Thursday, August 4, 2016

आपल्या मधले आंबेडकर जागवा...

भारत हा फक्त एक देश नसुन एक हजारॊ वर्ष जुनी संस्क्रुती आहे, अनेक चांगल्या, वाईट रुढी आणि  परंपरानी व्यापलेली.
परंतु ह्या उद्दात्त, उत्तम संस्क्रुतीला ग्रहण लागल ते जाती-पातीच, समता आणि विषमतेच.
ह्याची खरी उतपत्ती झाली ती वर्ण व्यवस्थेतुन.
भारतीय समाजाचे प्रमुख चार वर्ण
१. ब्राम्हिण (पुजारी,गुरु,शिक्षक)
२. क्षत्रिय (राजा, शाषणकर्ता, योद्धा)
३. वैश (शेतकरी, व्यापारी) आणि
४. शुद्र (मजदुर, सेवक)
शुद्र समाजाला ह्या वर्ण व्यवस्थेमधील प्रथम तिन म्हणजेच ब्राम्हिण, क्षत्रिय आणि वैश समाजाकडुन अमानवीय वागणुक दिली गेली.

अस्प्रुष्य म्हणुन त्याना समाजातुन सतत उपेक्षित ठेवल गेल.परंतु ह्या व्यवस्थेला छेद देण्या साठी पुरातन काळातही काही प्रयत्न केल्याच आपण अनेक महकथा मधुन वचतो,
उदा. प्रभु रामचंद्रानी खाल्लेली शबरी चि उष्टी बोर असोत किंवा श्री क्रिष्णा ने खाल्लेले सुदामाचे पोहे.
त्यानंतरच्या काळात, संत कबीर, संत ग्यानेश्वर, संत तुकाराम महाराज ई. अनेक संत माहात्म्यानी आपल्या वांड.मयातुन समाज सुधारणेचा वसा जोपासला.
परंतु समाज मनाच्या मानसीकतेवर सखोल परीणाम होण्यासाठी येवठस पुरे नव्हत बहुतेक. कारण ह्या नतंर हि समाज व्यवस्था अशिच चालत गेली,
किंबहुना अजुन बिघडत गेली. शुद्र समजले जाणारे समाजातिल घटक हे सुध्दा मणुस आहे हे उच्चवर्णिय विसरलेत.

पंरतु ह्याच परिस्थितित एक सुभेदार महाराच्या घरी त्याच १४ व आपत्य जन्माला आलं. आणि त्यांनी संपुर्ण समाज व्यवस्थेला आणि ईतिहासाला हादरवुन सोडल.
ते होते भारतरत्न Dr. भिमराव रामजी आंबेडकर,

"बाबा साहेब", "महामानव", "युगपुरुष", "घटनाकार" अश्या अनेक नावांनी हा देश त्याना ओळखतो.
शाहीरानी खुप छान म्हटलय की, "उद्धारीली लाखो कुळे, भिमा तुझ्या जन्मामुळे."

बाबा साहेबांचा जन्म महु ह्या गावी १४ एप्रिल १८९१ साली झाला, त्यांनी आपल संपुर्ण आयुष्य पिडित आणि शोषीतांच्य उद्धारा साठी वाहुन घेतल.
पण ह्या शोषित समाजाच्या उद्धारा साठी, न्यायासाठी आणि मानुस म्हणुन जगण्याच्या हक्कांसाठी ह्या मानवास महामानव म्हणुन घडत असताना जनावराच जिन जगाव लागल,
हे अपना सर्वांनाच माहीती आहे.
शाळा शिकण्यासाठी केलेला संघर्ष असो कींवा उच्चशिक्षाणासाठी लंडन ला जातांनाची कसरत, येवठ पांडित्य ग्रहण करुनही नॊकरी च्या ठीकाणी मिळालेली हिन वागणुक असो..
हे सगळे प्रसंग झेलत स्वत: ला सिध्द करण्या साठी आणि त्याहुन हि अधिक समजाच्या संपुर्ण विकासासाठी ऎखाद्या अजींक्य योध्या प्रमाणे लढलेत आणि जिंकलेत.आज १४ एप्रिल २०१६ हे भारतरत्न Dr. BabaSaheb Ambedkar यांचे १२५ वे जंयती वर्ष.
हि जयंती संपुर्ण दलित वर्ग मोठ्या जल्लोश्याने संपुर्ण भारतात साजरी करतांना दिसुन येइल.
परंतु एक विचार मनात येतो कि फक्त दलित वर्ग च का? अपल्या देशात प्रत्येक महापुरुष हा एक विशिष्ट जाती आणि वर्गा पुरतेच का सिमित असावेत.

कुसुमाग्रजाची कविता तर नाही पण त्याचा आशय आठवतोय. "की चॊकात उभारलेले पुतळे जर रात्री एक्मेकांशी बोलू लगले तर...
"शिवाजी महाराज म्हणाले मि झालो फक्त हिंदुंचाच त्यातही काही मराठ्याचांच, टीळक म्हणाले मि फ्क्त झालॊ चित्पावन ब्रह्मणांचाच, फुले म्हणाले मि फक्त झालॊ माळ्यांचा, आंबेडकर म्हणाले आणी मि उरलो फक्त दलितां पुरताच, त्यावर गांधी म्हणतील अरे बाबानो तुमच्या पाठी कुठलीतरी एक जात तरी उभी आहे मि झालो फक्त सरकारी कचेरीतील भींती पुरताच".

आज ही काही विक्षिप्त मनोव्रुत्तिचे लोक जाती पती मधे धर्मामधे तेढ निर्माण करण्याचे काम सतत करत असतात, त्यांच्या साठी हि माहपुरुषांची विभागनी सतत फायदेशिर ठरत असते, हे आपण सामान्यानी विसरता कामा नये,
ईतिहासापासुन धडे घ्यायलाच पाहीजे पण ईतीहासाला चघळत बसुन शिव्या घालुन वर्तमान सुधारत तर नाहीच त्या उलट भविष्य हि अंधकातर जाण्याचा धोका वाढतो.

आजच्या दिवशी बाबासाहेबांचा समाजा साठी दिलेला एक मंत्र आठवतोय.
"शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा".
शिक्षण हा एक्मेव मार्ग आहे स्वत:हुन स्वत:चा उद्धार करण्याचा.
क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले ह्यांनी सुद्धा बहुजनाना शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना म्हटले आहे
"विद्येविना मती गेली,
मतीविना नीती गेली,
नीतीविना गती गेली,
गतीविना वित्त गेले,
वित्तविना शूद्र खचले,
एवढे अनर्थ एका अविद्येने केले".

म्हणुन शिक्षण गरजेचे, पण त्यातही एक प्रश्न सतत उभा केला जातो, तो म्हणजे आरक्षणाचा.
आता आरक्षण द्यावे की देवु नये...?
आपण काही आकडे बघुयात, मग तुम्हिच ठरवा,

Ministry of Minority Affairs च्या २०१४  मधिल रिपोर्ट नुसार आजही ४४.८% Scheduled Tribe (ST)  आणि 33.8% Scheduled Caste (SC) लोक्संख्या गरीबी रेषेच्या खाली आहे.
शिकषणाच्या बाबतित बोलाव तर IndiaGoverns Research Institute च्या २०१४ चा सर्वे सांगतो की अर्ध्यातुनच शाळा सोडण्यार्यापैकी ५०% संख्या हि दलितांची आहे. त्यातही एकट्या कर्नाटक राज्यातिल संख्या ही ४८% आहे. त्याहुन ही अधिक म्हणजे ८८% विद्य़ार्थ्य़ां सोबत भेदभावाची वागनुक दिली जाते. दलित विद्यार्थ्याना मध्यांन्न भोजनाला ही हात लावायची परवानगी काही ठिकाणि नाही. ३५% शाळांमधे विद्यार्थ्याना मागच्या बाकावर बसवल जातं आणि इतर बरचं काही.

आरोग्या संबंधित विषयातही दलित वर्गा सोबत भेदभाव केल्याच दिसुन येतं
६५% दलित वस्त्य़ांमधे वैद्यकिय कर्मचारी जाण्यास टाळाटाळ करतात.
४७% दलितांना स्वस्त धान्य दुकानात प्रवेश आजही नाकारला जातो,
५२% दलितांना दुरुनच धान्य दिल जातं

दलितां सोबत केल्या जाणार्या गुन्ह्याची संख्याही काही कमी होतांना दिसत नाही.
आजही सरासरी नुसार प्रत्येक १८ मिनिटाला दलितां विरोधात एक गुन्हा या देशात घडतोय.
सरासरी प्रत्येक दिवसाला ३ बयकांच्या बलात्काराच्या घटना घडतात तर सरासरी प्रत्येक आठवड्यात १३ हत्या तर ६ अपहरणाच्या घटना घडतात. तर २७ atrocities चे गुन्हे दर दिवशी घडतात.
हे सगळे आकडे Internet वर उपल्बध आहेत.

ह्या हुनही अधिक गोष्टी पडद्या आड घडत असतात ज्या पुर्णपणे आपल्या समोर येतातच असे नाही.
मध्य-प्रदेश मधील सप्टेंबर २०१५ ची घटना आहे जिथे ४५ वर्षीय दलित महिलेला नागड करुन जबर्दस्ती मलमुत्र पाजुन यादव समाजा कडुन धींड काढण्यात आली.
अश्या अनेक घटना खास करुन उत्तर-प्रदेश आणि बिहार सारख्या राज्यात दररोज मोठ्या प्रमाणावर घडत असतात.

परंतु ह्या सगळ्या घटनांचा राजकारनी  लोक आपल्या घाणेरड्या राजकारणासाठी लिलया वापर करत असतात.
आणि गेल्या अनेक वर्षां पासुन ह्या समाजाचा Votebank म्हणुन वापर केला जातोय.

आजही खितपत पडलेल्या ह्या समाजाच्या उद्धारासाठी पुन्हा बाबासाहेब जन्माला येणें शक्य नाही,
परंतु जसा एक दलीत शिकला आणि आंबेडकर झाला तसे आज त्यांच्याच क्रुपेने हजारो दलित सुशिक्षीत आणि शिकलेले आहेत,
त्या प्रत्येकानी अपल्या मधला आंबेडकर जागवला, जिवंत केला तर कुठल्याही राजकिय आश्रयाची, आरक्षणाच्या कुबड्याची कींवा ईतर कश्याचीही गरज नाही.

चला तर सुशिक्षीत आणि शिकलेल्या दलित बांधवानो शपथ घेवुया, आज अपल्या मधला आंबेडकर पुन्हा जागवुया.

महामानवास विनम्र अभिवादन....
जय हींद....

No comments: