Friday, February 4, 2011

साथी आयुष्याचा

       नुकतेच माझ्या लहान बहिणीला बघायला पाहुणे आले होते, अचानकच जुळल सगळ, अस आमच्या ध्यानी मनी ही नव्हत की कोणी तरी येइल पसंती दखावातिल आणि लगेचच होकार ही देतील म्हणुन. आता कदाचित लग्नाची बोलनीही होइल आणि माझी लाडकी मला सोडुन जाइल, या विचारानीच मनात अस धस्स होत. असं वाटत बघता बघता आपण एवढे मोठे झालोत. असं वाटत कालच तर आईनी "भांडू नका रे" म्हणत पाठीत दोन "धबुके" दिले होते. कालच तर बाबांनी दोघांसाठी खाऊ आणला होता. आणि शालेचा निकाल लागला, तेव्हा तिला जास्त आणि मला कमी मार्क म्हणुन ती बाबांची लाडकी बाबांच्या खांद्यावर जाउन बसली आणि मला चीड़उ लागली, वर बाबा मला उपदेशाचे डोस पाजू लागले की "बघ शिक जरा काही तरी हिच्या कडून." आणि माझ्या मनात मात्र एकच विचार "चोमडे तू खाली उतर तुला बघतोच". हे सगळ जस काही कालच घडल होत ना. पण विचारही करवत नव्हता की लगेचच ही चिमुरडी बाबांच्या खांद्यावरून उतरून लग्नाच्या बोहल्या वर जाउन बसेल म्हणुन. मग माझ मन मुद्दामुणच आपण ज्या Drawer मधे फोटोंचा Album ठेवला आहे त्यातच एखादा महत्वाचा कागद शोधू लगत  आणि हळूच तो Album काढुन त्यातले आपले लहानपणिचे फोटो बघत बसतो आणि कधी मन गहिवरून येत कळत ही नाही. हे अस तुमच्या बरोबर ही होत ना हो..?
       बरच आधी घर सुटल पुण्यात आलो, पहिला शिक्षण मग नौकरी. बघता बघता हातातुन वाळू सारखी वेळ सुटत गेली आणि बरीचशी मस्ती तिच्या सोबत करायची राहुनच गेली. उद्या ती तिचा आयुष्याच्या जोड़ीदार बरोबर निघून जाणार आणि आमची मस्ती करणारी, धिंगाना घालणारी आमची चिमुरडी एक जबाबदार गृहिणी होणार. नको वाटत हो हे मोठेपण अस वाटत "परत ते लहानपण देगा देवा."
       कस वेगाळच विश्व असत ना या Arrange Marraiges च. सगळ कस परी कथे सारख, एक राजकुमार (आई वडीलांनी शोधून आणलेला पण तिच्या पसंतीचा) तो घोड्यावर वर स्वार होउन येणार आणि तिला घेउन जाणार, अस जवळपास प्रत्येक मुलीला वाटत असेल, हो ना..? मग Love Marraiges च काय? माझ्यामते लग्नाचा प्रकार कुठलाही असला तरी तो एक प्रकारचा आयुष्याचा जुगाराच मानला जातो. मग ते स्थळ पालकांनी आणलेल असो वा तुम्ही स्वत: ठरवलेल असो, ती किंवा तो कसा असेल पुढच्या आयुष्यात तो मला सुखात ठेवेल  का? किंवा ती माझ्या  घरच्याना समजुन घेत Adjust होइल का? हे आणि अशीच सगळी प्रश्न सर्व Marraiges मधे सारखीच असतात. मग कुठलाही नात टिकवण्यासाठी गरजेचा असतो तो म्हणजे विश्वास. एकमेकांवर असलेला विश्वास हाच प्रतेक नात्याला मजबूती देतो. तिचा त्याचावर आणि त्याचा तिच्यावर असलेला विश्वास किंवा एखाद्या मुलाने/मुलीने आपल्या पालकांवर माझ्या आयुष्याचा निर्णय तुम्हीच निट घेऊ शकता अस म्हणत टाकलेला विश्वास... सगळी नाती फक्त या विस्वासवर जुळली आहेत.
       मग परत प्रश्न येतो तो म्हणजे Love Maraaiges चा किती टक्के लोक आपल्या आई-वडीलाना विश्वासात घेउन हे पाउल उचलतात. याच विषयावर माझ्या एका मैत्रिणीने खुप छान विचार मंडले होते, पहिल्यांदा एकताना थोड हसू आल पण नंतर वाटल खरच विचार करण्या सारखी गोष्ट आहे, ती म्हणाली "आज काल आई वडिल जसे सगळयाना जसे असतात ना ताशे Girl Freind, Boy Freind ही comman झाले आहेत."  तीच म्हणन होत की "या सगळ्या गोष्टींसाठी आपण कधी आई वडिलांचा कधी विचारच करत नाही, त्यांनी ज़रा नाही म्हटल की त्यांच्या विरोधात निर्णय घ्यायला तयार, आणि विचार करतात की एकदा लग्न झाल आणि मूल वगैरे झाल की स्वीकार करतील अपोआप, पण ते स्वीकार का करतात? ते फक्त आपल्या प्रेमापोटी. पण जर का तो प्रियकर किंवा प्रेयसी विश्वासु निघाली नाही तर मग काय, "घर के ना घाट के"  मोठी रिस्क आहे बाबा."
      पण, मग हे म्हणन ही चुकिच होइल की कोणी प्रेमात पडुच नये. या गोष्टीचा विचार केला गेला पाहिजे की पालक नाही का म्हणतात? बर केलच Risk घेउन लग्न तर मग ती लग्न किती काळ टिकतात, करण इथे परत प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे, विश्वासाचा. म्हणजे त्या दोघांचा एकमेकांवारिल विश्वास किंवा त्यांनी आपल्या पलाकाना विश्वासात घेउन केलेल लग्न. या दोन पैकी काहीही....
पण तस खर बघीतल तर आजकाल ची Metro City मधील बरीच Affairs लग्ना पर्यंत पोहचतच   नाहीत, कारण त्याच्या कड़े बरीच Options असतात. समजा जरा काही मतभेद झालेत की लगेच कुठले तरी निकष लावुन तिथेच Full Stop दिला जातो. यालाच म्हणतात अति शिक्षणाचा दुष:परिणाम. होय, कारण अति उच्च शिक्षणाने मानुस अति विचार करू लागतो, व अति विचारने त्याच्या डोक्यात अधिक प्रश्न निर्माण होतात, आणि मग ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतिलच अस नाही, त्यातल्या कहिंचिच उत्तरे मिळतात व त्यावरूनच मग कुठला तरी निकष ठरवला जातो आणि नेमका तोच हानी-कारक ठरतो. म्हणुन ह्या संबंधाना Affaire अस म्हटल जात प्रेम नव्हे.
      सरते शेवटी निकष येवढाच काढावासा वाटतो कि  मग ते असो Love Marraige किंवा Arrange Marrage  असावा फक्त विश्वास.., विश्वास आपल्या जोड़ीदारावर आपल्या जीवन साथी वर... तो साथी आयुष्याचा आयुष्यभर सोबत असेल फक्त विश्वासाच्या जोरावर..

1 comment:

Ashish said...

बहिणीस कोटि कोटि शुभेच्छा...