक्षाची गरज वाटत नाहि. या व्यतिरिक्त उरलेल्या ६ जागा राष्ट्र्‌वादीने मिळवुन मोठा तिर मारलेला दिसत नाहि. आणि स्वप्न होत ........... जावुं देत जखमेवर मिठ चोळायला नको.

या मानाने शिवसेनेने या निवडनुकित चंगलि कामगिरि बजावली मागिल वेळेस १२ होते आत्ता ११ निवडुन आलेत. म.न.से. त्रास दायक ठरेल आसं वाटल होतं, पणं तो त्रास भ.ज.पा. ला भोगावा लागला. कर्नाटक वगळता तस भाजपानेही मोठी कामगीरी पार पाडलेली नाही खरं तर भाजपा मधे सद्दा स्टार प्रचारकांची कमी, एकसंघ भावनेचा आभाव दिसुन आला, व निवडनुक मुद्दा नीट माडंता आला नाही. स्टार प्रचारका बाबत बोलायच झाल तर मोदी एकमेव होते व त्यानी १३० हुन अधिक सभा घेतल्या, एकसंघ भावने बद्दल बोलायच झाल तर, इकडे मुंडे - गडकरींचे तानलेले संबंध आणि इतर.
निवडनुकिचा महत्वाचा मुद्दा होता आडवानिंना प्रधानमंत्री बनवायचा. या व्यतिरिक्त आत्कवादी हल्ले, सुरक्षेचा प्रश्न, बिघडत अर्थकारण, शेती विकास ई. अहो भारतात मुद्दे काय कमी आहेत काय. त्यामानाने राहुल गांधिच्या प्रयत्न चांगले मानवे लागतिल, कारण देशात मोठया प्रमाणावर मतदान होत ते गावां
मधुन व छोट्या स्थरांमधुन व राहुल ने हिच नाडी पकडत पदयात्रा काढल्या, सुरक्षा कवच तोडत सामान्यांन मधे मिसळुन त्यांचात् येण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे राहुल गांधि हे गांवा गांवात मना मनात घर करु शकले. या निवडनुकिमधे हे चित्र सरळ समोर आलं आहे कि ज्याचा जनसंपर्क चांगला त्याला मते चांगली, याचिच माहाराष्ट्रातील काही उदाहरणे आहेत जसे कि यवतमाळ-वाशिम भागातील शिवसेनेच्या भवना गवळी, शिरुर मतदार संघातील शिवसेनेचे शिवाजीराव अ. पाटिल, पुण्याचे कलमाडी. खर तर शिरुर मधिल निवडनुक पवारांनी प्रतिष्ठेची केलि होति परंतु चांगल्या जनसंपर्कामुळेच ते जिंकु शकलेत.
निवडनुक म्हणजे भारतीय लोकशाहीतील महा‌उत्सवच, आणि आता वाट बघायची आहे ति म्हणजे या उत्सवातील आणखी एका पर्वाची म्हणजेच येत्या विधानसभा निवडनुकिची. कोन कुठल्या मुद्दा वर लठतय, कायं रणनीती ठरणार, भाजप हा मनसे शी युति करणार कि नाहि हा येणारा वेळच सांगेल कि या विधानसभेच्या रणसंग्रामा मधे कोण कोनाशी जुळवुन घेतयं आणि कोण कोनावर करणार हल्ला बोल....................

No comments: