Wednesday, December 2, 2009

राऊतांना आलाय ऊत.............

गेल्या काही दिवसापासुन सामना मधे जे लेख बाळा साहेबांचे म्हणुन खपवले जात आहेत ते वाचुन आपल्या सारख्या सामान्य माराठी माणसांनी काय प्रतीक्रिया द्यावी हेच कळत नाही. कधी मराठी माणसांनिच पाठीत खंजीर खुपसला काय! तर कधी सचीन सारख्या महान क्रिकेट पटुवर सडकुन टिका. आणि महत्वाच काय तर तोही एक मराठी माणुस असतांना. बाळासाहेब आता ८०+ वर्षाचे झाले आहेत. मला तर वाटत आता ते या गोष्टीत लक्षही घालत नसतील. तस पहीले पासुन त्यांचा लाडका संजय ज्याला ते संज्या म्हणातात तेच सामनाचा कारभार पाहतात. मात्र आता संजय राऊतांनी जे काही सामनाचा आडोसा घेवुन चालवलय ते खरचं टिकेस पात्र आहे. संजय राऊत साहेब आपणास आमची नम्र विनंती आहे क्रुपया या सगळ्या गोष्टी जरा कमी करा सामन्य़ जणता व शिवसैनिकांना संभ्रमात आणु नका. त्यानंतर निखिल वागळेंवर हल्ला, हे प्रकरण वादाचच, ते बरोबर की चुक यात लक्ष न घातलेलच बरं, निखिल वागळे खरं तर माझे आवडते पत्रकार, परंतु त्यांची काहीच चुक नाही असंही मि म्हणत नाही. कारण एका हाताने टाळी वाजत नाही........
तरीही राऊत साहेब आपल्याला उगाच ऊत येवु देवु नका. पहीलेच मनसे मुळे बराच धक्का बसलाय त्यातुन सावरुन मराठी माणसांसाठी काम करणारी मराठी माणसांची आपली शिवसेना असा लैकीक परत पोहचवण्यासाठी धडपडण्या ऎवजी, मराठी माणसावरच हल्ले, जरा आवर घाला............

No comments: