नुकतेच माझ्या लहान बहिणीला बघायला पाहुणे आले होते, अचानकच जुळल सगळ, अस आमच्या ध्यानी मनी ही नव्हत की कोणी तरी येइल पसंती दखावातिल आणि लगेचच होकार ही देतील म्हणुन. आता कदाचित लग्नाची बोलनीही होइल आणि माझी लाडकी मला सोडुन जाइल, या विचारानीच मनात अस धस्स होत. असं वाटत बघता बघता आपण एवढे मोठे झालोत. असं वाटत कालच तर आईनी "भांडू नका रे" म्हणत पाठीत दोन "धबुके" दिले होते. कालच तर बाबांनी दोघांसाठी खाऊ आणला होता. आणि शालेचा निकाल लागला, तेव्हा तिला जास्त आणि मला कमी मार्क म्हणुन ती बाबांची लाडकी बाबांच्या खांद्यावर जाउन बसली आणि मला चीड़उ लागली, वर बाबा मला उपदेशाचे डोस पाजू लागले की "बघ शिक जरा काही तरी हिच्या कडून." आणि माझ्या मनात मात्र एकच विचार "चोमडे तू खाली उतर तुला बघतोच". हे सगळ जस काही कालच घडल होत ना. पण विचारही करवत नव्हता की लगेचच ही चिमुरडी बाबांच्या खांद्यावरून उतरून लग्नाच्या बोहल्या वर जाउन बसेल म्हणुन. मग माझ मन मुद्दामुणच आपण ज्या Drawer मधे फोटोंचा Album ठेवला आहे त्यातच एखादा महत्वाचा कागद शोधू लगत आणि हळूच तो Album काढुन त्यातले आपले लहानपणिचे फोटो बघत बसतो आणि कधी मन गहिवरून येत कळत ही नाही. हे अस तुमच्या बरोबर ही होत ना हो..?
बरच आधी घर सुटल पुण्यात आलो, पहिला शिक्षण मग नौकरी. बघता बघता हातातुन वाळू सारखी वेळ सुटत गेली आणि बरीचशी मस्ती तिच्या सोबत करायची राहुनच गेली. उद्या ती तिचा आयुष्याच्या जोड़ीदार बरोबर निघून जाणार आणि आमची मस्ती करणारी, धिंगाना घालणारी आमची चिमुरडी एक जबाबदार गृहिणी होणार. नको वाटत हो हे मोठेपण अस वाटत "परत ते लहानपण देगा देवा."