Tuesday, March 15, 2011

स्वरराज नावाचा छावा

संगीताच्या क्षेत्रातलं एक बरचस नावाजलेल पण सध्या अनोळखी झालेलं एक नाव म्हणजे दिवंगत संगीतकार श्रीकांत ठाकरे, गीतकार मोह.रफी च्या आवाजातलं "हा रुसवा सोड सखे पुरे हा बहाणा"  हे गाण त्यांनीच संगीत बद्द केलेलं. श्रीकांत ठाकरेंची दुसरी ओळख म्हणजे "शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे" यांचे धाकटे बंधू, आणि मनसे प्रमुख "राज ठाकरे" यांचे वडील. श्रीकांत ठाकरे ह्यांना संगीता बरोबर व्यंगचीत्राचीही  बरीच जान होती हे बाळासाहेबांच्या मुलाखतीतून बर्याचदा जाणवलं.जसे श्रीकांत ठाकरेंच संगीत प्रत्येक युवकांच्या तोंडी अजूनही राज्य करत आहेत, तसाच त्यांचा मुलगा "राज ठाकरे" हा महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी युवा मनावर अधिराज्य गाजवतोय.
मागच्या वर्षी पुण्यात शनिवारवाड्या समोर स्व. श्रीकांत ठाकरे संगीत स्मृती पुर
स्कार राज ठाकरे यांच्या हस्ते संगीतकार अजय अतुल ह्यांना देण्यात आला. तेव्हा नेहमी राजकारणावर तिखट बोलणार्या राज ठाकरेंच्या मुखावाटे कलेविषयी आणि त्यांच्या वडिलांविषयी ऐकायला मिळाल, राज ठाकरे म्हणाले, "त्यांच्या वडिलांची इच्छा होती कि त्यांनी संगीत क्षेत्रात आपला ठसा उमटवावा." त्या साठी लहानपणा पासूनच त्यांना संगीताची गोडी ह्वावी म्हणून श्रीकांतजींनी तबला, पेटी, सितार ई चे धडे गिरवणे सुरु केलेत, त्याचं नावही त्यांनी "स्वर-राज ठाकरे" ठेवलेलं म्हणजे स्वरांवर राज्य करणारा, त्यांना अनेक संगीतातले राग शिकवलेत. परंतु राज ठाकरेंना मात्र संगीता व्यतिरिक्त दुसराच राग डोक्यात बसला आणि ते आपले काका "बाळासाहेब ठाकरे" यांच्या कलेशी म्हणजे व्यंगचीत्रा शी अधिक प्रेरित होऊ लागलेत, जसजसे ते मोठे होत गेलेत त्याच्या वर काकांचा प्रभाव अधिकाधिक होत गेला "राज ठाकरे" त्या भाषणात असे हि म्हणाले होते कि त्यांना अमेरिकेला जाऊन तिथे "Holliwood च्या Disney " मध्ये Cartoon Artist म्हणून काम करायची इच्छा होती.
बाळासाहेबांन  बरोबर राहून त्यांनी आपली व्यंगचीत्रशैली उंचावली व बाळासाहेबांच्या म्हण्यावारूनच व्यंगचीत्रा खाली Autograph म्हणून त्यांनी स्वर-राज ऐवजी "राज ठाकरे" हे नाव लिहिण्यास सुरुवात केली. याचा अर्थ
असा कि आज राज ठाकरेन कडे जी व्यंगचीत्रशैली असो किंवा भाषणशैली हि जशी बाळासाहेबांची देन आहे तशेच त्याचं नावही हि त्यांचीच देन आहे.
 असा हा ठाकरे घराण्यातल्या संगीतातल्या वाघाचा राजकारणातील "छावा". "राज ठाकरेंनी"  संगीतात जरी आपली छाप गाजवली नसली तरी त्यांना संगीताची व कलेची चांगलीच जान आहे. कारण भाषण शैली हि सुधा एक कलाच आहे, त्यानंतर श्रोत्यांना आकर्षित करण्यासाठी चकाचक बनवलेलं व्यासपीठ असो किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनी ची website , आपण बघितलीच असेल. या प्रत्येक ठिकाणाहून एक आकर्षक मनमोहक कलाकृती दिसून येते. असा हा कलेशी जुळलेला राजकारणातला "छावा" सदैव मराठी हृदयावर अधिराज्य गाजवत राहावा आणि मराठी मातीच्या उद्धारासाठी लढत राहावा......

1 comment:

Anonymous said...

chhan...,, mast mahit nasleli mahiti milali. tyabaddal dhanyavaad.