Friday, October 8, 2010

झेंडयाचे महायुद्य..

आता नुकत्याच  महानगर पालिकेच्या निवडणुका जाहिर झाल्यात. कल्याण- डोंम्बिवालि महानगर पालिका निवडणुकीच्या बातम्या आपण रोज News Channel वर बघतोच आहोत. निवडणुका म्हटल की राजकीय चिखल फेकिचा गदारोळ सुरु होतो. पण आजकाल ह्याला नवीन रूप आलेल दिसतय, काल पर्यंत राजकारण्यां मधे चढ़ा ओढ़  होती.  आज मात्र पक्षाच्या झेंडया मधून ती दुसून येती आहे.
   सांगायच तात्पर्य आस की, आज राजकीय पक्ष आपल्या कार्य उंचवाण्या पेक्षा आपले झेंडे उंचवाण्यातच मग्न दिसतायेत. तुम्ही मुंबई मधे जाउन बघितलत तर तुम्हाला कळेल की कसा आपल्या पक्षा चा झेंडा दुर्या पक्ष्याच्या झेंड्या पेक्षा उंचवता येइल यातच राजकीय पक्ष जास्त लक्ष घालातायेत.
  ५ वर्षा आधी मी मुंबई ला जेव्हा गेलो होतो तेव्हा दादर हुन पुण्याला येणार्या रस्त्यावर एका चौकात शिवाजी महाराजांच्या पुतळ्या समोर भला मोठा असा "भगवा" ध्वज भागितला, आणि त्या भगव्या कड़े बघतच रहवास वाटल, परत कही दिवसा नंतर मुंबई ला जाण्याचा योग आला,बघतो तर काय त्या भगव्या ध्वजा शेजारी मनसे नि आपला तेवढ्याच आकाराचा पण भगव्या पेक्ष्या एक हात उंच झेंडा रोवला होता. सुरवातीला जेव्हा बघितल तेव्हा डोक्यात
हां विचार ही नव्हता की हा "भगवा" ध्वज कुठल्या पक्षाचा आहे, परंतु मनसे नि त्याच्या शेजारी आपला झेंडा रोउन हे सिद्ध कल होत की हा महाराजांचा, मराठी मानाचा ध्वज नसून एका पक्षाचा झेंडा आहे. पण मनसे ह्या Compition मधे एकटी नव्हती, काही दिवसांनी ह्या दोन्ही झेंड्या समोर "स्वाभिमान गमावलेल्या कही लोकांनी" आपल्या नवीन संघटनेचा झेंडा रोवला आणि मग हे युद्ध असच सगळी कड़े सुरु झाल, जिथे भगवा दिसेल तिथे आपला झेंडा रोवाण्याची स्पर्धाच सुरु झाली.काही दिवसांनी माहित पडल हे लोक मंदिराच्या कळसा वर ही जाउन तिथे झेंडा रोवायला मागेपुढे पाहणार नाहीत.
    तात्पर्य एवढच की आजच्या राजकारणाला कामा पेक्षा दिखाव्याच रूप जास्त  आलेल आहे..."ज़माना Marketing और Advertisment का है."

2 comments:

Anonymous said...

sahi ahe...sadhya chi sthitich ti ahe....sadhyachay condition madhe paksh sudha pahle sarkhe rahile nahi...saglyni yala ek business banaun thewla ahe...Competitive Business....
Sahi lihley ahe....swapnil...

Swapnil Demapure said...

apalya pratikriye baddal dhnyawaad..
aaj politics ha ek prakaracha Swach bussiness aahe he tumach mhanan agadi barobar aahe