Ransangram Pages
Monday, October 4, 2010
माझा बंगलोरू (Bangalore) प्रवास...
Tuesday, August 17, 2010
कामगार आहे मि तळपती तलवार आहे, सारस्वतांनो माफ करा थोडासा गुन्हा करणार आहे..
Sunday, August 15, 2010
तलवार की धार से, ना गोलीओकी बरसात से (१५ अगस्त देशाचा ६४ वा स्वतंत्र दिवस)

१५ औगस्ट आला कि मला माझ लहानपण आणि शाळेचे दिवस आठवतात. ते लवकर लवकर उठुन छानसा पांढरा शुभ्र uniform घालुन सकाळी सकाळी शाळेत जायच, ७ वाजता प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहन, सगळी लहान मंडळी एका रांगेत चपटासा भांग पाडुन ऊभी असलेली ध्वजाला Salute करत "जण-गण-मण" म्हणायची व N.C.C. ची परेड व्हायची.
आम्ही सगळे मांडी घालुन बसायचो नंतर पहुण्यांच भाषण व आमच्यातल्याही काही लाहाणग्याची भाषणेही होत.
ही सगळी कर्यक्रम आटोपल्यावर सगळ्याना गोळ्या, बिस्किटांचे वाटप व्हायचं, आणि लगेच सुटी मग काय धावत धावत घरी जायच, जात असतांना हातात एक छोटा तिरंगा आणि तोंडात एखाद देश्भक्तीच गाण गात घराकडे जात तिरंगामय झालेल गाव बघत जातांना अगांवर शाहारे येत, जिथे तिथे देशभक्तीपर गाण्याचे आवज येकु येत. दिवसभर उनाडक्या करुन घरी आल्या नंतर टि.व्ही. वर सुध्दा देशभक्तीपर चित्रपट सुरु असायचेत. हतात तिरंगा, गावागावात सगळी कडे तिरंगा आणि टि.व्ही. वरही नाना पाटेकरचा तिरंगा, त्यातला राज कुमार चा संवाद आठवतो "ना तलवार की धार से, ना गोलीओकी बरसात से, बंदा डरता है तोह सिर्फ़ परवर्दिगार से "
Sunday, August 8, 2010
आता आपलं सरकार आलंय.....



सगळं होणार, सगळं होणार,
आता आपलं सरकार आलंयसगळं होणार..... ।। धृ ।।
आता शेतमालाला बाजार मिळणार,
तुरडाळ १५० रु।, तर साखर १०० रु. किलो होणार,
दलाल मालामाल अन् शेतकरी भुकेकंगाल होणार ।। धृ १।।
आता दोन्ही ऊर्जामंत्री निवडून आलेत१० वर्षांत जे करता आले नाही
ते २ वर्षांत करणार,दिवसभर वीज जाणार,
रात्रीचीच काही तासच रहाणार ।। धृ २।।
रस्त्याला आता हातभर खड्डे पडणार,
मतदारांचे मणके ढिले होणार,ठेकेदारांचे मात्र खिसे भरणार ।। धृ ३।।
आता सर्वत्र मिरज घडणार,
गणेशमूर्ती फुटणार, शिवचरित्रावर बंधन येणार,
पोलिसांच्या गाडीवर हिरवा फडकणार ।। धृ ४।।
पोलिसांच्या परीक्षा अरबी-उर्दूतून,
इंग्रजी अंगणवाडीपासून,
आणि मायमराठी नष्ट होणार ।। धृ ५।।
तालुक्या तालुक्यात हज हाऊस होणार,
पंढरपूरच्या वारीवर बंधन येणार,
हजला अनुदान मिळणार ।। धृ ६।।
Tuesday, August 3, 2010
गृहमंत्री म्हणाले......
बेळगाव सीमा प्रश्नावर गेल्या बर्याच दिवसापासून महाराष्ट्र व करनाटकात द्वंद युद्ध सुरु आहे. आज लोकसभेत महाराष्ट्र - कर्नाटक सीमा प्रश्नावरून जोरदार गोंधळ झाला . महाराष्ट्रातील खासदारांनी आक्रमक पवित्रा घेत सकाळी ११ वाजता लोकसभेचे कामकाज सुरू होताच शिवसेनेचे खासदार उभे राहिले. महागाईची चर्चा होण्याआधी बेळगाव सीमा प्रश्नावर चर्चा व्हावी , असा आग्रह महाराष्ट्रातील खासदारांनी धरला . काही दिवसा आधी याच मुद्यावर आपल्या ग्रुहमंत्री साहेबांच एक मजेदार stament वचायला मिळाल होत.
"प्रश्न् सोडवायचा नसेल तर समिती नेमली जाते, तो लांबवायचा असेल तर आयोग नेमला जातो, तो ताणायचा असेल तर कोर्टात धाव घेतली जाते. सीमाप्रश्नचेही नेमके तेच झाले असे सांगून गृहमंत्री म्हणाले कीं, या प्रश्नच्याबाबतीत केंद सरकार वेळकाढूपणा करत आहे. नेमकी भूमिकाही स्पष्ट करीत नाही."
या सिंहावलोकन परिषदेत विविध क्षेत्रातील तज्ञ, अभ्यासू व्यक्तींकडून व्यक्त झालेल्या विचारातून जो दस्तऐवज निर्माण होईल तो राज्य सरकारसाठी होकायंत्र ठरेल असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.
आता फक्त बघायच आहे की नेमका राजकारणी हां मुद्दा किती दिवस चघळतात ते...


