Saturday, April 18, 2015

पुणे वाहतूक

 
पुणे तिथे काय उणे असे म्हणुन उणेकर (माफ करा पुणेकर असं लिहायचं होत),
तर "पुणेकर" स्व:ताचिच पाठ थोपटून घेतात. परंतु  पुण्या मधेही काहीतरी उणे आहेच हे पुणेकरांनी हि मान्य करायला हवं, ते म्हणजे पुण्याची बेशिस्त वाहतूक व्यवस्था आणि बेशिस्त पुणेकर.
पुण्यात सध्या दोन पुणेकरांचे गट पडतात एक म्हणजे जुने पुणेकर आणि सध्या बाहेरून येउन पुण्यात स्थाईक झालेले नवीन पुणेकर. जेव्हा कोणि पुण्याला किवां पुणेकरांना बेशिस्त पुणेकर अस म्हणतो तेव्हा दोघेही एकमेकां कडे बोट दाखवून मोकळे होतात. आज पुणे शहाराच्या वाहतुकीची जी अवस्था आहे ती पाहून पुणे शहराला ही गुदमर्लेल्या  सारखा होत असेल. जगभरामध्ये वाहतुकी साठी नवीन नवीन गोष्टींचा वापर होऊ लागला आहे, Railway, Metro, Bullet Train, Intercity Water Transport, Private Jet. ईत्यादी अनेक गोष्टींनी प्रवासी वाहतूक व्यवस्था सुरळित केलेली आहे. अनेकदा आपण वाचतो कि जापान मधे कंपनी चे CEO सायकल ने ऑफीस ला जातात, तर UK मधे Managers खाजगी वाहना ऐवाजी Metro किंवा इतर Public Transport चा  वापर करतो. परंतु हिंजेवाडी च्या रस्त्यावर बघाल तर साधा Team Leader सुद्धा कार मधुन जातान दिसेल. ह्याचा अर्थ आपण खुप प्रगत आहो किंवा आपल्या लोकांकडे खुप पैसा आहे अस काही नाही, हे फ़क्त आपल फ़सलेल Public Transport  म्हणुन हा पर्याय. PMPL च्या बसेस ची वाट बघत बसायच, ति आल्यावरही त्यात लोंबकणारे लोंढे हे पाहुनच मनात धस्स होत, त्यात बसायची हिम्मत होइलच अस नाही.
आणि पुण्यात Auto म्हणजे न बोललेला विषय, मिटर हे फ़क्त दिखाव्यासाठीच असतात. जरा लांब जायच असेल तर ५००-६००/- हा आकडा सांगुन मोकळे होतात. यायच तर या, नाही तर बसा "बस" ची वाट बघत. किंवा ६ सिटरAuto जे प्रत्येक ५मिनिटाला सवारी बसवण्यासाठी नाही तर कोंबण्या साठी थांबवत थांबवत नेतात, वर त्यांची मुजोरी ही सहन करवी लागते, म्हणुन आज पुण्यात प्रत्येक जण आपल खजगी वाहन वापरण जास्त सोईच मानतो, आणि अश्यानेच पुण्याच्या वाहतुकिचा प्रश्न दिवसेंदिवस जटील होत चालला आहे.

BRT चा उपद्व्याप:- गुजरात आणि दिल्ली च्या पाऊलावर पाऊल ठेवत पुण्यामधेही BRT चा उपक्रम सुरु केला खरा पण धिसाळ नियोजना आभावी पुरता फ़सला. कात्रज - स्वारगेट ते हडपसर असा पहीला टप्पा सुरु केला, पण अनेकांचे जिव घेउन तोच पहिला टप्पा शेवटचा ठरला. आता त्याच BRT route वरती नविन Flyover चे बंधकाम सुरु झाले आहे. म्हणजे ते पुर्ण होई पर्यत अशीच  वाहतुक विस्कळीत होत राहणार. आणि ह्या दोन उपक्रमा मधे जे करदात्यांचे पैसे गेलेत त्याचा हिशेब मात्र कुणिच मगायचा नाही.

PMPL:- Pune Municipal Transport आणि Pimpari-Chinchawad Municipal Transport दोघांच्या संयुक्त विद्यमानाने सुरु केलेली बस सेवा म्हणजे PMPL, ह्या City Buses पुण्यात तुम्हाला सगळिकडे दिसतील पण जेव्हा तुम्हाला हवी असेल तेव्हा मात्र ती वेळेवर दिसणार नाही, दिसली तरी नियोजित Stop वर थांबणार नाही, एक तर Stop च्या अलिकडे थांबेल अथवा Stop च्या पुठे थांबेल. तुम्ही धावत जाऊन पकडे पर्यंत ती गेलेली असेल. मग बसा वाट बघत, त्यातही सुखासुखी प्रवास होइलच अस नाही, त्यातली गर्दी बघता मुंबई च्या लोकल ची आठवण तुम्हाला होईल. बर, गाड्यांची अवस्था बघता तुम्हाला हे जाणवेल कि ह्यांना कोणि वाली आहे कि नाही. कधी तरी वेळ काढुन पुण्याच्या मुख्य रस्त्यावर फ़ेरफ़टका मारा तुम्हाला एक ना दोन City Buses अचानक बंद पडलेल्या अवस्थेत दिसतील. आणि ज्या काही चालू आहेत त्यातील बर्याच गाड्यांची बाहेरील पत्रे तुटलेले ही दिसतिल ज्या मुळे शेजारुन जाणार्या गाडिवाल्याला ही सहज ईजा पोहचु शकते. त्यात भरीतभर म्हणजे हे चालक सुद्धा सर्रास Single तोडतांना तुम्हाला दिसतील.
Auto:- पुण्यात पुणेरी भांमटे म्हणजे ऒटोवाले. कधी तुम्हाला गंडा लवतील कळणार ही नाही. त्यांच्या ऒटो ला मिटर म्हणजे शोभेची वस्तु, ज्या वर लिहलेल असत "Don't touch me" म्हणुन कदाचित तो चालक हि त्याला हात लावत नसेल, सरळ आकडा सांगुन मोकळा होतो, त्यात बावधन, भुगाव, पाषाण,सांगवी,धायरी,अंबेगाव ई. ठीकाणी जायच म्हटल तर ते Outside area आहे अस सांगुन आधिक पैश्या चि मागणि केली जाते, कींवा येणार नाही अस उत्तर तुम्हाला मिळत.
रस्ते:- सद्ध्याच्या घडिला बर्याच रस्त्यांच काम पुण्यात चालु आहे, जसे की औंध-सांगवी भागात रस्ता रुंदिकरण, स्वरगेट परिसरातिल Flyover, शिवाजी नगर भागात Subway असोत,
किंवा कल्याणि नगर, कोरेगाव पार्क मधले रस्ते दुरुस्ती, आणि कोंढवा भागातिल नविन रस्त्याचि बांधकाम, त्या नंतर पिंपरी चिंचवड परिसरातही रस्ते माहामार्गा चा बराच कायापालट सुरु आहे.
पण ह्या सगळ्या मुळे जणतेला वाहतुकी चि कॊंडि मात्र प्रचंड प्रमाणात सहणं कारावी लागत आहे. त्यातच भविष्या मधे पुण्यात रिंग रोडची हि आखणि झालेली आहे, सर्व माण्यता मिळाल्या असुन काम सुरु होण्याची वाट पाहण सुरु आहे, ह्या सगळ्या गोष्टिचा काया पालट होत असतांना मात्र हिंजेवाडी सारख्या आंतर्राष्ट्रिय ख्याती असलेल्या ठिकाणा कडे सपशेल दुर्लक्ष होताना दिसतयं. तसाच सद्ध्या धोक्याचा ठरतोय तो म्हणजे मुंबई-बंगलोर हाय-वे, ह्या हाय-वे वर मोठ्या वाहणां सोबतच कंपण्यां मधे कामाला जाणार्या चाकरमाण्यांची हि मोठि गर्दी बघायला मीळते, त्यात ह्या महत्वाच्या रस्त्यावर Flyover बांधायचा म्हणुन गेल्या २ वर्ष्या पासुन अर्धवट बांधकाम करुन ठेवलय ज्या मुळे वाहतुक कॊंडी तर होतेच सोबत अनेक अपघात ही होतात.
Metro:- पहिलेच येवढ अनियोजित कारभारा मुळे विस्कळित झालेल्या पुण्याच्या वहतुकीत अजुन एक भर आखुन ठेवली आहे ति म्हणजे Metro प्रकल्पाची, ह्याच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात पुण्यातिल सगळ्यात गजबजलेल ठिकाण म्हणजे स्वारगेट ते निगडी, दुसरा टप्पा कोथरुड ते कल्याणी नगर आणि ई. पुढचे टप्पे असतिल. असा काही तरी हा आराखडा आहे. म्हणजे स्वारगेट परीसारावर एका शस्त्रक्रिये नंतर लगेचच दुसरी शस्त्रक्रिया होणार हे निश्चित, आशा करुयात Metro प्रकल्प तरी पुण्या च्या बेशीस्त वाहतुकीचा गुंता सोडवु शकेल.
Water Transport:- सद्ध्या नविन केंद्रातल सरकार मुंबई मधे म्हणे पाण्याद्वारे वाहतुक सुरु करण्यावर भर देणार आहे, त्या साठी लगणार्या बसेस ची पाहणि ही झालेली आहे.
तसीच काहीशी संकल्पना पुण्यातही राबवता येवु शकते. पुणे शहराच्या मधुन दोन नद्या वाहतात, मुळा आणि मुठा, पण आज त्या ईतक्या प्रदुषित झाल्या आहे कि त्यांना नदी म्हणाव की नाला हेच कळत नाहि, पण ह्या नद्यांचा जर कायापालट केला ह्यांना स्वच्छ करुन पाण्याचा साठा वाढवला योग्य नियोजन केल तर पुण्यातहि बोटे द्वारे अंतर्गत प्रवसी वाहतुक व्यवस्था सुरु केलि जावु शकते. ह्याचा हि विचार व्हायला हवा. त्या साठी सरकार सोबत आपल ही कर्तव्य बणत की आपण ही त्यात घाण किंवा कचरा टाकयल नको.

ह्या वरील सर्व गोष्टी योग्य नियोजनाने आखल्या तर पुण्याची वाहतुक सुरळित आणि सुखकर व्हायला मदतच होईल, कारण आता पुण्यामधे नविन पुणेकरांचा भरणा हा दिंवसेंदिवस होतच राहणार आहे, त्याला पर्याय नाही. योग्य नियोजन आणि शिस्त हाच ह्यातला मार्ग. योग्य नियोजनाने प्रवासी वाहतुक सुधारलीत तर प्रवाश्यां मधेही शिस्त यायला वेळ लागणार नाही.
मग पेटु द्या रणसंग्राम शिस्तशीर नियोजित वाहतुकी साठी... हल्ला बोल....!

1 comment:

Late Night Edition said...

private vehicles अशानेच वाढत आहेत आणि सगळा विचका होत आहे