Monday, October 4, 2010

माझा बंगलोरू (Bangalore) प्रवास...


Bangalore कर्नाटकाची राजधानी, आणि भारताची Sillicon City.

म्हणजे IT Companies च माहेर घर, बरेच दिवसा पासून इच्छा होती तीथे जाण्याची, पण तसे योगच जुळत नव्हते. कारण तिथे जायचं म्हटलं तरी कुठल्या कारणाने, गेल्या नंतर रहाच कुठे, कारण तिथे कोणी ओळखीच हि नाही,
आमच्या काकांच्या तोंडून फार स्तुती एकली होती या शहराची, इथल्या IT Envornment बद्दल Lifestyle बद्दल, म्हणून इच्छा अधिकच तीव्र होत होती. पण वेळ आणि मार्ग नव्हता. योग्य वेळेची वाट बघण्या शिवाय पर्याय हि नव्हता, पण ते म्हणतात ना "सब्र का फल मीठा होता है." आणि Office तर्फे एका Testing Project साठी म्हणून आम्हाला Banglore ला पठवण्याची घोषणा झाली, आणि तेहि १, २ दिवसासाठी नहीं तर तब्बल ३ माहिण्यासाठी.
मी खुप आनंदात होतो, कारण आता जायला कारणही मिळाल होत आणि पैसे ही खर्च होणार नव्हते (ते जास्त महत्वाच होत).
पुणे ते Bangalore प्रवास
सकाळी १० वाजता  office मधून टिकिट  collect  करुन सरळ पुणे Station  ला पोहचलो, उद्दान Express लागलेलीच होती, तिथे मात्र एक घोळ झाला, आम्ही तिघे होतो पण आमचे डब्बे मात्र वेगले आणि टिकिट एकाकडेच...
आमच्या सोबतच्या प्रवाश्यानी  Seat Exchange केल्या मुळे आम्ही तिघाही एका ठिकाणी येऊ शकलो, नहीं तर २२ तास एकटा बसून बोर झालो असतो, कारण आजूबाजू चे सगळे प्रवासी कन्नड़ मधे बोलत होते.
शेवटी रात्र संपली आणि सकाळी ८ च्या सुमारास आम्ही BangaloreStationला पोहचलो, Auto पकडून सरळ Hotel गाठल.
आम्हाला Auto वाला ही भारी मिलला होता "चंद्रू अन्ना". मागे बघून गप्पा मारत गाड़ी चलवाने ही त्याची खासियत... पु. लं. नि आपल्या "व्यक्ति आणि वल्ली" मधे उल्लेख करवा असा नमूना.
City BUS
Bangalore मधे पहिला दिवस, सहाजिकच इथल्या गोष्टींशी माझ मन पुण्याशी Comparision करू लागल,
पुण्यातील PMPL उर्फ़ PMT सगळ्याना माहिती ची असलेली, जर तुम्हाला बस मधे चढायच असेल तर ती नेमकी पुढे थांबणार आणि उतरायाच असेल तर कुठेतरी मागेच तुम्हाला उतरवणार, तसाच कही तरी साम्य इथे जाणवल.
आपल्या इथे जश्या Private Six Seater चालतात तश्या इथे Private Buses चालतात, प्रत्येक  Local bus मधे २ T.V. आश्चर्य वाटला ना मला ही ते बघून तसच काही झालेल. त्यावर कन्नड़ Movies सुरु असतात आणि प्रवासी Theatar मधे बसल्यासराखे बघतात.आणि काही महानगर पलिकांच्या एक दरवाजा बसेस मधे तर फ़क्त Driver असतो, टिकिट काढ़ने आणि गाडी चलवाने ही दोन कामे तो एकटाच करतो.

भाषा
सगळ्यात महत्व्वाची गोष्ट म्हणजे भाषा.
त्यात आपण पडलो मराठमोळी माणस, मराठी बाणा आणि काणा मॉडल पण वाकणार नाही.
पण इथे आल्यावर ह्याच कन्नड़ प्रेम जाणवल, लहनाताला लहान मानुस असो की कोणी मोठा, प्रत्येक जण तुमच्याशी कन्नड़ मधेच सुरुवात करणार. आणि आपला चेहरा एखादा भुत बघितल्या सारखा होणार, मग काय English किंवा हिंदी शिवाय पर्याय उरत नाही.  पण इंग्लिश ही सगळी कड़े चालणार असे ही नाही. Conductor, पेपर वाला, चहाच्या दुकानातला पोर्या ई. ठिकाणी "एका माताने राष्ट्रभाषा ठरलेल्या हिंदी" शिवाय पर्याय नव्हता. पण काही ठिकाणी याहुन ही वाईट म्हणजे, काहींना हिंदी चा ही परहेज मग काय "मुकी बोली चा वापर" खानाखुणा करुन संमभाषण चालायच.

चित्रपट आणि Radio
बरेच से साधे सिनेमा गृह आणि आणि बरेच Multiplex  सुद्धा, पण हिंदी चित्रपटांचे Postar राजस्थान मधे पाउस पडावा तसे दुर्मिळ. मराठी सिनेमाचा तर संम्बधच येत नाही, मराठी ला महाराष्ट्राताच सिनेमा गृह मिळत नाही तो इथे काय मिलणार.
भरित भर म्हणजे रेडियो वर ही सगळी कन्नड़ गाणी, एक रेडिओ Station सोडल्यास सगली कड़े एकच..., त्या मुले सिनेमाचा दीवाना असलेला मी, 3महीने गप्प फ़क्त T.V. वरील कार्यक्रमाताच आनंदी होतो.


       शेवटी Bangalore मधे राहून ऐवढ समाजाल की, जर तुमच्या मनातच, तुमच्या विचारताच आपल्या भाषे बद्दल आदर आसेल, तर कुठल्या ही नेत्याला ह्याचा मुद्दा करुन आपली राजकीय पोली भजता येणार नाही.

आपण काय आणि कशी सुरवात करतो त्यावर आपल्याला मीळणारा Response Depend असतो, आपल्या कडील Conductor च "किधर जाना है" म्हणून सुरवात करत असतील तर कसा होणार उद्दार. म्हणून आपल्या कड़े मराठी पाट्या साठी, रेडियो वरील गाण्या साठी, मराठी चित्रपटांसाठी उठ सुट संघर्ष करावा लागतो. जेवाठा मराठी चा गर्व तेवाठाच हिंदी चा अभिमान ही आपण बाळगायला हवा पण अतिरेक नको.
पेटू द्या मायबोली मराठी च्या उद्धारा साठी रणसंग्राम, पण होऊ देऊ नका इतर भारतीय भाषांवर हल्ला बोल...

6 comments:

Anonymous said...

Awesome Dude.

Mala tar vatale ki kharech Pu. La. Deshpande avatarale aani tyani ha sara khatatop kela ki kay.

Anyways keep going on. I hope we will see more from you in coming days.

Thanks and Regards,
Sagar Shinde.

SNEHAL said...

Hey swapnil,
Silicon City cha pravas ekdam chaan describe kela aahes.
Vachatana swata Banglore madhe asalyasaarkha Experience hota.
Train chya tickets mule zaleli fajiti,city bus cha pravas,
चित्रपट आणि Radio and most importatnt is " भाषा "
you have written your each n every experience whether,it is good or bad.
Now,I am looking for your next journey and your experience in future.

Swapnil Demapure said...

Thanks Snehal & Sagar for your valuable comment..
aani ho snehal nakkich pudhachya wari che anubhaw share karel mi tumachya barobar

Swapnil Demapure said...
This comment has been removed by the author.
Anonymous said...

Pratibha said....

Hi Swapnil,

Tuza Silicon city cha experience khupach chan watala...marathi mansache kase hal hotat aani tyala kasha prakare adjust karave lagte...khupach chan padhatine tu tuze anubhav mandale aahet..good keep it up the good work..

Swapnil Demapure said...

Aag Pratibha, Adjustment tar Marathi manasachya Raktatach aahe..
Yewadhe Bhaiye aapan maharashtrat Adjust karato mhatalya war Adjustment chi saway hi honaarach