आचाराने आणि विचाराने एक असणार्या ,हृदयावर शिवलिंग धारण करून कपाळी भस्म लावणार्या व शिव-शंकराला कुलदैवत मानणार्या, वीरशैव लिंगायत समाजाचे संस्थापक महात्मा बसवेश्वर...
महात्मा बसवेश्वरांच्या जीवनाचा आणि लिंगायत समाजाचा सखोल अभ्यास नसतानाही ह्या विषयावर बोलण जरा कठीणच.
कारण महात्मा बसवेश्वर हे नाव आणि त्यांच्या विचारातून निर्माण झालेला लिंगायत समाज हे काही आज जन्माला आलेलं नाही हा बाराशे व्या शतकां पासून चालत आलेला इतिहास आहे.
लिंगायत हा एक जात नसुन तो एक धर्म आहे . जन्मामुळे मानवांना उच्च नीच असा विभाग करते ती जात. जनमल्यापासून सर्व समान आहोत अशी घोषणा करून कोणतीही जात, वर्ग, वर्णभेद न मानता जातीरहित धर्माचा आसक्ती असणात्या सर्वाना दीक्षा संस्कार मिळविता येतो असे सांगणारा तो धर्म. या धार्मिक संस्कारामुळे व्यक्तिने मिळविलेली योग्यता, पात्रता, यामुळे तो श्रेष्ट अगर कनिष्ट मानला जातो असे सांगतो तो धर्म. लिंगायत धर्मात जन्मामुळे कोणीही उच्च, नीच असे न मानता ’विटाळाविण पिंडास न च आश्रय’ असे सांगून, असा बोध दिला आहे कि...
गोत्रनाम पुसता गप्प का बसता?
शिर खाजवित भूमी का गिरवता?
गोत्र मादार चेन्नय्या, गोत्र डोहार कक्कय्या,
ऐसे सांगा ना हो, कूडलसंगय्या
हे विचार मांडणारे
महात्मा बसवेश्वर
यांचा जन्म
सन ११०५
या साली इंगलेश्वर
जे आज कर्नाटकातील
बिजापुर येथे आहे तेथील शैव ब्राम्हिण
कुटंबात झाला.
महात्मा बसवेश्वर हे
कर्नाटकातील संत
व समाजसुधारक होते. त्यांनी हिंदू
धर्मातील जातिव्यवस्थेविरुद्ध व
अन्य हानिकारक
प्रथांविरुद्ध संघर्ष
केला. त्यांनी
निर्गुण, निराकार
एकेश्वरवादी श्रद्धेचा पुरस्कार
केला .
"काय कवे
कैलास" म्हणजेच "कर्म
हेच कैलास"
आणि “माणूस हा
त्याच्या जन्माने
नव्हे तर
समाजात केलेल्या
कर्माने मोठा
होत असतो”. अशी शिकवण
त्यांनी समजाला
दिली
महात्मा
बसवेश्वरांना परिवर्तन
हे व्यक्तीच्या अंत:करणांतून घडवून
आणायचे होते.
त्यासाठी एक
नवी जीवन
पद्धती त्यांनी
दिली. जेथे
शोषण नाही,
गरीब-श्रीमंत,
उच्च-नीच, श्रेष्ठ- कनिष्ठ
असा कुठलाही
भेदाभेद नाही,
कुठल्याही प्रकारची
विषमता नाही,
जाती-जमाती
भेद नाही,
कर्मकांड नाही,
अशा प्रकारची
जीवन पद्धत
महात्मा बसवेश्वरांनी आपल्या
अलौकिक विचारधारेतून
अस्तित्वात आणून दाखवली.
महात्मा बसवेश्वरांच्या क्रान्तिकारक,
द्रष्टय़ा, सामाजिक
न्याय देणार्या, बुरसटलेल्या सनातनी/कर्मठ/ अन्यायमूलक/स्वार्थपरायण मानसिकतेला प्रखर
विरोध करणार्या निर्भय
विचारसरणीचा प्रभाव
समाजमनावर
पडला.
बाराव्या शतकात भारताचे
समाजजीवन हे
अंध:कारमय
झाले होते.अनेक रूढी,अंधश्रद्धा यांनी
त्रस्त झालेले
होते.
बहुदेवता उपासना, कर्मकांड,
अंधश्रद्धाo, पुरोहित
वर्गाची मतांधता,
पाप-पुण्याची
दहशत, उच्च-नीच, श्रेष्ठ-
कनिष्ठ, विषमता,
कामकरी-कष्टकरी
वर्गाची पिळवणूक,
स्त्री दास्यत्व
इत्यादींनी भारतीय
समाज बेजार
झाले होते.
अशा परिस्थितीत भारतीय
समाजाला उभे करण्याचे
धाडस महात्मा
बसवेश्वरांनी करून
दाखवले. त्यासाठी
त्यांना तत्कालीन
समाजसत्तेशी, राजसत्तेशी प्रचंड
संघर्ष करावा
लागला.
महात्मा बसवेश्वरांचं जीवनचरित्र पहता असे लक्षात येते कि इ.स.ना च्या दहाव्या शतकापासून बाराव्या शतकापर्यंत मंगळवेढय़ाला कळचूर्य (कळचुरी) घराण्यांचं राज्य होतं, त्यात करहाटर (कराड), परंडा (उस्मानाबाद जिल्हा) पासून मंगळवेढय़ापर्यंतचा भागही समाविष्ट होता. या घराण्यातील बिज्जल राजाचे पुरव राधिश्वर महात्मा बसवेश्वरांचे वडील मादिराज हे होते.बालपणापासूनच ते धर्मचिन्तन व समाजचिन्तन करत होते. स्त्री, शुद्रांना आपल्या उद्धाराचा नाकारलेला अधिकार कर्मकांडाचं अनावश्यक प्राबल्य व चातुर्वर्ण्य व्यवस्थेतील विषमता यामुळं ते अस्वस्थ व अंतर्मुख होते.
इष्टलिंग हेच शिवस्वरुप आहे, ते धारण करावं, परमेश्वर हा एकच आहे त्याची भक्ती करावी, कोणतही कर्म उच्च वा नीच नाही, “कर्म हेच कैलास (काय कवे कैलास )” या विचाराचा प्रसार करुन त्यांनी सर्व व्यावसायिक व जातीच्या लोकांना समपातळीवर आणले होते.
साम्राज्य जरी चालुक्यवंशीय सम्राट बिज्जलाचे असले तरी लोकांच्या हृदयांवर साम्राज्य महात्मा बसवेश्वरांचेच होते. वर्णव्यवस्थेला त्यांनी प्रखर विरोध केला होता. मूर्तीपूजेला विरोध करताना ते आपल्या वचनातून प्रतिपादन करतात.
‘दगडामातीचे देव नाही सत्य,
धातू झाड अनित्य देव ते काय?
सेतूबंध आणि काशी रामेश्वर,
निव्वळ भूमीभार देव ते काय?
तिरुपती-केदार-गोकर्ण-श्री शैल्य,
तिथे वसे वैफल्य देव ते काय?
आपणा-आपण जाणणेची थोर,
मी कोण सत्वर जाणोनी घ्यावा,
कुडल संगमदेव साक्ष एक यास,
जाणून घे खास देवत्व त्यात’
पुढे महात्मा बसवेश्वर प्रतिपादन करतात:-
‘लाखांनी घडली मूर्ती ती पतळे, देवत्व कैसे अग्नीत वितळे,
गरजेनुसार जे जाती विकले, सांगा त्यांना का देव मानू?’
महात्मा बसवेश्वरांनी आपल्या अलौकिक विचारधारा ‘वचन’ रूपाने अवरतलीत, एका नव्या धर्मक्रांतीला जन्म दिला. धर्म हा जीवनात उतरला पाहिजे. धर्म म्हणजे जगण्याची आणि आचरण करण्याची पद्धत. आचारणाला महात्मा बसवेश्वर प्राधान्य देत. ‘चाले तैसा बोले’ याचे ते मूर्तिमंत उदाहरण होते.
महात्मा बसवेश्वरांनी धर्माच्या भिंती पाडून लिंगायत समाजाची मुहूर्तमेढी रोवली. लिंगायत धर्मात कुठल्याही जातीच्या, व धर्माच्या लोकास येण्यास बंधनं ठेवली नाहीत, बुद्धीवादी आणि सद्दसद्द विवेक बुद्धीने विचार करु शकणार्या प्रत्येकाला जातीपातीची बेडी तोडून गळ्यामध्ये शिवलिंग धारण करुन आणि माणुसकीचा अर्थ सांगणारा लिंगायत शिव शरण म्हणून वावरन्यास मुभा मिळवुन दिली.
असा हा सर्वधर्म समभाव सांगणारा लिंगायत सामाज
त्या काळात लोकांना रुचणारा नव्हताच, महात्मा बसवेश्वरांना ह्या साठी बरीच टीका आणि कष्ट सहन करावे लागलेत.
लिंगायत समाज आणि ह्या समाजाचे ग्रंथ, विचार मिटवून टाकण्या साठी त्या काळात धर्म रक्षक म्हणून घेणार्यांनी तलवारीचा हि वापर केला. पण हा समाज, ह्या समाजाचा पाया असलेले ह्याचे ग्रंथ, वचन साहित्य आणि विचार, वाचवण्यासाठी महात्मा बसवेश्वरांच्या अनुयायांना सुद्धा तलवारीचे उत्तर तलवारीने देत ह्या समाज उपयोगी ग्रंथांच रक्षण करण्या साठी वेळप्रसंगी प्राणाची आहुती देखील द्यावी लागली.
असे हे महात्मा बसवेश्वर...
ह्याच महापुरुषाने विचारांच मंथन घडवुन आनणारी भारतातील पहिली संसद म्हणजेच "अनुभव मंडप" ची स्थापना केली
त्याच महापुरुषाच्या सन्मानार्थ भारताचे तत्कालीन राष्ट्रपति अब्दुल कलाम ह्यांनी 28 अप्रैल 2003 रोजि नई दिल्ली येथे भारतिय संसद परिसरात
त्यांच्या प्रतिमेच उद्घाटन केल.
त्यानंतर माजी प्रधानमंत्री, डॉ॰ मनमोहन सिंह ह्यांनी बसवेश्वराच्या प्रतिमेच्या नाण्यांच बंगलूरु येथे उद्घाटन केल.
आणि आज हे विचारांच लेणं साता समुद्रापार पोहचल. सध्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ह्यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर ह्यांच्या पुतळ्याच लंडन येथे अणावरन झाल.
मानुसकिचा अर्थ सांगणार्या ह्या माहत्म्यास, लिंगायत समाजास आणि समस्त शिव-शणरास माझा शिव-शर्णार्थ
जय बसवा...
No comments:
Post a Comment